महावैद्यराज एरंडेल वनस्पती
आजच्या बदलत्या व चुकीच्या जीवनशैलीचे आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. विविध कारणांमुळे गुडघ्यांच्या समस्यांनी त्रस्त रुग्ण वाढत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून एरंडेल वनस्पती महावैद्यराज म्हणून उपयोगी ठरत आहे. मानवजातीला ही वनस्पती म्हणजे एक महावरदानच म्हणावे लागेल. विविध आजारांवर रामबाण उपाय म्हणून या वनस्पतीचा उपयोग केला जातो. चिकुन गुनिया, डेंग्यूसारख्या आजारातही सूज आणि जॉइंट पेन कमी करण्यासाठी एरंडेल तेल एक उत्तम पर्याय आहे. एरंडेलचे पानं, खोड, फांद्या, फळं तसेच त्यापासून मिळणारे तेलही आरोग्यवर्धक व बहुगुणसंपन्न आहेत.
संधीवातासह विविध समस्यांवर प्रभावी
एरंडेल तेलात उत्तम परिणामकारक औषधी गुणधर्म आहेत. या तेलाचा उपयोग अंगावरील सूज व नसा मोकळ्या करण्यासाठी होताे. त्याचप्रमाणे डोळ्यांची समस्या, मूळव्याध, खोकला, पोट दुखी इत्यादी समस्यांमध्ये या तेलाचा उपयोग केला जातो. एरंडेल तेलामुळे कप, वात आणि पित्त नियंत्रणात राहते. गुडघेदुखी हे संधीवाताचे एक प्रमुख लक्षण मानले जाते. एरंडेल तेलाच्या वेदनाशामक गुणामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळतो, रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते व अॅन्टीबॉडीज तयार होऊन वेदना कमी होतात. तसेच त्वचेवर एरंडेल तेलाने मॉलीश केल्यास स्नायूंची सूज कमी होऊन नसा मोकळ्या होतात. एरंडेल तेलात रिकिनोलिक एसिड आहे, जे अंगावरील सूज कमी करण्यास सहाय्यक ठरते.
बद्धकोष्टतेवर रामबाण उपाय
पोट साफ न होण्याची समस्या बहुधा अनेकांना असते. यापासून भविष्यात विविध आजार वाढत जातात. बद्धकोष्टतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी एरंडेल तेल खूपच गुणकारी आहे. शिवाय एरंडेल ही एक आयुर्वेदीक वनस्पती असून कुठलाही साइड इफेक्ट होत नाही. पोट साफ होण्यासाठी दररोज रात्री झोपण्याआधी एक चमचा एरंडेल तेल पिल्यास बद्धकोष्टतेपासून नक्कीच आराम मिळतो. एरंडेल तेलामध्ये लेक्सटिव असल्याने पोट साफ होण्यास मदत होते.
वजन, चरबीसाठी मारक
अनावश्यक चरबी आणि वाढत्या वजनापासून मुक्ती मिळवण्यासाठी एरंडेल वनस्पती महावैद्यराज म्हणून काम करते. दोन ग्लास गरम पाण्यात अद्रक टाकून उकळावे, जेव्हा पाणी उकळताना अर्धे राहील तेव्हा पाण्याला एका भाड्यात गाळून घ्यावे. यानंतर या पाण्यात ग्रीन टी आणि एरंडेल तेलाचे काही थेंब टाकावेत. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पिल्यास वजन कमी होऊन पोटाची चरबी कमी होते. मात्र वजन व चरबी नियंत्रणात आल्यानंतर हा प्रयोग थांबवायला हवा. गरजेनुसार वापर करायला हरकत नाही.
सर्दी-खोकल्यात उपयोगी
सर्दी-खोकला झाल्यावर एरंडेल तेल गरम करून नाक आणि छातीवर लावल्यास आराम मिळतो. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीसुद्धा एरंडेल तेलचा वापर केला जाताे. चेहऱ्यावरील डागांसाठी एक चमचा एरंडेल तेलात थोडा खाण्याचा सोडा टाकावा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी निघून वांग व काळे डाग फिकट होतात. नियमित हा प्रयोग केल्यास हळूहळू हे डाग कायमचे मिटतात.
केसांचे आरोग्य सुधारते
केसांच्या आरोग्यासाठी एरंडेल तेल खूप उपयोगी मानले जाते. एरंडेल तेलामुळे केसांना योग्य पोषण मिळते. या तेलात रेसिनोलेईक ॲसिड सोबतच ओमेगा 6 आणि आवश्यक फॅटी ऍसिड आहेत. ज्यामुळे डोक्यातील रक्त प्रवाह सुरळीत होऊन केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. केसांमध्ये एरंडेल तेल लावल्याने केसांची पौष्टिकता वाढून केस वाढीस लागतात. केसांमधील डेंड्रफ, बॅक्टेरियल इन्फेक्शन घालवण्यासाठी एका वाटीत थोडेसे नारळाचे तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून केसांवर हळूवार मॉलीश करावी. असे केल्याने केसांमधील डेंड्रफ, बॅक्टेरियल इन्फेक्शन समस्या दूर होते.
पोटदुखीसाठी उपयोगी
पोटात दुखत असेल किंवा अपचनाची समस्या होत असेल तर ऐरंडेल तेल बेंबीत टाकून मालिश केल्याने आराम मिळतो. यासाठी रात्री झोपण्याआधी 10-15 ऐरंडेल तेलाचे थेंब बेंबीत टाकावे आणि यानंतर पोट व ओटीपोटावर मालिश करावी. असे केल्यास पोटदुखीपासून आराम मिळतो.
- कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा