भगवत गीता : यश अन् आनंदाचा राजमार्ग

VHKL : श्रीमद् भगवतगीता : यश आणि आनंदाचा राजमार्ग : भगवतगीता, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली परमेश्वरी दिव्य वाणी, केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर त्यात जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे समाधान आहे. तरुणांसाठी तर ते एक अनमोल मार्गदर्शक आहे, जे त्यांना सकारात्मक दृष्टिकोन देत, योग्य आध्यात्मिक मार्गावर चालायला शिकवते. आयुष्यात सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भगवतगीता आपल्याला या दोन्ही परिस्थितीत समत्व कसे राखायचे हे शिकवते. जेव्हा आनंद असतो तेव्हा हुरळून जायचे नाही आणि दुःख आले की खचून जायचे नाही, हे गीतेतील महत्त्वाचे सार आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, "सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।" याचा अर्थ सुख-दुःख, लाभ-हानी आणि जय-पराजय यांना समान मानून कर्म करत राहा. अनेकदा तरुण पिढीला त्यांच्या मानसिक अवस्थांबद्दल प्रश्न पडतात. चिंता, भीती, नैराश्य अशा भावनांना कसे सामोरे जावे, याबद्दल भगवतगीतेत स्पष्ट मार्गदर्शन दिलेले आहे. निष्काम कर्मयोगाचा संदेश देताना श्रीकृष्ण म्हणतात, "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।" म्हणजे तू फक्त कर्म कर, फळाची अपेक्षा ...