मुझे छू रही हैं..!
एचके लर्निंग अँड एनएए :
गाण्याला चित्रपटाचा आत्माच म्हणावा लागेल. गाणे अन् संगीत मिळून अप्रतिम शृंगारच...! शब्दांची जादू मनाला संमोहीत करणारीच असते. गाण्याची तीन ते चार कडवे मात्र ती ऐकत असताना जे चित्र उभे राहते ते थेट मनपटलावरच...! ऐकणारा त्या गाण्यात खराखुरा अभिनय करताना स्वतःला पाहतो. अशी काही गाणी आहेत, की ती मनाला त्याच अवस्थेत घेवून जातात जी अवस्था गाण्यात निर्मित केलेली असते. 1980 साली गीतकार गुलजार यांनी स्वयंवर या चित्रपटासाठी लीहलेल्या गीताने आजही प्रितीच्या भावविश्वात धुंद होऊन विहार करताना प्रत्येकजण स्वतःला पाहतो..!
मुझे छू रही हैं तेरी गर्म साँसें
मेरे रात और दिन महकने लगे हैं
तेरी नर्म साँसों ने ऐसे छुआ है
कि मेरे तो पाँव बहकने लगे हैं
वरील चार ओळीत शब्दांची जादू दिसून येते. प्रेयसी आपल्या प्रियकरासमोर प्रीतीत जणू हरवून गेलेली दिसते. भोवताली रंगबिरंगी फुलांची गर्दी अन् सुगंध दरवळत असल्याचा भास होतो. यातच दोघे मंत्रमुग्ध होऊन देहभान हरवल्यागतच झालेले दिसतात. प्रीतीच्या दंवबिंदूंचा ओलावा दोघांच्या नजरेत दिसतो..! यातच प्रेयसी तिची मनवस्था व्यक्त करताना म्हणते की, तुझा उबदार श्वास माझ्या मनाला असा स्पर्श करत आहे की, त्याने मी रात्रंदिवसी मोहीत होऊन बेधुंद झाली आहे. तुझ्या प्रीतीमय उबदार श्वासाने मनाला असा स्पर्श केलाय, की माझ्या मनावर माझे नियंत्रणच राहिलेले नाही. सतत तुझ्या भेटीसाठी मन आसुसलेले असते..! काव्याच्या चारच ओळी, मात्र कवीने समर्पित प्रेमभावनांचा शब्दरूपी वर्षावच केलेला दिसतो.
लबों से अगर तुम बुला ना सको तो
निगाहों से तुम नाम ले कर बुला लो
तुम्हारी निगाहें बहुत बोलती हैं
ज़रा अपनी आँखों पे पलकें गिरा दो
वरील चार ओळीत कवीच्या कल्पनेला सलाम करावासा वाटतो. चार ओळीत दोघांचा संवाद आणि प्रेयसीने केलेली प्रियकराच्या नयनांची तक्रार खोडकर आणि आपसूकच स्मितहास्य आणणारी ठरते. प्रियकर आपल्या प्रेयसिला लाजलेली पाहून म्हणतो की, मला तू ओठांनी बोलवू शकत नसशील तर तुझ्या नेत्र कटाक्षाने माझे नाव घेत मला बोलव. यावर लाजत आणि मूकसंमती देत प्रियकराला प्रेयसी म्हणते की, तुझे डोळे खूप बोलतात. त्यांना तू आधी बंद करून घे..! या शेवटच्या दोन ओळीत प्रत्येकाला आपापली प्रेयसी समोर लाजत उभी असल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही. फुलं निवडून वेचतात तशी येथे शब्दांची निवड झाल्याचे स्पष्ट जाणवते.
पता चल गया है कि मंज़िल कहाँ है
चलो दिल के लंबे सफर पे चलेंगे
सफर खत्म कर देंगे हम तो वहीं पर
जहाँ तक तुम्हारे कदम ले चलेंगे
या शेवटच्या चार ओळी एकमेकांचे एकमेकांप्रती समर्पण दर्शवतात. ती म्हणते या व्यवहारिक जगात आपल्यासाठी काहीच दिसत नाही. म्हणून आता लक्षात आले आहे, की तू मी आणि मी तूच आहेस, आपली मंजीलही एकच आहे. आणि म्हणून, चल..! या प्रीतीच्या दीर्घ प्रवासाला आपण निघूया..! आणि हो, जोवर तुझा श्वास आहे तोवरच मी हा प्रवास करणार..! सोबतच जगू आणि सोबतच या जगाचा निरोप घेऊ. तुझ्याशिवाय जगणं माझ्यासाठी अश्यक्यच असेल..! अशी प्रेयसीने घातलेली भावनिक साद प्रीतीची महती सांगून जाते. प्रेम म्हणजे केवळ आणि केवळ समर्पणच..! हे सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न येथे कवीकडून होताना दिसतो.
अशी एकना अनेक गाणी आहेत की त्यात आपण हरवून जातो. पुन्हा भेटूया अश्याच ह्रदयस्पर्शी गीतासोबत 'गीत-नाट्य-सिनेमा' या सदरात तोवर आपला निरोप घेतो...! धन्यवाद..!
लेखक : कैलास एन. हिरोडकर
संपादक : एचके ब्लॉग
संचालक : एचके लर्निंग अँड एनएनए
आपले उत्पन्न वाढवा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा