मुंबई आणि मी
एचके लर्निंग अँड एनएए : दुपारी काम संपवून निवांत झालो. तेवढ्यात मोबाईल वाजला, समोरून साहेब बोलत होते, तुम्हाला उद्या काही दिवसांसाठी मुंबईला जायचे आहे. कुठलाही विचार न करता मी हो सर अस म्हणालो. साहेब साहेब कमी आणि हितचिंतक, मित्र अधिक वाटतात. आयुष्यात जेव्हा आर्थिक गणित बिघडले तेव्हा साहेबांनी मार्गदर्शन आणि पुन्हा आर्थिक घडी बसवण्यात मोलाचे सहकार्य केलेय. त्यांच्याचमुळे आठ वर्षात नियोजित स्वप्न पूर्ण करता आली. नवीन ठिकाणी आणि तेही मुंबईत काम करण्याची संधी मिळत आहे याचा आनंद होता. मात्र कुटुंबापासून एवढे दिवस कस शक्य होईल हा प्रश्न सोडवता येण्यासारखा नव्हता. सकाळी 6 वाजता आम्ही तिघे सहकारी संस्थेच्या गाडीने मुंबईत पोहोचलो. मुक्काम संस्थेच्या गेस्ट हाऊसमध्येच होता. उद्यापासून कामाला सुरूवात होणार होती. गेस्ट हाऊस ते कामाचे ठिकाण साधारणतः 20 किलोमिटर अंतर असेल. त्यात लोकलमध्ये प्रवास करायचा होता. लोकलमधील गर्दी आणि इतर हाल चित्रपटांमध्ये पाहिले होते. आपली गत तशी नको व्हायला असे मनोमन वाटायला लागले होते. तरी मन घट्ट केले आणि 'बी हॅपी विथ बी प्रेझेंट' म्हणत कामाला लागलो. काही दिवसा