रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

एचके लर्निग अँड एनएए
निसर्ग म्हणजे परमेश्‍वरच..! रोगनिवारण, वेदनाशमन अशा अनेक उद्देशांकरिता वनस्पतींचा वापर होतो. या वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांपासून काढे, अर्क, लेप, चुर्ण, रासायनिक द्रव्यांची निर्मिती होते. ज्यांचा उपयोग आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातो. यालाच निसर्गोपचार म्हणूनही संबोधले जाते. भारतीय ऋषि-मुनींनी प्राचीन काळापासून अनुभवसिद्ध हमखास गुण देणाऱ्या व भारतातील हवामानात चांगल्या रीतीने वाढणाऱ्या वनस्पतींचे जतन केले आहे. तिच परंपरा आजही अखंडित सुरूच आहे. सांगण्याचे तात्पर्य ऐवढेच की निसर्ग ओळखा त्यातच निरोगी राहण्याचं गुपित दडलेलं आहे. आज आपण अश्‍वगंधा आणि शतावरी या दोन वनस्पतींचे औषधी गुणधर्म अन्‌ उपयोग समजून घेऊया. 

आरोग्यदायी अश्‍वगंधा : अश्वगंधा ही एक अशी औषधी वनस्पती आहे, ज्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. ही वनस्पती सदाहरित वनस्पतीमध्ये मोडत असून भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये आढळते. अश्‍वगंधाचा वापर प्राचीन काळापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये केला जातो. या वनस्पतीला भारतीय जिनसेंग किंवा हिवाळी चेरी या नावाने देखील ओळखले जाते. विविध आयुर्वेदिक कंपन्यांनी अश्‍वगंधापासून पावडर, सिरप, गोळ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 

अश्‍वगंधाचा औषधी उपयोग : 
मानसिक ताण-तणावावर अश्‍वगंधा पावडर उत्तम उपाय असून नियमित व योग्य प्रमाणात अश्‍वगंधा पावडर सेवन केल्यास रोप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सदृढ अन्‌ निरोगी बनते. चिंता आणि नैराश्यातून बरे होण्यास अश्‍वगंधा सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे आजारांपासून लवकर बरे होण्यास मदत करतात आणि चैतन्य देतात. मानसिक  संतुलन अनियंत्रित रुग्णांसाठी अश्‍वगंधा एक वरदानच आहे. भावनिक तंदुरुस्तीचे परिपूर्ण संतुलन अश्वगंधा सेवन केल्याने प्राप्त होते. 

गुणकारी शतावरी : शतावरी या वनस्पतीला संस्कृतमध्ये नारायणी म्हणून ओळखले जाते. ही एक पर्णहीन काटेरी वेल आहे. शतावरीच्या लांब व मोठ्या फांद्यांना अनेक पेर असतात. या प्रत्येक पेरावर लहान, हिरव्या, एकाआड एक उपफांद्या असतात. या फांद्यांना ‘पर्णकांडे’ असेही संबोधले जाते. या पर्णकांड्या पानांप्रमाणे भासतात. ही पाने बारीक असून सुरूच्या पानासारखी दिसतात. फांद्यांवर साधारणपणे १ सें.मी. लांबीचे बाकदार काटे असून ते खालच्या बाजूस वाकलेले असताता. शतावरीच्या अनेक फांद्या तयार होऊन लहान काटेरी झुडूप तयार होते.

शतावरीचा औषधी उपयोग : 
शतावरीच्या मुळा आणि अंकुर यापासून रोगनिवारक औषधी बनविली जाते. कफ आणि पित्त कमी करण्यासाठी शतावरीचा उपयोग होतो. स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी शतावरी उपयुक्त माणली जाते. शतावरीचे नारायण तेल हे अर्धांगवायू व संधिवातासाठी वापरले जाते. शतावरीच्या कंदामध्ये सॅपोनिन, ग्लायकोसाइड्‌स, फॉस्फरस, रिबोफ्लेव्हिन, थायमाईन, पोटॅशियम, कॅल्शियम व इतरही रासायनिक द्रव्ये आढळतात. कंदाचा उपयोग पित्तप्रदर, ज्वर, धातुवृद्धी, मुतखडा, अपस्मार व रक्तशुद्धीसाठी केला जातो. कंदाचा उपयोग जनावरांमध्ये विशेषतः गायी, म्हशींमध्ये दूधवृद्धीसाठीही केला जातो. शतावरी कल्प हा शतावरीच्या कंदापासून बनविण्यात येते. मासिक पाळीत अंगावरून खूप स्राव जाणे, नव्याने पाळी येणाऱ्या तरुण मुली व पाळी जाण्याच्या मेनोपॉझच्या काळात या तीनही तक्रारींमध्ये स्त्रियांना शतावरी वनस्पतीची मदत होते. स्त्रियांच्या सुलभ प्रसूतीसाठीसुद्धा शतावरीचा वापरल केला जातो. 


(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

लोक काय म्हणतील..?

मुझे छू रही हैं..!

के.जी.एफ. : चॅप्टर 2

कर्ज हवंय..! मग हे नक्की वाचा..!

विचारांना समजून घेताना

शेअर बाजार समजून घेताना

फॉर्म्युला प्रॉफिट बुकिंगचा..!