इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

एचके लर्निग अँड एनएए :
शेअर बाजार म्हणजे स्वप्नपूर्तीचे माध्यमच मानले जाते. गुंतवणूक म्हटलं की शेअर बाजाराचा संबंध आलाच. शेअर बाजाराची माहिती असणारे स्वत: डिमॅट खात्याद्वारे व्यवहार करतात. तर ज्यांना शेअर बाजारात व्यवहार कसे करतात, याची माहिती नसते ते इतर उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात. यात म्युच्युअल फंड, सरकारी रोखे, डिबेंचर अशा विविध साधनांचा समावेश होतो. आज आपण शेअर, ईटीएफ आणि म्युच्युअल फंड यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे गुंतवणुकीसाठी पर्याय निवडताना गोंधळ होणार नाही.

इक्विटी, प्रेफरन्स अन्‌ डीव्हीआर शेअर
इक्विटी शेअर : जेव्हा स्टॉक एक्सचेंजमध्ये एखादी सूचीबद्ध कंपनी आपले शेअर्स जारी करते तेव्हा त्या शेअर्सला इक्विटी शेअर्स (Equity Share) असे म्हणतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये इक्विटी शेअर्सवरच गुंतवणूक अन्‌ व्यापार केला जातो. यामुळे त्यांना इक्विटी शेअर्सऐवजी शेअर्स म्हटले जाते. कंपनीला झालेल्या नफ्यातून इक्विटी शेअर होल्डरला लाभांश दिला जातो. कंपनी जर घाट्यात असेल तर लाभांश दिला जात नाही. 

प्रेफरन्स शेअर :
शेअर बाजारामध्ये इक्विटी शेअर्स नंतर प्रेफरन्स शेअरबद्दल बरेच बोलले जाते. प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअरमध्ये फारसा फरक नसतो. उदाहरणार्थ प्रेफरन्स शेअर होल्डर कंपनीच्या बैठकीत मतदान (Voting) करू शकत नाही. कारण प्रेफरन्स शेअर होल्डरला मतदान करण्याचा हक्क नसतो. प्रेफरन्स शेअर होल्डरला मिळणारा नफा आधीच निश्चित केला जातो. वर्ष अखेरीस नफा दिला जातो. कंपनीकडून मिळणाऱ्या लाभांशावर पहिला हक्क फ्रेफरन्स शेअर होल्डरचा असतो. नंतर उरलेला लाभांश इतर शेअरधारकांमध्ये वाटप केला जातो.

डीव्हीआर (DVR Share) शेयर : डिव्हीआर शेअर इक्विटी प्रेफरन्स शेअरपेक्षा वेगळा आहे, त्यानुसार डीव्हीआर शेअर होल्डरला फायदे मिळतात. डिव्हीआर शेअर होल्डरला मतदानाचे मर्यादीत अन्‌ निश्‍चित केलेले हक्क असतात. जेथे डिव्हीआर शेअर होल्डरला मतदानाचा हक्क दिला जाईल, केवळ तेथेच मतदान करता येते. इतर ठिकाणी मतदानाचा अधिकार नसतो. 

एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) 
एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा म्युच्युअल फंडसारखाच असतो. ‘ईटीएफ’ शेअर बाजारात ‘लिस्ट’ होत असल्याने शेअरप्रमाणेच खरेदी-विक्री करता येते. ‘ईटीएफ’साठी इक्विटी, बाँड, गोल्ड, करन्सी यासारख्या ‘अंडरलाइंग ॲसेट’ विचारात घेतल्या जातात. ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते असणे आवश्यक आहे. ज्यांना शेअर बाजाराविषयी फारशी माहिती नाही, अशा गुंतवणूकदारांसाठी ‘ईटीएफ’ हा चांगला पर्याय मानला जातो. ‘ईटीएफ’ गुंतवणुकीत परतावा जरी कमी असला तरी रिस्क नसल्यासारखीच आहे. शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यास ‘ईटीएफ’मध्ये एकदम मोठी रक्कम गुंतवणे फायद्याचे असते. बाजार तेजीत असल्यास खरेदी थांबवायला हवी. निफ्टीबीज ‘ईटीएफ’चे उदाहरण घेतले असता जेव्हा निफ्टी-50 मध्ये 100 पॉईंटने वाढ होते तेव्हा निफ्टीबिज ‘ईटीएफ’ 1 रुपयांनी वाढतो. निफ्टीबिज प्रमाणेच विविध लिस्टेट ‘ईटीएफ’ शेअर बाजारात उपलब्ध आहेत. 

म्युच्युअल फंड (Mutual Fund)
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा लाभांश सर्व गुंतवणूकदारांमध्ये समानप्रमाणात वाटून दिला जातो. ॲसेट मॅनेजमेंट कंपनीद्वारे म्युच्युअल फंडाचे मॅनेजमेंट केले जाते. या कंपन्या शेअर्स, सरकारी रोखे, डिबेंचर्स आदी विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडाच्या युनिटची खरेदी-विक्री दिवसाच्या ‘क्लोजिंग प्राइस’नुसार होत असते. ही गुंतवणूक शेअर मार्केटशी निगडीत असते. म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक करणं लाभदायी ठरतं. म्युच्युअल फंड कंपन्यांवर ‘शेअर बाजार नियंत्रक’ अर्थात सेबीचं (Securities and Exchange Board of India) नियंत्रण असतं. ज्या म्युच्युअल फंड कंपन्या कर्ज रोख्यात गुंतवणूक करतात त्या कंपन्यांच्या योजनांना डेट फंड म्हटले जाते. काही कंपन्या थोडा हिस्सा शेअर्समध्ये तर थोडा कर्ज रोख्यात गुंतवतात. अशा योजनांना हायब्रीड फंड्स म्हणून ओळखले जाते. याशिवाय बाजारात लिक्विड फंड आणि गोल्ड म्युच्युअल फंडदेखील उपलब्ध आहेत. याचबरोबर स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा मल्टी कॅप असे प्रकारही म्युच्युअल फंडात पाहायला मिळतात. ओपन एन्डेड आणि क्लोज एन्डेड असे म्युच्युअल फंड योजनेचे दोन प्रकार आहेत. ओपन-एन्डेड म्युच्युअल फंड योजनेतून केव्हाही बाहेर पडता येते. अगदी एसआयपी सुरू ठेवूनदेखील काही रक्कम काढता येते. क्लोज एन्डेडमध्ये मात्र हा पर्याय नसतो. गुंतवणूकदाराला काही आर्थिक अडचण आल्यास काही महिन्यांकरिता एसआयपी थांबवता येते. क्लोज एन्डेड या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तीन वर्षांची मुदत अनिवार्य असते. त्या आधी त्यातील गुंतवणूक काढता येत नाही. कर बचतीचा लाभदेखील म्युच्युअल फंड योजनांवर घेता येतो.

- कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

लोक काय म्हणतील..?

मुझे छू रही हैं..!

के.जी.एफ. : चॅप्टर 2

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

कर्ज हवंय..! मग हे नक्की वाचा..!

विचारांना समजून घेताना

शेअर बाजार समजून घेताना

फॉर्म्युला प्रॉफिट बुकिंगचा..!