के.जी.एफ. : चॅप्टर 2

एचके लर्निंग अँड एनएए :
चित्रपट म्हणजे जगाचा आरसा असे म्हटले तर वावगे ठरू नये..!  विविध विषय हाताळून चित्रपट स्वतःची उंची गाठत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे नवनवीन प्रयोग चित्रपटांत पाहायला मिळत आहेत. तंत्रज्ञाचा पुरेपूर वापर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. यात दक्षिण चित्रपट आघाडी मारत आहेत. कोटी कोटींच्या उत्पन्नाचे पराक्रम ही चित्रपट सहज करतात. नुकताच रिलीज झालेला ‘के.जी.एफ. : चॅप्टर 2’ चित्रपटाने अवाढव्य कमाईचा कोटींचा पराक्रम केलाय. चला तर असं काय आहे या चित्रपटात ते पाहूया..!     

सोने (गोल्ड) एक असा धातू आहे की, कुणालाही मोह आणि आकर्षण झाल्याशिवाय राहत नाही. हजारो वर्षांपासून सोने जमिनितून काढले जाते. जगात ज्यांच्याकडे सोन्याचा मुबलक साठा त्यांची जगावर सत्ता. मग हे सोने मिळवण्यासाठी कोणत्याही थरावर जाण्याची तयारी असते. याच संकल्पनेवर आधारित 2018 मध्ये ‘के.जी.एफ.  : चॅप्टर 1’ चित्रपट बनवण्यात आला होता. हे चित्रपट तुफान गाजले, या चित्रपटाने संबंधितांना मालामाल करून अक्षरश: बॉक्स ऑफिसवर सोन्याचा पाऊसच पाडला. पहिल्या भागात हा चित्रपट ज्या वळणावर येऊन थांबला ते वळण प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारे होते.  बरोबर 4 वर्षानंतर हे तुफान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रेक्षकांच्या उत्सुकतेने  चित्रपटाला अल्पावधीतच एका नव्या उंचीवर पोहचवून ठेवले आहे. हा चित्रपट बघताना आपण खरे सोने बाहेर घेऊन जात आहोत, असा अनुभव प्रेक्षकांना येतो. 

या चित्रपटाच्या  भाग 1 ची कथा ही रॉकी आणि ‘के.जी.एफ.’ भोवती फिरते. मरताना  आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी पॉवरच्या (ताकद) शोधात निघालेला रॉकी ‘के.जी.एफ.’ या सोन्याच्या खाणीचा मालक बनतो. दारिद्र्यात जगणारा हा मुलगा "Powerful people comes from powerful places"  हे वाक्य सिद्ध करून दाखवतो. भाग 1 मध्ये गरुडाला मारून रॉकी राजा बनतो; परंतु खरी लढाई ही येथूनच  सुरु होते. चित्रपटाच्या भाग 2 मध्ये शत्रूंची संख्या व त्यांची ताकदही वाढलेली आहे. गरुडाचा भाऊ अधिरा हा बदला आणि ‘के.जी.एफ.’ मिळवण्यासाठी त्यांची फौज उभी करतो, तर दुसऱ्या बाजूने इनायत खलिल देखील ‘के.जी.एफ.’ ताब्यात घेण्यासाठी जिद्दीला पेटला आहे. काहीही करून कब्जा करने हे त्याचे लक्ष. देशाचा पंतप्रधान रमिका सेनही  ‘के.जी.एफ.’वर कब्जा मिळविण्याच्या तयारीत आहे. ‘के.जी.एफ.’ आणि सोने वाचविण्याचे आव्हान रॉकीसमोर आहे. हा थरार चित्रपट प्रेक्षकांना आपल्या जागेवर खिळवून ठेवणारा आहे. 

‘के.जी.एफ.’ भाग 2 चित्रपट इतका यशस्वी का? हा प्रश्न नक्कीच पडतो. चित्रपट यशाचे  संपूर्ण श्रेय जाते ते दिग्दर्शक व लेखक प्रशांत नील यांना. एका ॲक्शन चित्रपटामध्ये मुलगा व आई यांचे नाते ज्याप्रकारे साकारले आहे, यावरून त्यांच्या कल्पनाशक्तीची जाणीव होते. त्यानंतर जमेची बाजू आहे या चित्रपटाचे संगीत. संगीत दिग्दर्शक रवी बसरूर यांच्या संगीताने प्रेक्षकांच्या मन व  भावनांना स्पर्श केला आहे. तसेच दिग्दर्शकाने चित्रपटातील नायक बेघर दाखवत तो लोकांसाठी हिरो कसा बनतो हे उत्तमप्रकारे दाखवले आहे. चित्रपट पाहताना आपण आपल्या आयुष्याचे हीरो आहोत, ही भावना प्रेक्षकांच्या मनात जिवंत करण्यात प्रशांत नील हे यशस्वी ठरतात. चार प्रादेशिक आणि मूळ कन्नड भाषेत असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवलेली आहे. 

आज बॉलिवूड एकापाठोपाठ दक्षिणेकडील चित्रपटांचे रिमेक करत आहेत.  ‘के.जी.एफ.’सारखे चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होतात आणि भरघोस कमाई करून जातात. नक्कीच ही बॉलिवूडसाठी आत्मचिंतनाची बाब वाटते. अजून किती दिवस लोक रिमेक बघणार? जर बॉलिवूड रिमेकच्या पुढे गेला नाही तर ‘के.जी.एफ.’ आणि येणारे नवीन चित्रपट हे नवनवीन विक्रम प्रस्थापित करणार. हे मात्र खरे..!

मेघनिल उगले
लेखक चित्रपट समीक्षक आहेत. 
Email : Ugalemeghnil@gmail.com
मोबाईल : 9168538581


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

लोक काय म्हणतील..?

मुझे छू रही हैं..!

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

कर्ज हवंय..! मग हे नक्की वाचा..!

विचारांना समजून घेताना

शेअर बाजार समजून घेताना

फॉर्म्युला प्रॉफिट बुकिंगचा..!