आर्थिक विकासाची गुरूकिल्ली



एचके लर्निग अँड एनएए
शेअर बाजारात प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्यात रोज काहीतरी केलेच पाहिजे, हा पवित्रा घेण्यापेक्षा योग्य वेळेस व्यवहार करणे हिताचे ठरते. रोज बाजारावर नजर ठेवा, बाजारातील पडझड पाहा, उत्तम कंपनीचा शेअर्स २० ते ३० टक्के घसरल्यावर त्याला खरेदी करण्यासाठी सज्ज व्हा. या उक्तीनुसार कामकाज केल्यास आपल्याला अपेक्षीत परतावा नक्कीच मिळतो. 

तरबेज ट्रेडर्स बना
गुंतवणूकदार अन् ट्रेडर्स यांनी सेक्टरवर नजर ठेवायला हवी. बाजार तेजीत असतो तेव्हा कुठलेतरी सेक्टर डाऊन ट्रेण्ड असते, बाजारातील तेजी थांबल्यास डाऊन ट्रेण्ड असलेले सेक्टर अप ट्रेण्ड होत असते. हीच ती योग्य वेळ असते. त्या सेक्टर मधील लीडर कंपन्या आपल्याला आर्थिक फायदा करून देण्यास खुणावत असतात. म्हणून सेक्टरवर नजर ठेवत योग्य नियोजन केल्यास आपण नक्कीच तरबेज ट्रेडर्स अन् गुंतवणूकदार बनाल. 

गुंतवणूक अन्‌ नियोजन
‘लाँग टर्म’ गुंतवणुकीसाठी साधी अन्‌ सोपी पद्धत म्हणजे निफ्टी-50, मिड कॅप, स्मॉल कॅप इंडेक्समधील दिग्गज अन्‌ उत्तम परतावा देणाऱ्या कंपन्यांची निवड. सर्वच इंडेक्सच्या रोटेशनवर नजर असायला हवी. इंडेक्सने उच्चांक पातळी गाठल्यावर  खरेदी थांबवायला हवी, किंवा प्रॉफिट बुकिंग करून घ्यायला हवे. इंडेक्स जेव्हा निच्चांक पातळीवर कामकाज करत असेल तेव्हा निवडक अन्‌ टेक्निकली, फंडामेंटली मजबूत असलेल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे केव्हाही आर्थिक हिताचे ठरते. 

संधीसाधू बना
शेअर बाजाराची एक विशिष्ट स्टाईल आहे. जी समजणे कुणालाही शक्य नाही. ज्याला समजली तो शेअर बाजाराचा अविभाज्य घटक समजा. बातम्या शेअर बाजारावर परिणाम करतात, पण तो परिणाम अल्प काळासाठी असतो. विविध बातम्या म्हणजे एक मायाच असते. इकॉनॉमी हाही असाच प्रकार म्हणावा लागेल. या बातम्यांचे काम असते भीती निर्माण करणे अन् उत्साह वाढवणे. शेअर बाजारही यावर रीयाक्ट करतो. मात्र अशा वातावरणात स्वतः हित साधणारा बनता आल पाहिजे. अति उत्साही न होन अन् अति पॅनिक न होन म्हणजे शेअर बाजारातील परांगतता म्हणावी लागेल. यालाच पेशंस म्हणतात. मार्च 2020 मध्ये बाजार कोसळला. मात्र कोसळणे थांबल्यानंतर जे पुन्हा बाजारात सहभागी झाले ते आज मालामाल आहेत. इकॉनॉमी कधीच थांबत नाही. चढ उतार चालूच असतात. संधिसाधू बनता आल पाहिजे. 'डर के आगे जीत है' हेच सत्य आहे.

गुंतवणुकीला पुरेसा वेळ द्या
बाजारातील घसरण किंवा मंदी ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मिळत असलेली संधी असते. दीर्घकालीन गुंतवणूक करताना उत्तम धंदा करणाऱ्या कंपन्यांची निवड करणे आणि त्या गुंतवणुकीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असते. कारण वॉरेन बफे म्हणतात, ‘टाईम इज फ्रेंड ऑफ वंडरफुल बिझनेसेस.’ दीर्घकालीन गुंतवणूक केल्यावर बाजार खूप वर गेला असेल तर ‘अरे वा!’ म्हणत गरज असल्यास आवश्यकतेनुसार नफा घेऊन दोन्ही हातांनी टाळ्या वाजवणे व बाजारात घसरण झाल्यास पुन्हा ‘अरे वा!’ म्हणत योग्य संधी ओळखून खरेदी करीत दोन्ही हातांनी संधीचा फायदा घेणे योग्य ठरते. 

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!