विचारांना समजून घेताना
अन्न, वस्त्र अन् निवारा ही शरीराची गरज, तर मनाची गरज म्हणजे सुविचारांचा मुबलक साठा, ज्यामुळे मन प्रसन्न अन् सकारात्मक राहाते. आपल्या मनाभोवती विचारांचे सदैव गडद रिंगण असते. जसे विचार तसे मन..! यावरच अवलंबून असते वृत्ती अन् कृती. भोवताली जशी परिस्थिती निर्माण होते तसा मनाचा स्वभाव बनत जातो. मनाला नियंत्रित करण्याचे कौशल्य स्वतः मनाशी संवाद साधल्यावर शक्य होते. त्यासाठी विचारांच्या गर्दीतून सकारात्मक विचारांची निवड करावी लागते. ही निवड करण्याआधी विचारांना समजून घेणे खूप महत्वाचे असते.
दृष्टिकोन सकारात्मक असावा
दृष्टिकोन सकारात्मक असावा
सुविचार समजून घेण्याआधी दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. मनाला सुविचारांची सवय लावावी. यासाठी सदाचारी संगत असणे गरजेचे आहे. कारण दृष्टिकोन सकारात्मक अन् संगत नकारात्मक असेल, तर विचारांचा मूळ अर्थ समजून घेणे शक्य होत नाही. संशय वृत्ती वाढते. सदाचारी व्यक्तीही कपटी वाटायला लागते. आज अशीही लोक आहेत की सस्त्संग, कीर्तनात तल्लीन होणे त्यांचे नित्याचे असते. त्यातून येणारे सुविचार मनी सकारात्मक ऊर्जाही निर्माण करतात; मात्र नंतर संपूर्ण दिवस या विचारांचा विसर पडतो आणि विक्षिप्त वर्तन सुरू होतं. क्षणभर या अवस्थेचे परीक्षण केले असता असे निदर्शनास येते, की याला कारणीभूत नकारात्मक संगत अन् मनावर नसलेले नियंत्रणच आहे. त्यासाठी सुविचारांपासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सुविचारांचे सतत चिंतन असायला हवे. प्रतेक विचार समजून मनी साठवत राहावा अन् आचरणातही आणावा. त्यासाठी दृष्टिकोन सकारात्मक असायलाच हवा.
सुविचारांचे आचरण असावे
सुविचारांचे आचरण असावे
प्रत्येकाला हे माहीत असते, की दुखवू नये, सत्य बोलावे, प्रेम द्यावे, आदर करावा, प्रसन्न असावे, गोड बोलावे, निस्वार्थ वृत्ती असावी; मात्र हे सर्व आचरणात, कृतीत दिसत नाही. मग याला काय म्हणावे, नुसत पाठांतरच..! कारण हे सर्व माहीत असतानाही वर्तन अगदी विरुद्ध असते. मग यावर उपाय काय? तर उपाय साधा आहे. जे-जे मन प्रसन्न करणारे ते-ते आचरणात असायला हवे. नुसते पाठांतर नको. येथे महाभारतातील एक घटना आठवते. द्रोणाचार्य यांनी सर्व शिष्यांना 'सत्य बोलावे' हे दोन शब्द पाठ करायला सांगितले. काही दिवसानंतर त्यांनी कुणा-कुणाचे हे दोन शब्द पाठ झाले म्हणून विचारले. सर्वांनी होकार दिला, मात्र युधिष्टरने नकार दिला. यावर द्रोणाचार्य यांनी कारण विचारले. तर युधीष्टर म्हणाले, की मी रोज पाठांतर करतो, मात्र दिवसभरात केव्हातरी खोटं बोललं जातं. ज्याचे आचरण होऊ शकत नाही, ते पाठांतर माझ्या मनाला व्यर्थच वाटते. आता या ठिकाणी आपण स्वतः ठरवू शकतो की, सुविचार आपल्यात किती साठले आहेत. मात्र त्याचे आचरण आपण करतो का? जर सुविचारांप्रमाणे आचरण नसेल, तर हा व्यर्थपणा किती घातक ठरू शकतो याची जाणीव असायलाच हवी..! म्हणून जे-जे चांगले ते-ते आचरणात आणायलाच हवे.
विचारांचा योग्य अर्थबोध हवा
विचारांचा योग्य अर्थबोध हवा
मनस्थिती नकारात्मक असली, तर प्रतेक विचाराचा अर्थबोध होताना अडचण येवू शकते. म्हणून सुविचार समजून घ्यावा. कोणत्या सुविचारातून काय सुचवण्याचा प्रयत्न होतोय, हे नीट समजून घ्यावे. चुकीचा अर्थ घेवून अनुकरण करने पुढे घातक ठरू शकते. जसे कुणाच्याही भांडणात हस्तक्षेप करू नये. हा विचार योग्यच आहे, मात्र प्रतेक ठिकाणी याचे अनुकरण योग्य ठरत नाही. कुटुंबात वाद होत असताना या वादाला मिटवण्यासाठी हस्तक्षेप करावाच लागेल. अन्यथा कुटुंबातील वातावरण बिघडेल. याउलट गुंड प्रवृती असणाऱ्यांच्या भांडणात हस्तक्षेप करणे सदाचारी व्यक्तीला घातक ठरू शकते. म्हणूनच विचारांचा सखोल अर्थबोध अन् वापर समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
Very nice article
उत्तर द्याहटवाDear Meghanil , very nice article , very happy to read ur article ,
उत्तर द्याहटवाGood job meghnil, appreciate your work
उत्तर द्याहटवाVery nice👍
उत्तर द्याहटवाBro is vary good
उत्तर द्याहटवाGood think🥇
उत्तर द्याहटवाI like your article.
उत्तर द्याहटवाGood work
Very Nice...
उत्तर द्याहटवाGreat work. I really like the example that you gave -Yudhishthira's example. Nice Job. KEEP WRITING.
उत्तर द्याहटवाNice buddy 👍👌
उत्तर द्याहटवाखुपच छान,मेघनील!
उत्तर द्याहटवालिखते रहोsss!
I like your article, very nice Great Work.
उत्तर द्याहटवा