शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता


एचके लर्निग अँड एनएए : 
शेअर बाजारात होणाऱ्या चढउतारांना न घाबरता योग्य संधी शोधणे आर्थिक हिताचे असते. शेअर बाजारातील गुंतवणूक ही संयमाची कसोटी आहे. हा झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग मुळीच नाही. शेअर बाजारात ‘एच के लर्निंग’सारख्या बऱ्याच अभ्यासक संस्था आहेत ज्या योग्य सल्ला देत आपले आर्थिक हित साध्य करण्यास मदत करतात. त्यांच्या मदतीने उत्तम सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागात दीर्घकालीन गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते. दीर्घकालीन दृष्टीकोण ठेवल्यास नक्कीच आर्थिक ध्येय साध्य करता येते. उत्तम कंपन्यांच्या शेअर्सची निवड करून लक्षणीय परतावा मिळवता येतो. असा इतिहास आहे. प्रत्येक महिन्यात शेअर बाजाराच्या चढउतारांवर लक्ष देणे गरजेचे असते. त्याचबरोबर आपल्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमधील लिडर कंपन्यांचे समभाग असायला हवेत. उदा. बँक, आयटी, ऑटो, मेटल, मिडिया, एफएमसीजी, पॉवर, फार्मा अश्‍या सर्वच सेक्टरमधील कंपन्यांचे शअर्स असायला हवेत. अशा पोर्टफोलिओला डायव्हर्सीफाय पोर्टफोलिओ म्हणतात. 

ट्रेडर्सआधी गुंतवणूकदार बना
शेअर बाजारात ट्रेडर्स म्हणून काम करण्यासाठी कमीत कमी एक वर्ष गुंतवणूकदार म्हणून काम करणे गरजेचे आहे. संपूर्ण वर्षभरात शेअर बाजार अभ्यासावा. नंतरच ट्रेडर्स म्हणून काम करावे. यासाठी दोन डिमॅट खाते असायला हवे. एका डिमॅट खात्यातील पोर्टफोलिओचे उद्दिष्ट दिर्घकालीन असावे. दुसरे डिमॅट ट्रेडर्स म्हणून वापरता येईल. यात मंथली, क्वार्टर्ली, हाफ ईयर आणि ईयर ट्रेडिंग असे नियोजन असावे. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शेअर बाजारातील गुंतवणूक अतिशय उपयुक्त ठरते. कमी जोखीम अन्‌ चांगला पूर्वइतिहास असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. निर्देशांक कोसळल्यानंतर समभागांचे मूल्य कमी झाल्यास शेअर्स विकण्याचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. उलट अशावेळेस शेअर्स खरेदी करणे भविष्यात आर्थिक हिताचे ठरते. 

पोर्टफोलिओचा आढावा घ्या
शेअर बाजारात चढउतार होत असताना आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घ्यायला हवा. आर्थिक उद्दिष्टपूर्तीचा अंदाज घेत पुढील नियोजन करावे. वर्षभरात ज्या कंपनीच्या शेअर्सकडून निश्‍चित केलेला परतावा मिळाला नसेल किंवा पुढेही मिळण्याची शक्यता नसेल तेव्हा अशा शेअर्सला पोर्टफोओमधून काढून टाकणेच योग्य ठरते. अशावेळेस इतर कंपन्यांच्या शेअर्सचा टेक्निकल अभ्यास करून पोर्टफोलिओमध्ये समावेश करावा. पोर्टफोलिओचा आढावा घेत राहिल्यास आपण उद्दिष्टांच्या किती जवळ किंवा लांब आहोत हे समजते. नेहमीच आपले निर्णय योग्यच असतील असे समजू नये. परिस्थितीनुसार आपला निर्णय चुकूही शकतो. समजा आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या शेअर्सचे मूल्य सतत घटत असेल तर आपला निर्णय चुकला आहे असे समजायला हरकत नाही. त्या चुकीच्या निर्णयात वेळीच सुधारणा करायला हवी. त्याचप्रमाणे योग्यवेळ आल्यावर प्रॉफिट बुकिंग करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. निर्देशांक कोसळल्यानंतर चांगल्या कंपन्यांच्या समभागांचे मूल्य घटले असेल तर ते समभाग विकत घेणे केव्हाही उत्तम. मात्र अनेक दुय्यम दर्जाचे व अनोळखी कंपन्यांचे समभाग अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत म्हणून त्यांची खरेदी करणे चुकीचे ठरू शकते.

- कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

लोक काय म्हणतील..?

मुझे छू रही हैं..!

के.जी.एफ. : चॅप्टर 2

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

कर्ज हवंय..! मग हे नक्की वाचा..!

विचारांना समजून घेताना

शेअर बाजार समजून घेताना

फॉर्म्युला प्रॉफिट बुकिंगचा..!