लोक काय म्हणतील..?
लेखाचे शीर्षक म्हणजे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारेच आहे. लोक काय म्हणतील..? यात अडकवून ठवलेले मन अन् यासाठीच धडपडणारा अवघा मानव समाज 'अंदर कूछ बाहर कूछ' अशाच अवस्थेत दिसतोय. यात आपणही आलोच. दिवसभरात लोक काय म्हणतील..! याचाच जास्तीत जास्त विचार होताना दिसतो. स्वतःला काय आवडतय हे बाजूला ठेवून, लोक काय म्हणतील...? यावरच आपली आवड-निवड ठरवली जात आहे. कारण आपण सर्वच या समाजमनाचे गुलाम झालेलो आहोत. कळत न कळत या गुलामगीरीचा स्वीकार केलाय आपण..! लोकांसाठी जगणे काही वेळेस आनंद देणारे ठरू शकते. मात्र काही ठिकाणी घातकही ठरते, याचा विचार व्हायलाच हवा..! लोक काय म्हणतील..! यापेक्षा आपले मन काय म्हणेल..! याचा अधिक विचार केल्यास, आंतरिक आनंद प्राप्तीचा मार्ग नक्कीच मोकळा होईल. अन्यथा आयुष्यभर आतल्याआत गुदमरणे नशिबी येईल.
आई-बाबा अन् बेजबाबदार मुलं
मुलांना माया, प्रेम देत आई-बाबा सर्वस्व अर्पण करतात. त्यांना घडविण्यासाठी कुठलीही तडजोड करायला तयार होतात. मुलांना नोकरी, व्यवसाय प्राप्तीपर्यंत आई-बाबा सदैव्य तत्पर भूमिकेतच असतात. भविष्यात तीच माया, प्रेम, आपुलकी, सहवास मुलांकडून अपेक्षित असतो. मात्र काही मुलं याबाबतीत नापास ठरतात. यांनी अंतर्मुख होऊन, आत्मचिंतन करत आयुष्यात उद्भवणारे भावनीक अन् संवेदनशील प्रश्न सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेच पाहिजे..! आई-बाबांना आधाराऐवजी अंधारात का ढकलले जाते..? परिस्थितीला दोषी ठरवून आई-बाबांच्या नशिबी वनवास का दिला जातो..? पटत नसल्याचे कारण देत आई-बाबा नकोसे का वाटतात..? आई-बाबाच समजून घेत नसल्याचे कारण का दिले जाते..! ज्या आई-बाबांनी याच मुलांसाठी सर्वकाही पणाला लावत आजवर समजून घेतलेले असते, तो काय दिखावा होता का..? मग जर तो दिखावा नसेल, तर मग आज तेच आई-बाबा समजून घेत नाही, हे म्हणणे कितपत योग्य ठरते..? अशा मुलांना स्वतःच्या उणीवा का दिसत नाही..? मग अशावेळेस लोक काय म्हणतील..! याचा विचार का होत नाही..? अशा मुलांनी यावर अंतर्मनातून विचार करण्याची आज नितांत गरज आहे..! म्हणजे परिस्थिती वेळीच हाताळणे शक्य होईल. परिस्थिती कशीही असो..! जसं लहानपणी मुलांना समजून घेण्याशिवाय आई-बाबांकडे पर्याय नसतो तसेच आज आई-बाबांना मुलांनीच समजून घेण्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीवही या मुलांना असायला हवी. हीच मुलं जेव्हा लहान अन् हट्टी होती तेव्हा आई-बाबांनी घेतलेचना समजून, कसाही वागलात, कितीही दुखावले तरी दिले का त्यांनी अंतर..! मग आता, आई-बाबांच्या वृद्धापकाळात तोच समजूतदारपणा मुलांच्या अंगी का नसावा..? लोक काय म्हणतील..! यासाठी नव्हे तर अंतर्मन काय म्हणेल यासाठी मुलांना परिस्थिती हाताळता आलीच पाहिजे..! यावर नक्कीच सखोल चिंतन होणे गरजेचे आहे. (प्रेम+प्रेम = प्रेमच, हे विसरता कामा नये.)
खोटे दिखावे बंद करा
आजकाल जे नाही तेच दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. लोक काय म्हणतील..! याची पूर्ती करण्यासाठी कर्जाचा डोंगर वाढवला जातो. महागड्या वस्तू खरेदीसाठी जणू स्पर्धाच भरलेली दिसते. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते नको ती हौस पूर्ण करून घेत आहेत. ज्यांच्याकडे पैसा नाही, तेही त्यांची नक्कल करताना दिसत आहेत, मात्र कर्ज काढून..! जे अती घातक ठरत आहे. म्हणून खोटे दीखावे थांबायला हवेत. योग्य ठिकाणीच पैसा खर्च व्हायला हवा. लोक काय म्हणतील..! याचा विचार करून खर्च होता कामा नये. लग्न म्हटले की, सर्वात मोठा दीखावूपणा..! लोक काय म्हणतील..! या विचारामुळे जवळचे आहे ते विक-टिक करून, लग्न समारंभ साजरे होत आहेत. याला आवर घालण्यासाठी समाजातील सुजाण लोकांनी पुढे येऊन, या दीखावू अन् घातक प्रथा थांबवण्याची गरज आहे. अन्यथा 'एक घर आबाद, तर दुसरे घर बर्बाद' ही परिस्थिती हाताबाहेर जाईल. समाज म्हणजे आपणच..! म्हणून सुधारणा आपल्यापासून करायला हवी. आजच्या तरुण पिढीने हौस अन् गरज यातला फरक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता हेच बघा..! घर कर्जावर, गाडी कर्जावर, घरातील महागड्या वस्तू कर्जावर, सुटी आली की हॉटेल खर्चही क्रेडिटकार्डद्वारे कर्जावर आता सांगा..! शिल्लक काय राहील..? मग आजारपण आले, की तेव्हाही कर्ज काढण्याचीच वेळ येते. आपली गरज काय आपण करतो काय..! याचा ताळमेळच बसवला जात नाही. याचाही विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा शेवट कर्जातच होईल. म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार नको..! आपल्याला काय हवंय याचा अधिक विचार व्हायला हवा. म्हणजे गरजही भागेल अन् बचतही होईल. हीच बचत आपल्याला आर्थिक संकट काळात उपयोगी ठरेल. आज आपण सर्वांनी एक नक्कीच ठरवायला हवे, ते म्हणजे आपण स्वतःसाठी जगतोय, की लोकांसाठी, जर स्वतःसाठी जगत असाल, तर स्वतःच्या आवडी-निवडी जपा. स्वतःच मन काय म्हणेल याचा विचार करा...! लोक काय म्हणतील याचा नव्हे..!
लेखक : कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग ॲण्ड एनएए
संपादक : एचके ब्लॉग
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
कटू पण सत्य आरसा समोर ठेवलाय... आई-बाबांची जबाबदारी हे मुलांचे कर्तव्य असल्याची जाणीव लेखातून योग्यच मांडली आहे. खोटे दिखावे थांबवण्याची सूचना अनुकरणीय आहे. दिशादर्शक अन् संवेदना जागृत करणारा लेख आहे.
उत्तर द्याहटवालेखकांचे आभार..! आम्ही मुलांसाठी खरचं रक्ताचे पाणी केले. मुलं सुखात राहावी म्हणून विक टिक, उसनवारी करून त्यांना शिकवलं. आज दोन्ही मुलं मोठ्या हुद्यावर आहेत. आम्ही मात्र त्याच खोप्यात त्यांची जमत नसल्याची कारण ऐकत जगत आहोत. पण हरलो नाही... मुलं विसरली कर्तव्य... मात्र आम्ही खंबीर आहोत... पण आता भीती वाटतेय... लहान मुलाने आपला लेख वाचला. म्हणजे मीच पाठवला... त्याच्या बोलण्यात खूप वेगळेपणा होता... कुठेतरी आहेचे किरण दिसतय... मुलाला कर्तव्याची जाणीव करून दिल्याबद्दल लेखकांचे खूप खूप आभार...
उत्तर द्याहटवालेख वाचून खरचं आत्मचिंतन झाले... गरज अन् हौस यातला फरक माहिती असून अनुकरण हित नव्हते. मागे वळून पाहिले तर गरज कमी अन् हौस पूर्ण करण्यासाठीच कर्ज काढून खर्च झालाय. याला कारण समजले... लेखकांचे खरे कारण समजले... आनंदाची बाब म्हणजे मी त्या मुलांमधे नाही.... माझे आई बाबा माझे दैवत आहे आणि माझ्या सोबत आनंदात आहेत... खूप मार्गदर्शन होतय लेखातून...
उत्तर द्याहटवाआम्हा वृद्धांची अवस्था अशीच आहे... मुलं लहान होती तेव्हाही आम्हीच समजून घेतले अन् आजही समजून घेत आहोत... अशा मुलांना कर्तव्याची जाणीव व्हायला हवी...लेखकांचा उद्देश पूर्ण झाल्यास नक्कीच आई - बाबा अन् मुलं या नात्याला अर्थ राहील.
उत्तर द्याहटवा- एक वनवासी आई - बाबा
-