यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना


एचके लर्निग अँड एनएए :

चलते चलते यूँ ही रुक जाता हूँ मैं
कहते कहते ही चुप हो जाता हूँ मैं
क्या यही मार्केट है, क्या यही मार्केट है
हाँ यही मार्केट है, हाँ यही मार्केट है..!

शेअर बाजारावर प्रेम जडल की असंच काहीसं होतं. पण मित्रांनो, प्रेम आंधळ असतं असं म्हणतात. येथे व्यवहार नसतोच. म्हणून प्रेम फक्त आपल्या प्रियजनांवर करा..! शेअर बाजारावर नाही..! शेअर बाजारात उत्पन्न वाढीसाठी सखोल अभ्यासातून केलेल्या व्यवहाराला महत्त्व असतं..! जो शेअर तेजीत तो आपला अन्‌ जो मंदीत त्यासोबत पॅकअप...! चढ-उतार हा बाजाराचा मुळ स्वभाव. येथे दोन प्रकारचे वर्ग काम करतात. एक वर्ग जो तेजीत सहभागी होऊन आपले उत्पन्न वाढवतो, तर दुसरा वर्ग मंदीत. याचा अर्थ असा होताे की, बाजार तेजीत असो वा मंदीत दोन्ही बाजूने येथे काम करता येते. परंतु एकाच ट्रेडर्सने हे दोन्ही मार्ग अवलंबणे म्हणजे फार मोठी रिस्क असते. शिवाय डोक्यातला केमिकल लोचा वाढण्याची दाट शक्यता असते. यात मानसिक आजारही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शक्यताे कुठला तरी एकच मार्ग अवलंबवावा, जेनेकरून शेअर बाजारात काम करणे सोपे आणि सुरक्षित राहील. शेअर बाजाराला एक व्यवसाय म्हणून पाहा! सट्टा म्हणून नाही! सट्टेबाज न होता तरबेज ट्रेडर्स बना..!

शेअर बाजारात संधीसाधू बना
शेअर बाजाराची एक विशिष्ट स्टाईल आहे. जी समजणे कुणालाही शक्य नाही. ज्याला समजली तो शेअर बाजाराचा अविभाज्य घटक समजा. बातम्या शेअर बाजारावर परिणाम करतात, पण तो परिणाम अल्प काळासाठी असतो. विविध बातम्या म्हणजे एक मायाच असते.  या बातम्यांचे काम भीती निर्माण करणे अन् उत्साह वाढवणे. शेअर बाजारही यावर रीयाक्ट करतो. मात्र अशा वातावरणात संधिसाधू बनता आले पाहिजे. 

टेक्निकल अभ्यासूनच ट्रेड करा
काही ट्रेडर्स मोठे करेक्शन झाल्यानंतर बाजारात सहभागी होत असतात. तर काही ट्रेडर्स बाजारात छोटे करेक्शन झाले तरी बाजारात सहभागी होतात. या ठिकाणी निश्‍चित करणे गरजेचे असते की आपण कुठल्या प्रकारचे ट्रेडर्स आहोत. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असेल. यात शंकाच नाही. ज्याला जी पद्धत जमेल ती अवलंबवावी. यासाठी आपली स्वत:ची आपल्या अनुभवानुसार कामाची सिस्टम बनवणे फार गरजेचे असते. शेअर बाजारातील टेक्निकल नॉलेज असणे फार गरजेचे आहे. म्हणजे ब्लाईंड गेम येथे नकोच. बाजाराची टेक्निकल स्थिती अभ्यासूनच ट्रेडिंग करणे कधीही फायद्याचे ठरते. 

अपघात संकेत तेथे सावधानता
‘डर के आगे जीत है..!’ जिथे भीती तिथे पडझड..! जिथे पडझड तिथेच संधी..! म्हणून बारकाईने शेअर बाजाराला अभ्यासले असता ‘डरना मना है..! हेच शिकायला मिळते. जिथे-जिथे अपघाताचा संकेत तिथे-तिथे सावधानता महत्त्वाची असते. हा संकेत अन्‌ सावधानता शेअर बाजारच शिकवत असतो. आपापले ध्येय साध्य करण्यासाठी अनुभवानेच हे कौशल्य अवगत होते..! हे कायम लक्षात असायला हवे..! म्हणजे फसगत होत नाही. शेअर बाजारात काम करत असताना अनुभवांचा साठा वाढत राहतो. हे अनुभव आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उपयोगी ठरतात. या साठवलेल्या अनुभवांचा उपयोग करता आला पाहिजे. शेअर बाजारात काम करत असताना सेक्टरवर नजर असायलाच हवी. म्हणजे काय खरेदी करावे आणि काय विक्री करावे याचा निर्णय घेणे सोपे होते. 

स्वतः अनुभव घेत काम करा
शेअर बाजारात पारंगत होण्यासाठी कायम शिकावे लागते. रोज नवनवीन फंडे येथे शिकायला मिळतात. ट्रेडर्स आपापले सेटअप तयार करून त्यानुसार येथे काम करतात. शेअर बाजारात ट्रेडिंगचे काही प्रकार असतात. इंट्रा डे, स्विंग ट्रेड, शॉर्ट टर्म, लाँग टर्म हे चार प्रकार महत्वाचे आहे. ज्यांनी शेअर बाजारात नुकतेच काम करायला सुरुवात केली असेल त्यांनी आजच एक सेटअप तयार करावा. लाँग टर्म, शॉर्ट टर्म, स्विंग ट्रेड आणि शेवटी इंट्रा डे ट्रेडिंग अशा क्रमाने स्वतः अनुभव घेत काम करायला हवे. असे केल्याने मार्केट अभ्यासायला भरपूर वेळ मिळतो. प्रॉफिट कसे मिळते हे समजायलाही सोपे जाते. अशा प्रकारे शेअर बाजारात काम करताना स्किलही वाढत जाते. जे पुढे आपल्याला यशस्वी ट्रेडर्स बनण्यास मदतगार ठरते.

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली