योग : निरोगी जगण्याची कला
आनंदी अन् निरोगी जगण्यासाठी निसर्गाने आपल्या भोवताली खजिनाच उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातलाच एक खजिना म्हणजे योगसाधना. निरोगी राहण्यासाठी योग्य आहारासह विविध योगासनांची माहिती असणे गरजेचे आहे. ही आसने नियमत केल्यास विविध शारीरिक वेदनांना लांब ठेवता येते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून विविध रोगांविरूद्ध लढण्यास आपले शरीर सक्षम बनते. परंतु ही आसने करताना काही नियमांचे पालनही करणे तेवढेच महत्वाचे आहे. अन्यथा, फायद्या ऐवजी नुकसानच सहन करावे लागू शकते.
नियम पाळत करा सुरवात
सुरुवातीस कठीण आसन करू नये. प्रथमच योगा करत असाल तर सोपे आणि सरळ आसने करावीत. जेणे करून स्नायूंना त्रास होणार नाही. योगा करण्यासाठीचे कपडे योग्य असावीत, जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर कपडे वापरू नये. आपण सहजपणे योगा करू शकाल असेच कपडे वापरावीत. योग आसनाची व्यवस्थित माहिती करून घ्यावी. आसने तीच करावीत ज्या आसनांबद्दल योग्य माहिती असेल. चुकीची आसने करू नये. योगा करताना पाणी पिणे टाळा. योग करताना शरीरातील तापमान वाढते आणि अशावेळी पाणी पिणं म्हणजे संकटांना आमंत्रणच म्हणावे लागेल. खोकला, सर्दी, तापही येऊ शकतो. योगाभ्यास झाल्यानंतर १५ मिनिटानंतर पाणी प्यावे.
अधोमुख श्वानासन
अधोमुख श्वानासन
या आसनाचा सराव केल्याने तणाव, चिंता, नैराश्य आणि निद्रानाश यासारख्या समस्या सूटण्यास मदत होते. यासाठी अधोमुख श्वानासन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायला हवी. हा योगा करताना चटईवर पोटावर झोपावे. श्वास घेताना, पाय आणि हातांवर शरीर उचला आणि टेबल सारखा आकार बनवा. श्वास सोडताना, कूल्हे हळू हळू वरच्या दिशेने वाढवा. आपले कोपर आणि गुडघे घट्ट ठेवा. यावेळेस शरीराचा उलटा ‘V’ आकार बनतो. या आसनाच्या अभ्यासादरम्यान खांदे आणि हात सरळ रेषेत असले पाहिजे. आता हात खाली जमिनीवर दाबा. मान लांब करण्याचा प्रयत्न करा. आपले कान आपल्या हातांच्या आतील भागाला स्पर्श करत रहा. आपली नजर नाभीवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद धरून ठेवा आणि त्यानंतर गुडघे जमिनीवर ठेऊन पुन्हा टेबल स्थितीवर परत या.
स्वस्तिकासन
स्वस्तिकासन
या आसनाचा निरंतर अभ्यास केल्यास पाय दुखणे, अनावश्यक घाम येणे या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच शरीरिातील गरम किंवा थंडपणा दूर होतो. विशेषकरून ध्यानासाठी ही एक चांगली मुद्रा मानली जाते. हे आसन करताना मॅटवर पाय पसरुन बसा. डावा पाय गुडघ्याकडून वाकवून उजव्या मांडी आणि पिंडली (गुडघ्याची खालील बाजू) मध्ये अशा प्रकारे स्थापित करा की डाव्या पायाचा तळ लपेल. यानंतर, उजव्या पायाची बोटं आणि तळाला डाव्या पायाखाली मांडी आणि नडगी यांच्यामध्ये ठेवून स्वस्तिकासन तयार होते. ध्यान मुद्रा मध्ये बसा आणि मणकं सरळ ठेवून शक्य तितका श्वास धरा. पाय बदलून तीच प्रक्रिया करा.
गोरक्षासन
गोरक्षासन
या आसनामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते. स्नायूंमध्ये योग्य रक्ताभिसरण होऊन निरोगी आयुष्य प्राप्त होते. इंद्रियांची चंचलता दूर करून मनाला शांती प्राप्त करण्यासाठी हे आसण खूपच महत्त्वाचे मानले जाते. नैसर्गिकरित्या मूलबंध लागू करण्यासाठी आणि ब्रह्मचर्य टिकवून ठेवण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. हे आसन करताना दोन्ही पायांच्या टाचा आणि बोटे समोर ठेवा. आता सिवनी नाडी (गुद्द्वार आणि मूत्रमार्ग दरम्यान) टाचांवर ठेवून त्यावर बसा. दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवा. ज्ञान मुद्राच्या स्थितीत हात गुडघ्यांवर ठेवा.
वीरभद्रासन
वीरभद्रासन
हे आसन नियमत केल्याने पाय आणि बाजुंना शक्ती मिळते. शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. हे आसन करताना सरळ उभे राहणे गरजेचे आहे. दोन्ही पायांमध्ये ३ ते ४ फूट अंतर ठेवावे. खोल श्वास घेत दोन्ही हात जमिनीच्या समान्तर वर उचला आणि आपली मान उजवीकडे वळवा. नंतर श्वास सोडा आणि आपल्या उजव्या पायाला ९० डिग्रीमध्ये वळवून हळूहळू उजवीकडे वळवा. अशाच अवस्थेमध्ये काही वेळासाठी स्थिर राहा. ही क्रिया ५ ते ६ वेळा करता येईल.
- कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा