बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी
आयुष्यात पैसा किती महत्त्वाचा आहे, हे आपण रोजच अनुभवतो. आयुष्य सर्वसंपन्न व्हावं यासाठी बचत आणि गुंतवणूकीचा मार्ग निवडला जातो. योग्य मार्गाने धन-संपत्तीचे नियोजन केल्यास नक्कीच ध्येय प्राप्ती होते. यासाठी विविध साधनांचा वापर केला जातो. त्यातलाच एक भाग म्हणजे बचत अन् गुंतवणूक. बचतीवर व्याजाच्या रूपात अल्प परतावा मिळतो. तर गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याची अपेक्षा केली जाते. मात्र यासाठी योग्य मार्गदर्शक अन् मार्गदर्शन असणे गरजेचे आहे. ‘एचके लर्निंग’कडून हीच सेवा पुरवली जाते. शेअर बाजारातून आपल्या गुंतवणूकीवर जास्तीत जास्त परतावा मिळावा यासाठी सखोल अभ्यासातून आपले मार्गदर्शन करत आपल्यासाठी आपल्याच डिमॅट खात्यात काम केले जाते. यासाठी https://hklearning-naa.blogspot.com या संकेतस्थळाला भेट देऊन आपले रजिस्ट्रेशन करता येईल. किंवा 8149347309/ 7266347309 या क्रमांकावर संपर्क साधावा.
बचत : सुरक्षित भविष्याची हमी
बचत : सुरक्षित भविष्याची हमी
बचत (सेव्हिंग) आणि गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) हे स्वत:च्या आर्थिक विकासासह देशाच्या विकासासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण घटक मानले जातात. सेव्हिंग म्हणजे बँक, पोस्ट ऑफिस यामध्ये काही कालावधीसाठी ठेवलेली रक्कम. या रकमेवर प्रत्येक तीन महिन्यानंतर ठराविक व्याज दिले जाते. रिर्झव्ह बँकेने व्याजदर वाढवला की इतर बँकाही व्याजदर वाढवतात. परिणामी, बचतीचा व्याजदर वाढतो. जेणेकरून अधिकाधिक लोक बचत करतात. यातून कासवगतीने आपली जमापुंजी बँकेत वाढत राहते. या जमापुंजीचा उपयोग भविष्यात लागणाऱ्या मोठ्या रकमेसाठी केला जातो. बचत करणे ही चांगली सवय आहे. वाईट व्यसन लावण्यापेक्षा बचतीची सवय लावणे म्हणजे आर्थिक संकटांवर मात करणे असेच म्हणावे लागेल.
गुंतवणूक : आर्थिक समृद्धीचा मार्ग
गुंतवणूक : आर्थिक समृद्धीचा मार्ग
बचतीपेक्षा गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. गुंतवणूकीसाठी योग्य आणि सुरक्षित माध्यम निवडल्यास उत्तम अन् अपेक्षेपेक्षाही जास्त परतावा मिळू शकतो. यासाठी शेअर बाजार हे माध्यम सुरक्षित आणि पारदर्शक आहे. आपल्या डिमॅटमध्ये असलेल्या शेअर्सवर आपणास जास्तीत जास्त परतावा तर मिळतोच शिवाय बोनस, लाभांशही दिला जातो. डिमॅट ब्रोकरच्या माध्यमातून मॅनेज केले जाते. सीडीएसएल, एनएसडीएल या दोन सरकारी संस्थांकडे डिमॅट खाते उघडता येते. या संस्था गुंतवणूकदार आणि कंपन्यांमधील दुवाच म्हणता येईल. शेअर बाजारातील व्यवहार पूर्णत: पारदर्शक आहेत. त्यामुळे हे माध्यम गुंतवणूकीसाठी सुरक्षीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यतीरिक्त गुंतवणूकीसाठी बरेच मार्ग उपलब्ध आहेत. जसे सोने, सरकारी बाँड, म्युच्युअल फंड, विविध सरकारी, खासगी संस्थांच्या योजना; मात्र याठिकाणी गुंतवणूक करताना सुरिक्षतेची हमी अन् खात्री असायला हवी.
शेअर्स : स्वप्नपूर्तीचे अर्थदूत
शेअर्स : स्वप्नपूर्तीचे अर्थदूत
शेअर बाजारात विविध कंपन्यांचे शेअर्स म्हणजे स्वप्नपूर्तीचे अर्थदूतच म्हणावे लागेल. येथे शॉर्ट टर्म आणि लाँर्ग टर्म गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवता येतो. यासाठी महत्त्वाच्या क्षेत्रातील लिडर कंपन्यांची निवड करणे गरजेचे असते. टेक्निकल अभ्यासातून शेअर्स खरेदी-विक्रीत निपूणता प्राप्त झाली की, स्वप्नपूर्तीकडे मार्गक्रमण झालेच समजा. वर्षभर उत्तम शेअर्सची निवड करून खरेदी करावी. योग्य संधी मिळताच प्रॉफिट बुकिंग करावे. शेअर बाजारात अगदी १०० रुपयांपासूनही सुरूवात करता येते. यासाठी हवी आहे इच्छाशक्ती अन् निर्णय क्षमता. आपल्या डिमॅट खात्यात अगदी १ शेअर्स सुद्धा खरेदी करता येतो. समजा आपण प्रत्येक महिन्यात आपल्या डिमॅट खात्यात ३ हजार रुपये गुंतवत असाल; तर वर्षभरात आपल्या डिमॅट खात्यात ३६ हजार रुपयांची गुंतवणूक होते. यावर ३० टक्के प्रॉफिट जरी म्हटले तरी १० हजार ८०० रुपये आपल्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो. हीच प्रक्रिया प्रत्येक वर्षी केल्यास नक्कीच आपले ‘सेकंड अर्निंग’ निर्माण होऊन आपल्या जमापुंजीमध्ये वाढ होण्यास मदत होते. ज्याचा उपयोग आपण आपल्या गरजेनुसार करू शकतो.
- कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा.
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा