अचेतन मन एक दिव्यशक्ती..!
आपण सर्वांनाच हे माहिती आहे की, मनाचे दोन प्रकार आहेत. पहिले चेतन मन आणि दुसरे अचेतन मन. जागे असताना जे कार्य केले जाते ते चेतन मनाद्वारे होत असते. निद्रा अवस्थेतही शरीरातील कार्य मनातील विचार सक्रिय असतात, ही अचेतन अवस्था असते. जागेपणी ज्या अशक्य गोष्टी करण्याचा विचार येतो, त्याच गोष्टी स्वप्नात शक्य झाल्याचे अचेतन मनाद्वारे दिसते. चेतन मन जरी झोपेत असले तरी अचेतन मन आपल्या अपेक्षा पूर्तीसाठी कायम सक्रिय असते. म्हणुच सकारात्मक विचार असावेत, मी सर्व काही करू शकतो, असा आत्मविश्वास असावा. कारण अचेतन मन सर्वशक्तिमान आहे. चेतन मनात काही करण्याचा विचार येताच अचेतन मन ते पूर्ण करण्यासाठी सज्ज असते. मग ते विचार नकारात्मक असो वा सकारात्मक, जेवढ्या आत्मविश्वासाने मनी तो विचार येईल, तेवढ्या लवकर त्याची प्राप्ती निश्चित असते. झोपेत असताना भोवताली काही अघटीत घडत असेल, तर लगेच त्या घटनेचा भास होऊन जाग येते, अन् आपण सावध होतो. हे सर्व अचेतन मनामुळेच होत असते.
जागर सकारात्मकतेचा
कायम मनी सकारात्मकतेचा जागर असायला हवा. म्हणूनच अचेतन मन सदैव जागृत ठेवायला हवे. सर्वसामान्यांची वस्तुस्थिती सांगायची झाल्यास त्यांचे चेतन मन 90 टक्के तर अचेतन मन केवळ 10 टक्केच कार्यरत असते. भूतकाळात जे ऋषी मुनी, बुद्धिवंत लोक होऊन गेले, ते त्यांच्या अचेतन मनाच्या शक्तीचा वापर केल्यानेच. म्हणूनच त्यांना काही घडणाऱ्या घटनांचा भास आधीच होत असे. एखाद्या अशक्य गोष्टीचा संकल्प करून, ते पूर्ण करण्यासाठी हे महापुरुष समर्थ असत. आजही प्रतेकात ही अचेतन दिव्यशक्ती अस्तित्वात आहे. योग्य रीतीने या अचेतन दिव्यशक्तीचा वापर केला गेला, तर प्रत्येक व्यक्ती सकारात्मकता पेरु शकतो. सद्यस्थिती अशी आहे की, बरेच लोक चेतन मनही ओळखत नाही. त्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. अशी अवस्था असल्यानेच नकारात्मक ऊर्जा भोवताली विध्वंसक रिंगण घालुन असते. आत्मविश्वास नाहीसा होतो. अधोगतीकडे आपोआपच मार्गक्रमण होते. म्हणून मनाच्या दोन्ही अवस्था ओळखून स्वतःसह इतरांचेही आयुष्य सकारात्मक बनवायला हवे.
स्वप्नांचा पाठलाग हवा
स्वप्न पाहा, मात्र ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र श्रम करण्याची तयारी असायला हवी. अहोरात्र श्रम करण्यासाठी आत्मविश्वास अचेतन मनापासूनच प्राप्त होतो. देशाचे सायंटिस्ट, दिवंगत राष्ट्रपती श्री. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, मोठी स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला सिद्ध करत त्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा. मित्रानो, येथे एक आवर्जून सांगावेसे वाटते की, त्यांनी त्यांच्या मनाच्या दोन्ही अवस्था ओळखल्या होत्या. चेतन मनानी स्वप्न रंगवायची आणि अचेतन दिव्य मनाच्या शक्तीने त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा. म्हणूनच त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले. ठरवले तर या जगात सर्व काही शक्य आहे. त्यासाठी इच्छाशक्ती अन् अचेतन मनाचा जागर महत्वाचे आहे.
ध्यानातून सिद्धता
अचेतन मन ही एक दिव्य शक्ती असून या शक्तीला प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. ध्यान, मेडीटेशनद्वारे ही सिद्धता प्राप्त करने शक्य आहे. रोज सकाळी ध्यान करताना आपल्या भोवताली चेतन मनाद्वारे एक सर्कल तयार करून अचेतन मनाला जागृत करावे. त्या चेतन मनात सकारात्मक विचार रुजवावा. अचेतन मनाजवळ अशक्य ते शक्य अन् यशोशिखर गाठण्यासाठी प्रार्थना करायला हवी. मग चमत्कार घडताना नक्कीच पाहायला मिळेल. अचेतन मन अपेक्षा पूर्तीसाठी कार्यक्षम होईल. लवकरच सिद्धता प्राप्त होताना दिसेल. चेतना अवस्थेत कधीही नकारात्मक बोलू नये. स्वतःला कोसू नये. कारण तुम्ही जे बोलाल ते अचेतन मन करण्यास सज्ज असते. म्हणूनच कायम सकारात्मक राहावे म्हणजे सर्व काही ठीक होते. आपोआप नव्हे तर अचेतन दिव्य मन सावध होऊन योग्य तेच भोवताली घडवत असते.
महापुरुष या दिव्यत्वातूनच
चेतनमन केवळ 10 टक्केच कार्यरत असते, म्हणुनच डोळे असूनही बऱ्याचदा फसगत हाेत असते. मात्र चेतन अन् अचेतन दोन्ही मनांचा वापर केल्यास या भूतलावर एक दिव्यशक्ती बनून वावरता येते. श्रीकृष्ण भगवान, श्रीराम, गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, साई बाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ अशी अनेक महापुरुष दिव्यशक्तींनी समृद्ध होती. या सर्वांनी चेतन अन् अचेतन दिव्यशक्तीला ओळखून त्याचा 100 टक्के वापर केला. आजही असे महापुरुष आपल्या भूतलावर आहेत. शेवटी एकच सांगावेसे वाटते की, मनाच्या अवस्था ओळखा, स्वतः मधील दिव्य शक्ती अनुभवा अन् जगणं सुदर होऊ द्या. अचेतन मनाला समर्पित होऊन त्याच्या सानिध्यात काही क्षण घालवा. कार्यपूर्तीसाठी अचेतन मनाला सज्ज व्हायला सांगा. चेतन मनाद्वारे याचना करा. मला खात्री आहे की, आपणास हवे ते नक्कीच प्राप्त होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा