गर्दीतले एकटेपण...!
एचके लर्निग अँड एनएए
सांस आती है साँस जाती है
आंसुओं की घटाएं पी पी के
अब तो कहता है यही प्यार मेरा
ज़िंदा रहने के लिए तेरी कसम
इक मुलाक़ात ज़रूरी है सनम
अशी अवस्था आयुष्य जगत असताना अनेकदा प्रत्येकाकडून अनुभवली जातेच. पैसा, एैश्वर्य सर्वकाही जवळ असतं, मात्र अंतर्मन अस्वथ असतं. अवघ जगणंच अर्थहीन वाटायला लागतं. एकांतात ओक्साबोक्सी रडावेसे वाटते. भोवताली लोकांची गर्दीच-गर्दी असते, मन मात्र एकटेपणाने ग्रासलेलं असतं. असं का होतं? याचा शोध वेळीच लागायला हवा. अन्यथा मानसिक व्याधींमुळे भोवतालचा काळोख गडद होत जातो. गर्दीतला एकटेपणा जिवघेणा का ठरतो? याचे उत्तर एकचं, अन् ते म्हणजे, मन प्रिय व्यक्तीला कावरं-बावरं होऊन शोधत असतं. ही प्रिय व्यक्ती कुणीही असू शकते. आई, बाबा, पत्नी, मुलं, भाऊ, मित्र, या प्रिय व्यक्तीचा दिर्घकाळ दूरावा जिवघेणाच असतो. भोवताली कितीही आनंद असू द्या, ही प्रिय व्यक्ती सोबत नसली तर सर्व शून्यच असते.
पाऊले चालती पंढरीची वाट
प्रिय व्यक्तीचा सहवास म्हणजे पंढरीच. भेटी लागे जिवा... म्हणजे भेट झाल्याशिवाय कुठेच जिव लागत नाही. एकटेपण का? कशामुळे? ही दोन उत्तरं शोधली की, प्रिय व्यक्तीचे अस्तित्व अतर्मनात जाणवायला लागतं. आपण भौतिक वातावरणाशी एवढे एकरूप झालेलो असतो की, अंतर्मनाची हाक एैकायलाच येत नाही. मनात डोकावता आलं पाहिजे. त्यामुळे अनेक मानसिक व्याधींचा गुंता सोडवता येतो. त्यातलाच हा एकटेपणाचा गुंता. जो प्रिय व्यक्तीच्या दुराव्याने वाढतच जातो. म्हणून प्रिय व्यक्तींचा ठाव घ्या... त्यांच्याच सहवासात जगण्याचं जिवंतपण दडलयं... मग ते प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष..!
मंतरलेले क्षण
बालपणापासून तर आतापर्यंत अनेक चांगल्या-वाईट घटना आपल्यासोबत घडलेल्या असतात. या घटना साठा म्हणून मनात चिरंतन राहतात. वळोवेळी मन या घटनांमध्ये फेरफटकाही मारत असते. ज्या घटनांमध्ये मन फेरफटका मारत असेल तस-तसा परिणाम मनावर होत असतो. मन प्रसन्न करणाऱ्या घटणा म्हणजेच मंतरलेले क्षण. मंतरलेले क्षण म्हणजे नक्कीच प्रिय व्यक्तींच्या सहवासातले क्षण. जेव्हा जेव्हा भोवतालची परिस्थिती मन त्रस्त करणारी असेल, तेव्हा तेव्हा या मंतरलेल्या क्षणांच्या आठवणीत तल्लीन होता आलं पाहिजे, किंवा प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या सहवासात वेळ घालवता आला पाहिजे. म्हणून मनात ठाण मांडून असणारी प्रिय व्यक्ती कोण? याचा ठाव घ्या.
मी माझा नव्हेच...!
मी जर माझा असतो, तर मनाने माझंच एैकलं असतं? हा निरुत्तरीत करणारा प्रश्न सर्वांनाच पडतो. आयुष्य जगत असताना मन अर्पण होत जगत जातं. आयुष्याचा प्रवास अखंडीत चालू असतो. मन मात्र ठिकठिकाणी गुंतत जातं, तेही कायमचं. आपुलकीतून निर्माण होणारा हा बंध म्हणजे दैवी देणगी असते. ही देणगी निरागस जपता आली पाहिजे. सोबत असो वा नसो ‘तू मी अन् मी तू’ असं भावविश्व निर्माण करता आलं पाहिजे, म्हणजे एकटेपण ग्रासत नाही.
पती-पत्नीत भाव हवे मैत्रीचे...!
पती-पत्नीच्या नात्यात मैत्रीचे भाव असायलाच हवे. मैत्री म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेलं निरागस नातं. आयुष्याच्या रंगमंचावर संसार नावाच नाटक रंगवताना या दोघांना भूमिका बदलवता आली पाहिजे. मनात स्वतंत्र हृदयस्पर्शी भावविश्व निर्माण करता आलं पाहिजे. या भावविश्वातली एकरूपता म्हणजेच ‘तू मी अन् मी तू’. गर्दीतल्या एकटेपणाचे अजून एक कारण म्हणजे पती-पत्नी मध्ये होणारी ‘तू-तू, मै-मै’. यामुळे दूरावा वाढून आपणच एकमेकांचे जिवलग आहोत याचा विसर पडत जातो. ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना..! याची जाणीव असतानाही तुच माझा/माझी सखा/सखी लक्षात न येणं सर्वात मोठी शोकांतीकाच म्हणावी लागेल.
दृष्ट लागण्याजोगे सारे,
गालबोटही कुठे नसे,
जग दोघांचे असे रचू की
स्वर्ग त्यापुढे फिका पडे!
असंच प्रत्येक पती-पत्नीने मैत्री भाव जपत आयुष्य जगल्यास गर्दीतला एकटेपणा नक्कीच टाळता येईल.
लेखक : कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्लेषक आहेत.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
👌👌👌👌
उत्तर द्याहटवा