मधुमेही अन् उपवास
भारतीय संस्कृती म्हटली की, वर्षभरात विविध उपवास आलेच. त्याला शास्त्रीय आधारही आहे. उपवास करणे आरोग्यासाठी हितकारकच आहे. मात्र उपवास करण्याचे प्रमाणही ठरवले गेले पाहिजे. अति भावूक होऊन आठवडाभरात तीन ते चार वेळा उपवास केले जातात, जे आरोग्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले जाते. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. असे होऊ नये म्हणून आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती देण्याचा प्रयत्न जो नक्कीच आपल्यासाठी आरोग्यदायी ठरेल. उपवास करण्याची तयारी करत असणाऱ्यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. उपवास करतेवेळी काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे जाणून घ्यायला हवे. अन्यथा उपवास करणे जिवावर बेतू शकते. उत्तम आरोग्य असणाऱ्यांसाठी अधिक उपवास करणे तेवढे धोक्याचे नसते. मात्र विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांनी उपवास करतेवेळी खूप काळजी घेणे गरजेचे आहे.
उर्जायुक्त पदार्थांचे सेवन
टाइप २ मधुमेह आजार असणारे उपवास ठेवू शकतात. मात्र त्यांनी याअगोदर आपल्या डॉक्टरांकडून सल्ला घेतला पाहिजे. अशा रुग्णांसाठी गहू, डाळ, मेवे आणि प्रोटीनचा पुरवठा योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. आपण या सर्व वस्तू योग्य प्रमाणात सेवन करत असल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि आपल्यात उपवास करण्याची उर्जाही मिळेल. या व्यतिरिक्त निर्जला व्रत ठेवू इच्छित असणाऱ्यांनी व्रतापूर्वी फळांचे रस, भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.

उपवास ठरू शकतो जिवघेणा
जास्त वेळ उपाशी राहणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अशात मधुमेह रुग्णांचं शुगर लेव्हल अनियंत्रित होऊ शकतं. घाम येणे, कंपन होणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी चुकूनही मिठाशिवाय उपवास करू नये. तसेच या दरम्यान तेलकट पदार्थ खाणे टाळावे. जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्याने इंसुलिनमध्ये समस्या उद्भवू शकते. शगूर वाढल्याचे जाणवू लागल्यास त्वरित तपासणी करून शूगर नियंत्रणात आणावी. शक्यतो आयुर्वेदिक औषधांचा वापरा करा त्यामुळे साईड इफेक्ट टाळता येतात.

काय आणि कसे खावे
रात्री झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवावे, असा सल्ला नेहमीच दिला जातो. मात्र काम किंवा इतर कारणांमुळे होणारे जागरण, लवकर जेवणे यामुळे रात्री उशिरा भूक लागू शकते. अशावेळी वेफर्स, चॉकलेट्स, आईस्क्रीमसारखे अनारोग्यदायी पदार्थ खाल्ले जातात. जे आरोग्यासाठी धोकेदायकच असतात. रात्री भूक लागल्यानंतर खाता येणारे काही आरोग्यदायी पदार्थही आहेत. अशा पदार्थामुळे तुमच्या कॅलरीही वाढणार नाहीत आणि रात्री त्रासही होणार नाही. अशा पदार्थांचा खाण्यासाठी वापर करावा. विविध प्रकारच्या बिया आणि सुका मेवा हे मिश्रण रात्री भूक लागल्यावर खाता येईल. यात भरपूर पोषणमूल्य असतात. मात्र, हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खायला हवेत. रात्रीच्यावेळी उकडलेले अंडंही चालेल. एका मध्यम आकाराच्या उकडलेल्या अंड्यात फक्त ७८ कॅलरी असतात. तसेच अंडी हा प्रथिनांचाही स्रोत आहे. किंवा रात्री झोपताना पाश्चराइज्ड (Pasteurised) गार दुध आणि त्यासोबत २ ते ३ लवंग खाणेही आरोग्यासाठी उत्तम आहे. यामुळे शूगरही नियंत्रणात राहते.

बदाम मधुमेहींसाठी सर्वोत्तम
बदामाच्या सेवनामुळे मधुमेहींना बरेच लाभ होऊ शकतात. मात्र, उष्मांकाचे अधिक प्रमाण असल्यामुळे बदाम मर्यादित प्रमाणात खाणे योग्य ठरते. मधुमेहींनी बदाम कधी आणि किती प्रमाणात खावेत हे नीट समजून घ्यायला हवे. बदामातल्या पोषक घटकांमुळे रक्तातली साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहू शकते, असे काही संशोधनांमधून समोर आले आहे. सुक्या मेव्यामध्ये बदाम मधुमेहींसाठी सर्वोत्तम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातला मॅग्नेशियम हा घटक रक्तातील साखरेची पातळी कमी करायला मदत करतो तर फायबरमुळे पोट बराच काळ भरलेले राहाते. म्हणूनच संध्याकाळच्यावेळी बदाम खाता येतील. शिवाय सकाळच्या वेळेतही बदाम खाणे योग्य ठरते.
सलग उपवास टाळावेत

उपवास करतेवेळी कठीण नियम पाळले जातात. या सर्वांच्या दरम्यान थकणे स्वाभाविक आहे. नवरात्रसारख्या सलग नऊ दिवस उपवासाच्या दिवसांत काही आरोग्य समस्या उद्भवतात, अशक्तपणामुळे चक्कर येऊ शकतात. मळमळणे, अस्वस्थ वाटणे, अंगाचा थरकाप होणे अशा समस्याही उद्भवतात. यासाठी पहिला आणि उत्तम मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. होय, जर तुम्ही दिवसभरात जास्त खात नसाल तर भरपूर पाणी प्या, जेणेकरून शरीर डीहायड्रेट होणार नाही आणि ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहील. अशाप्रकारे, आपल्याला उर्जेची कमतरताही जाणवणार नाही.
प्राणायाम अन् योग्य आहार
प्राणायाम करून , आपण ऑक्सिजनची पातळी वाढवू शकता, जेणेकरून चक्कर येण्याची समस्या होणार नाही. यासाठी दीर्घ श्वास घेणे आवश्यक आहे, जेणेकरून मन, शरीर आणि मेंदू यांच्यात संतुलन राहील. अशा प्रकारे आपण दिवसभर ताजेतवाने राहू शकताे. याचबरोबर आवळ्याचेही सेवन करता येईल. आवळ्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे थकवा कमी जाणवेल आणि रोग प्रतिकारशक्तीही वाढेल. याचबरोबर दही, लिंबूपाणी याचाही आपल्या आहारात समावेश करावा.

लेखक : कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा