भविष्य आर्थिक विकासाचे


एचके लर्निग अँड एनएए :
शेअर बाजाराच्या भूतकाळात डोकावले असता अचंबित करणारा इतिहास समोर येतो. १९८६ साली सेंसेक्सचा निर्देशांक १०० होता, आणि आता तोच निर्देशांक ६० हजाराच्या पार स्थिरावला आहे. या दरम्यान अनेक गुंतवणूकदार अब्जाधिश, कोट्याधिश झालेले असतील, यात शंकाच नाही. १९८६ पासून २०२० पर्यंत ज्यांचा-ज्यांचा शेअर बाजारात सहभाग असेल त्यांचा आनंद, भावना शब्दात व्यक्त होऊच शकत नाही. ते सत्र संपले, आता २०२० ते २०३० हा दहा वर्षांचा कालावधी पुन्हा तिच अनुभूती देणारा ठरेल, यात किंचीतही शंका नाही. येणारे दशक विकासाचे असणार आहे, मात्र या विकासात आपला सहभाग असला तर तो आनंद घेता येईल. म्हणून शेअर बाजारात गुंतवणुकीची ही वेळ योग्यच आहे. योग्य मार्गदर्शनासाठी ‘एचके लर्निंग’ आहेच. https://hklearning-naa.blogspot.com यावर  रजिस्ट्रेशन करून आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याची हीच सुवर्ण संधी समजायला हरकत नाही. 

बनवा यशोगाथा..! 
परिवर्तन हा जगाचा नियम आहे. प्रत्येकाने स्वत:मध्ये बदल घडवून आणणे गरजेचे आहे. तरच या मायावी जगात आपला निभाव लागेल. नाहीतर आपल्या भोवताली काय चालले आहे, हे कळणारच नाही. आयुष्य फक्त इतरांची यशोगाथा वाचण्यातच घालवू नका. त्या यशोगाथा नक्कीच वाचा, मात्र आपलीही एक यशोगाथा बनवा जी इतर वाचतील. यापुढे जगण्याची, व्यावसायिकतेची पारंपारिकतेशी तडजोड करून आपला व्यवसाय निवडावा लागणार आहे. त्याचसोबत शेअर बाजारातून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवता येईल याचाही विचार होणे गरजेचे आहे. सेव्हिंग्ज्, डिपॉझिट, व्याजावर पैसे देणे अशा माध्यमातून उत्पन्न वाढीची मानसिकता बदलायला हवी. या चौकटीच्या बाहेर येऊन शेअर बाजारासारखा पर्याय आपल्यासमोर खुला आहे. या क्षेत्रात योग्य पद्धतीचा मार्ग अवलंबला तर नक्कीच आपले आर्थिक आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल. 

इच्छाशक्तीला चालना द्या
शेअर बाजारात नेहमीच संध्या उपलब्ध असतातच, त्या शोधता आल्या पाहिजे. ‘एचके लर्निंग’ सारख्या अनेक संस्था सेवाभावी उद्देशाने या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि इतरांना मार्गदर्शकही ठरत आहेत. इच्छाशक्तीला चालना द्या, आणि आपले विश्‍व निर्माण करा. आपला आर्थिक, मानसिक व शारिरीक विकास व्हावा यासाठी ‘‘एचके लर्निंग’’ आपल्यासाठी नेहमीच तत्पर आणि सज्ज आहे. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती जेवढी महत्त्वाची तेवढीच  निर्णयक्षमता महत्त्वाची मानली जाते. शेअर बाजाराला सतत अभ्यासत राहिल्यास ध्येय नक्कीच साध्य करता येते. 

वाचनातून आर्थिक विकास
विविध विषयांवर भाष्य करणारे लेख रोजच प्रसिद्ध होत असतात. आपले वाचन कसे आहे, त्यावर आपला स्वभाव, वर्तन अवलंबून तर असतोच, पण आपला मानसिक, शारीरिक व आर्थिक विकासही त्यावर तेवढाच अवलंबून असतो, हे नाकारता येणार नाही. आयुष्याच्या या महाप्रवासात आपल्याला पदोपदी हे अनुभव येतातच. कथा, कादंबऱ्या, ललित, कविता, नाटके ही साहित्य सहज वाचनासाठी उपलब्ध असून, आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते तेवढेच प्रभावशाली आणि उपयुक्तही आहे. मात्र अर्थकारणावर सहज समजेल असे सोपे लेखन उपलब्ध नसल्याने सर्वसामान्यांना आर्थिक विकासात प्रगती करणे शक्य होत नाही. बारकाईने परीक्षण केले असता, असे निदर्शनात येते की, आर्थिक अडचण ही मानवी आयुष्यात संकट उभे करणारी असते. मात्र ही आर्थिक अडचण कशी दूर करता येईल याचे मार्गदर्शन सहज उपलब्ध होत नाही, किंवा त्यावर तसे भाष्य करणारे लेखनही सहज उपलब्ध होत नाही. ही एक खंतच आहे. आणि म्हणूनच  सर्वसामान्यांना शेअर बाजार नेमका काय आहे, आणि येथे काम कसे केले जाते, हे सहज आणि सोप्या भाषेत समजू शकेल. हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि आनंदाची बाब म्हणजे आपल्या या उपक्रमाला यशही येत आहे. ‘एचके लर्निंग’च्या माध्यमातून ‘एचके ब्लॉक’ याचसाठी समर्पित आहे. 

पडत्याला पकडा वाढत्याला सोडा
शेअर बाजाराचा आपला एक स्वभाव असतो, त्या स्वभावानुसार समतोल साधत काम केल्यास नक्कीच आपले उत्पन्न वाढण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचा स्वभाव म्हणजे चढ-उतार, हे चढ-उतार छोटे-मोठे असू शकतात. त्यानुसार आपल्या कामाची पद्धतसुद्धा असायला हवी. शेअर बाजारात एका विशिष्ट कालावधीनंतर हे चढउतार बघायला मिळतात. ज्याला करेक्शन असे म्हटले जाते. प्रत्येक करेक्शनमध्ये नवनवीन संध्या उपलब्ध होत असतात. याचवेळेस टेक्निकल रिसर्च करून योग्य त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे हे फार महत्त्वाचे असते, आणि जेव्हा बाजारातील करेक्शन संपते तेव्हा बाजार तेजीच्या दिशेने कूच करतो. जिथे पुन्हा बाजार अटकायला लागेल तेथे प्रॉफिट बुकिंग करणे हे आलेच पाहिजे, नाहीतर महाभारतातला अभिमन्यू व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे चक्रव्युहामध्ये प्रवेश करता येतो, मात्र बाहेर पडणे जमत नाही. कुठे खरेदी करावी कुठे विक्री करावी हे समजत नसल्याने अनेकदा डोळ्यासमोर प्रॉफिट दिसूनही प्रॉफिट काढता येत नाही. यालाच महाभारतातल्या अभिमन्यूसारखी अवस्था होणे असे म्हणावे लागेल. म्हणून येथे एकच सांगावेसे वाटते की, आपण जो व्यवसाय किंवा काम करत आहोत त्यातील टेक्निकल माहिती असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचसाठी ‘एचके लर्निंग’ शेअरबाजारातील टेक्निकल माहिती आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहचवत असतो. 

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली