फॉर्म्युला प्रॉफिट बुकिंगचा..!


एचके लर्निग अँड एनएए
मौसम बदल रहा है...! हे नक्की..! याचे कारण मागील डेटा तपासले असता, उत्तर सहज मिळेल. काही ट्रेडर्स मे ते दिवाळीपर्यंत मोठ्या जोमात काम करतात. हे दिग्गज भांडवलदार असतात. मे पासून यांची कामाची गती वाढते. उत्तम स्टॉक निवडून गुंतवणूक होते अन् दिवाळीच्या आधीच म्हणजे एक आठवडा आधी प्रॉफिट बुकिंग करून घेतली जाते. खरी गंमत येथेच असते. जेव्हा प्रॉफिट बुकिंग सुरू असते तेव्हा नवखे, अस्थिर अन् शॉर्ट ट्रेडर्स आपले भविष्य आजमावण्याचे प्रयत्न करतात. साधं गणित आहे. वेळ संपली येथे. दिवाळीचे दोन आठवडे म्हणजे स्वतःला हाय लेव्हलवर खरेदी करून  बाजारात अडकवून घेणेच होय..! म्हणून योग्य वेळ साधता आली पाहिजे. त्यासाठी काळजी नसावी आजच HK Learning सोबत जॉइंट व्हा..! अन् निश्चिंत राहून आपले आर्थिक उत्पन्न वाढवा. 

फटकेबाजी नको, पारखी नजर हवी
शेअर बाजारात फटकेबाजांची काही कमी नाही..! अशा लोकांकडून प्रश्न विचारले जातात. त्यात गंमत म्हणजे, काही लोग जणू भविष्य वर्तवणाऱ्याकडे प्रश्न विचारताय की, काय? असं वाटायला लागत. अन् मग प्रश्न पडतो की, किती गोंधळ असतो डोक्यात, बाजाराविषयी. काही लोक डोळे बंद करून ट्रेड करतात, अन् विचारतात हा शेअर्स जाईल का वर? अशा वेळेस हसावं की गोंधळपणाची कीव करावी, हेच कळत नाही. खात्री नसताना कुणी कस काय ट्रेड करू शकत..?  शेअर बाजार म्हणजे तारक अन् मारकही आहे, हे कळत असताना डोळे बंद करून काम का बर करावं..? शेअर बाजार तारक तेव्हाच होतो जेव्हा गोंधळ टाळून खात्रीशीर काम केले जाते. अन् त्यासाठी बाजाराला सतत अभ्यासणे हाच एकमेव उपाय आहे. डोळे बंद करून फटकेबाजी कराल, तर लवकरच बाजार मारक ठरू शकतो. म्हणून बाजार अभ्यासा, मगच येथे काम करा..! तोही वेळ नसेल तर "एचके लर्निग" आहेच की, नोंदणी करा, डिमॅट खाते उघडा अन् आपले उत्पन्न वाढवा. नोंदणीसाठी https://hklearning-naa.blogspot.com वर क्लिक करा आणि आजच जॉइंट व्हा..!

शिस्त, पेशन्स म्हणजे निपुणता
कोणत्याही कार्यात यशस्वी व्हायचे असेल तर, काही महत्वाचे गुण अंगी असणे आवश्यक असते. शेअर बाजारात अभ्यासुवृत्ती, नम्रता, शिस्त अन् पेशन्स या चार गुणांवर आपले स्वप्न नक्कीच साकार करता येते. डोक्यातला गोंधळ मिटवायचा असेल तर, हे चार गुण आत्मसात करायलाच हवे. सोपं आहे. रोज एक तास जागतिक बाजार अन् आपला बाजार अभ्यासा, निर्णय घ्या, जी गोष्ट समजत नसेल ती शेअर बाजारातील जानकर यांच्याकडे शेअर करा, नम्रपणे समजून घ्या, शिस्त अन् पेशन्सचा वापर करून काम करा... यश नक्कीच मिळणार...! 

समजून घ्या, अवस्था बाजाराची
जसा आपला मुड रोज एकसारखा नसतो, तसाच शेअर बाजार असतो. रोज बाजाराची अवस्था बदलत असते. त्यानुसार काम करता आले पाहिजे. एखाद दिवशी संपूर्ण दिवस बाजार सुस्त असतो, तेव्हा ट्रेडिंग टाळायला हवी. चला तर बाजाराच्या अवस्था कशा असतात ते पाहूया, म्हणजे बाजारात काम करणे सोपे होईल. अप ट्रेण्ड, स्थिर अन् डाऊन ट्रेण्ड या तीन अवस्था प्रत्येकाला माहीत आहे. मात्र डोक्यात गोंधळ असल्याकारणाने या अवस्थांचा विसर पडतो अन् ब्लाइंड वर्क सुरू होते. वरील तीन अवस्था कन्फर्म झाल्याशिवाय ट्रेड करू नये. ट्रेण्ड पकडा, शिस्त पाळत काम करा, यश आपलेच समजा मग..!

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

  1. एचके ब्लॉग शेअर बाजारातील पारदर्शकता समोर ठेवतो... नवीन गुंतवणुकदारांसाठी विश्‍लेषक कैलास हिरोडकर यांचे सर्वच लेख मार्गदर्शक आहेत. आम्ही तरुण मित्रमंडळी ब्लागवरील लेख नियमित वाचन करून आत्मसातही करतो... गेल्या वर्षी आम्ही शेअर बाजारात गुंतवुकीस सुरूवात केली... आज आमचा पोर्टफोलीओ ३० टक्क्यांनी वर आहे... धन्यवाद एचके ब्लॉग आणि लेखकांचेही...
    - शुभम अग्रवाल, राजेश पटेल, शंतनू राकेचा, विक्रोळी, मुंबई

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

लोक काय म्हणतील..?

मुझे छू रही हैं..!

के.जी.एफ. : चॅप्टर 2

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

कर्ज हवंय..! मग हे नक्की वाचा..!

विचारांना समजून घेताना

शेअर बाजार समजून घेताना