कुटुंब अन्‌ आर्थिक नियोजन


एचके लर्निग अँड एनएए
मानवी आयुष्याला नियोजनाची किनार असली तर आपोआपच यशाचे तोरण बांधले जाते. बोलण्यात, वागण्यात अगदी आपल्या जगण्यातही नियोजनाचा खूप मोठा वाटा असतो. एखाद्याचे आयुष्य नियोजनहीन असेल तर त्याचे दुष्परिणाम पदोपदी भोगावे लागतात यात कुणाचेही दुमत नसावे. आत्मपरिक्षण केले असता नक्कीच लक्षात येईल की, जी कामे आपण आजपावेतो नियोजनपद्धतीने केलेली असतील ते आज नक्कीच फलीत झालेली असतील; आणि जी कामे नियोजन नसताना हातात घेतलेली असतील त्याबाबत आजही पश्‍चाताप व अपयशाच्या वेदना मनाला बोचत असतील. आपण प्रत्येक लेखात वाचनातून सुसंस्कृतीसह आर्थिक विकास कसा साधता येईल, यावर प्रामाणिकपणे भर देत असतो. आपण जे-जे वाचन करतो त्याचा कधीनाकधी आपल्या आयुष्यात नकळत उपयोग हाेतच असतो. हे कुणीही नाकारू शकत नाही. आयुष्य जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय? असं जर विचारले तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असेल. कुणाचे भावनीक उत्तर असेल, तर कुणाचे प्रॅक्टिकल उत्तर असेल; परंतु येथे प्रॅक्टिकल उत्तरावर आपण बोलू, कारण आपले लेखनच अर्थकारणावर असते. अर्थातच येथे आयुष्य जगण्यासाठी पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक मानावा लागेल. मान्य आहे की, आयुष्यात पैसाच सर्वस्व नाही, मात्र या जगात जगण्यासाठी ते पर्याय नसलेले माध्यम आहे, हेही नाकारता येणार नाही. पैसा अवती-भवती असला की, सर्व जग सुंदर दिसायला लागतं. हे प्रॅक्टिकल आहे, आणि याला कुणीही नाकारू शकत नाही. हे मानवजातीसाठी कटू सत्य आहे. उगाचच नाही चित्रपटांमध्येही ‘पैसा बोलता है’ अशी गाणी लिहण्याची वेळ आली.  

मुबलक पैसा जवळ असणे म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती बळकट असणे असे म्हणावे लागेल. म्हणूनच यासाठी प्रत्येकाने यशस्वी नियोजन करणे गरजेचे आहे; आणि आज आपण यावरच चर्चा करणार आहोत. आपण म्हणाल, यशस्वी नियोजन म्हणजे नेमके काय आणि कसे असते? अापल्याला एक प्रचलीत म्हण नक्कीच माहित असेल, ती अशी की, कळतं पण वळत नाही. ‘नियोजन’ या चार अक्षरी शब्दाचा अर्थ प्रत्येकाला माहिती आहे; मात्र अनुकरण सर्वच करत नाही. जे करतात ते खूप पुढे निघून जातात; आणि जे करत नाही ते आयुष्यभर चाचपडत राहतात. काही कुटुंबांची आर्थिक अवस्था कोराेना महामारी येण्याच्या आधीही बेताचीच होती; आणि आजही त्यात फारशी सुधारणा न होता तशीच किंवा त्याहीपेक्षा दयनीय असेल. त्याउलट एखाद्या कुटुंबाची आर्थिक अवस्था कोरोना महामारी येण्याआधी ठिकठाक असेल; आणि आजही फारसी बिघडलेली नसेल. याला कारण फक्त नियोजनच असेल यात शंकाच नाही. आर्थिक नियोजन कसे करता येईल यावर सविस्तर आणि काही शिस्तबद्ध नियम पाहूया जेनेकरून आर्थिक नियोजनाची सवय लावणे सोपे होईल; आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आर्थिक संकटावर मात करता येईल. 

सद्यपरिस्थतीत एकत्र कुटुंब पद्धत सापडणे म्हणजे दुर्मिळच आहे. थोड्याफार प्रमाणात सोडले तर विभक्त कुटुंब पद्धतीच बघायला मिळते. त्याला कारणंही वेगवेगळी असतात. काही ठिकाणी कुटुंब प्रमुखासह कुटुंबातील इतर सदस्यही याला जबाबदार असतात; तर काही ठिकाणी परिस्थिती अशी असते की, सर्व कुटुंबातील सदस्य एकत्र राहूच शकत नाही. तरी एकमेकांशी असलेली प्रेमाची, मायेची ओढ अबाधीत असते; आणि हीच ओढ कुटुंबासाठी वेळोवेळी संकटमोचक म्हणून काम करते. असो, हा एक वेगळा आणि भावनीक विषय आहे. यावर आपण कधीतरी लेखन करणारच आहोत. चला तर मग मुळ विषयाला हात घालत, एका कुटुंबाचे उदाहरण घेत आर्थिक नियोजन कसे करता येईल ते पाहूया. 
समजा पती-पत्नी, दोन मुल आणि आई-बाबा असे सहा सदस्य कुटुंबात आहेत, यात पती-पत्नी कमावते आहेत, तर बाबांचे पेंशन किंवा इतर कुठल्यातरी माध्यमाने थोडेफार उत्पन्न आहे, किंवा नसेलही. या कुटुंबाचे आर्थिक नियोजन कसे असायला हवे ते आपण पाहूया. 

कुटुंब प्रमुख म्हणून कौटुंबिक जबाबदारी
येथे कुटुंबप्रमुख पती-पत्नी असणार आहेत. आर्थिक नियोजनाची जबाबदारी यांनीच घ्यावयाची आहे. आई-बाबा यांचा सन्मान, मुलांचे यशस्वीरित्या पालकत्व सांभाळत चार भिंतींच्या आत सकारात्मक ऊर्जा सतत सक्रिय राहावी, यासाठी या दोघांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. प्रेमाची, मायेची ज्योत अखंड घरात तेवत राहावी याकडे बारकाईने लक्ष ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे. त्याला कारणही तसेच आहे, कुटुंबातील प्रत्येकाचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम असले तरच आर्थिक आरोग्यही आपोआपच उत्तम राहील.

एकत्रीत उत्पन्न व त्याचे नियोजन
समजा पती-पत्नी दोघांचे उत्पन्न ३० हजार असे आहे. हेच एकत्रीत उत्पन्न समजावे. आई-बाबांचे पेंशन किंवा त्यांच्या इतरत्र उत्पन्नाकडे इमर्जन्सी फंड म्हणून पाहावे. याठिकाणी आई-बाबा यांची भूमिका फार महत्त्वाची असते. हे कुटुंबाचे आधारस्तंभ व मार्गदर्शक असतात. संकटकाळी संयम आणि धीर देणे ही भूमिका आई-बाबा यांनाच पार पाडावी लागते. म्हणजे आयुष्यभर कमावलेला अनुभव आपल्या मुलांच्या संसाराला कसा उपयोगी येईल, याचा विचार त्यांनी सतत करावयाचा असतो. म्हणजे आता नियोजन फक्त ३० हजारावरच करावयाचे आहे. 

समजा कुटुंबाचा प्रत्येक महिन्याचा खर्च १५ हजार असा आहे. तरी १५ हजार हातात शिल्लक राहतात. आता त्या १५ हजाराचे पुढे काय करायचे ते पाहूया. 

पत्नी-पत्नी यांचे एक जॉईंट सेव्हीग खाते राष्ट्रीयकृत बँकेत असायला हवे. त्यात प्रत्येक महिन्यात ५ हजार जमा करत राहावे. वर्षभरात या खात्यात ६० हजार जमा होतील. आणि अडीअडचणीला या पैशांचा वापर करता येईल.  

आता तुमच्या हातात १० हजार शिल्लक आहेत. आपल्याला दोन मुलं आहेत. दोन्ही मुलांचे राष्ट्रीयकृत बँकेत सेव्हींग खाते असायला हवे. आणि प्रत्येकी १ हजार असे दोन्ही मुलांच्या खात्यात २ हजार जमा करावयाचे आहे. वर्षभरात प्रत्येकी १२ हजार जमा होतात. यातून त्यांचा शैक्षणिक खर्च भागवता येईल. आणि वरवर त्यांचा शैक्षणिक खर्च भागत असेल तर भविष्यात त्यांना जेव्हा शिक्षणासाठी मोठी रक्कम लागेल तेव्हा ही मोठी रक्कम त्यांच्याच शिक्षणाला उपयोगी पडेल.  

आता तुमच्या हातात ८ हजार रुपये शिल्लक राहतात. कुटुंबातील जो सदस्य कामानिमित्त अधिककाळ घराबाहेर राहत असेल. मग ती पत्नी असू शकते किंवा पती दोघांपैकी जो जास्त रिस्क घेऊन जगत असेल त्याच्या नावावर एलआयसी पॉलिसी असायला हवी. महिन्याला कमीत कमी ३ हजार असा प्रिमियम भरणे गरजेचे आहे. म्हणजे पॉलिसी सुरू झाल्यापासून २२ व्या वर्षी त्या व्यक्तीला तीन पट रक्कम हातात मिळेल. यावेळेस ही तीन पट रक्कम आणि रिटायरमेंटची रक्कम एकाच वेळेस हातात येईल; आणि पुढे आपण येणाऱ्या पिढीसाठी आधारस्तंभ व मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडू शकाल. (अंदाजे एलआयसी व रिटायरमेंट रक्कम ५० लाख असेल.)

एवढे करूनही आपल्या हातात ५ हजार एवढी रक्कम शिल्लक राहते. कुटुंबातील कुणाच्याही नावाने राष्ट्रीयकृत बँकेत अजून एक सेव्हींग खाते असायला हवे. त्या खात्यात १ हजार रुपये प्रत्येक महिन्यात जमा करत राहावे. आणि हे खाते इमर्जन्सी फंड म्हणून उपयोगात आणावे. आयुष्यात जेव्हा मोठे आर्थिक संकट उभे राहील, जेव्हा कुठलाच पर्याय उपलब्ध नसेल त्यावेळेस या खात्यातील रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून वापरता येईल. 

आता आपल्या हातात ४ हजार रुपये शिल्लक राहतात. कुटुंबातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या कुठल्याही सदस्याच्या नावावर डीमॅट खाते असायला हवे. प्रत्येक महिन्यात या चार हजार रुपयांतून नामांकित कंपन्यांचे शेअर्स या डिमॅट खात्यात खरेदी करावे. शेअर बाजारात योग्य पद्धतीने आणि मार्गदर्शनाखाली काम केल्यास नक्कीच आपल्याला आर्थिक फायदा होतो. यासाठी ‘एचके लर्निंग अँड एनएए’ सदैव आपल्या सेवेस तत्पर 
हेच. एक युनिक आयडीया घेऊन ही संस्था आपल्या उत्पन्न वाढीसाठी कार्यरत आहे. 

आपला संपूर्ण लेख वाचून झालाच असेल. आता शांत बसून स्वत: आत्मपरिक्षण करा, आपल्या आयुष्यात आपण वरीलप्रमाणे करत आहोत का? करत असाल तर अभिनंदन आपल्या आयुष्याचा हा महाप्रवास यशस्वीच होणार आहे. कुठल्याही प्रकारची चिंता नसावी. मात्र वरीलप्रमाणे जर होत नसेल, कुठल्याही प्रकारचे नियोजन न करता आपण जगत असाल, तर आजच सावध व्हा! आर्थिक नियोजनाला लागा. नाहीतर या आयुष्याच्या महाप्रवासात पदोपदी संकट आपला अंत पाहण्यास मागेपुढे बघणार नाही. मग काय, करतायना..! चांगल्या कार्याला आजपासूनच प्रारंभ. अापण सर्वांना या आयुष्याच्या नियोजनबद्ध महाप्रवासाला खुप खुप शुभेच्छा! चला तर मग आता वेळ झाली निरोपाची पुन्हा भेटुया याच ठिकाणी आपल्या आवडत्या ‘एचके ब्लॉग’वर एका नव्या कौटुंबिक विषयासह तोपर्यंत बाय बाय, टाटा, सीयू....


लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली