मनगाभाऱ्यातील मैत्रीसंवाद

एचके लर्निग अँड एनएए
आयुष्य म्हणजे काय..? याचे मोजमाप केले तर जन्म अन्‌ मृत्यू या दोघांतील अंतर म्हणजे आयुष्य. हे अंतर पार करताना विविध नात्यांची सोबतही असतेच. मात्र एक सोबत जी प्रत्यक्ष असाे वा अप्रत्यक्ष सकारात्मक उर्जा देणारी असते, ती म्हणजे निखळ, निस्वार्थ मैत्री..! मैत्रीविना जीवनयात्रा व्यर्थ असल्याच्या भावना विचारवंतांनी भावविभोर होऊन व्यक्त केल्या आहेत. निखळ, निस्वार्थ मैत्री कशी असते, याची अनुभूती होणं प्रत्येकाच्या नशिबी नसतं..! अशाच निखळ अन्‌ निस्वार्थ मैत्रीला मी अनुभलंय..! शिक्षणाच्या निमित्ताने वैशाली विदर्भातील अकोला येथे आजीकडे असतात. तेव्हा त्या जेमतेम ८ किंवा १० वर्षांच्या असतील. तेथेच त्यांना अर्चनाच्या रूपात निखळ अन्‌ निस्वार्थ मैत्री भेटते. बराच वर्षांचा सहवास मनांचा विणकर बनतो. पुढे ३० वर्षांचा दूरावा दोघांच्या नशिबी येतो. या काळात दोघीही एकमेकांच्या अंतर्मनात अडकून असतात. वैशाली यांच्या बोलण्यांतून हे स्पष्ट जाणवायचं. ‘कहते है, अगर किसी को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है..!’ बस यांच्याबाबतीतही असंच झालं अन्‌ ३० वर्षांनंतर त्यांच्या भेटीचा तो मंतरलेला क्षण अखेर आलाच. ती दोन भावविभोर मनांची भेट, ती मनवस्था, अबोल भाव, ती क्षणभर निशब्द शांतता  तेव्हा मला टिपता आली होती..! एकदिवस अर्चनाने ३० वर्षांच्या नोंदी वैशालीला पाठविल्या. त्या नोंदी नव्हत्या, तर अर्चनाच्या मानात साठलेल्या अन्‌ दाटलेल्या विचारांचा बांधच होता. जो शब्दरूपात वैशालीपर्यंत वाहत आला हाेता. ते वैशालीच्याच शब्दांत आपण पुढे वाचूयात...!

प्रिय मैत्रीण अर्चना,
तू पाठविलेल्या आठवणींचे वाचन म्हणजे माझ्यासाठी व्याकुळ अन्‌ अधिर मनाचा शब्दप्रवासच म्हणावा लागेल. या शब्दप्रवासात मायेची माणसं दुरवल्याने तुझी झालेली मनअवस्था शब्दांशब्दांतून अतर्मुख अन्‌ स्तब्ध व्हायला लावते. तू लिहिलेली ही कविता -

वैशू...!,

मायेचा पसारा मांडून, तू निघून गेलीस
आठवण तेवढीच तू, ठेवून गेलीस
तुझ्या विणा जिणे, मला व्यर्थ वाटे
तुझी आठवण येता, माझा कंठ दाटे

डोळ्यात अश्रू येता, मी त्यांना आवरले
तू घेतलेले वचन, मला तेव्हाच आठवले
तुझ्या माझ्या भेटीची वेळ, लवकर येवो
तुला आठवण येताच, तू भरारी घेवो..!


या कवितेतून भेटीची व्याकूळता मनाला खोलवर स्पर्श करून जाते, अन्‌ मैत्रीच्या श्रीमंतीमुळे मी भाग्यवान वाटायला लागते. जीवनप्रवासात तुला हवं असलेलं विश्‍व शब्दांत मांडण्याचा तुझा केवलवाणा प्रयत्न मनाला सुन्न करून जातो...! घर कसं असावं..!, आपली माणसं कशी असावीत..!, कुणाकडून काय हवं होतं..!, जे-जे हवं ते-ते हिरावल्याने अस्थीर मनाला आवर घालत तुझं स्थिर होणं...! सर्व मन हेलावणारं तर आहेच; पण याहीपेक्षा तू ज्या जिद्दीने कुठल्याही परिस्थितीवर मात करत आहेस...! याला सलाम करावा वाटताे गं..! घरातील भिंती म्हणजे मायेचं प्रतिक, छप्पराला अश्रू तर धरणीमायला सुखाचं स्वरूप, समजदारीच्या खिडक्या अन्‌ त्यांना मर्यादेचे पडदे ही घराची मनप्रतिकृती वाचताना तू अंतर्मनात किती खोल-खोल संवेदनशील होत गेलीस हे स्पष्ट होतं. कदाचित म्हणूनच तु तुझ्या अंतर्मनाची सदनीका तुझ्याच प्रबळ विचारांनी सजवली आहेस; म्हणून हे आदर्श अन्‌ कौतुकास्पदच म्हणावे लागेल. तु निर्माण केलेली आयुष्याची परिभाषा, अन्‌ तुझी कल्पनाशक्ती तुझ्या यशाचे गूढ सांगून जाते. सुख-दुख, स्वकीय अन्‌ परकीयांकडून असहकार्याची वृत्ती, हे अनुभवत असताना तु चक्क तुझ्या आयुष्याला काटेरी फणसाची उपमा देतेस, तेव्हा अंतर्मनाला काटे टोचल्यासारखेच जाणवते. ऐवढं झेलूनही स्वत:ला ‘आय एम व्हेरी लकी ॲण्ड हॅप्पी’ म्हणून घेतेस, यातच कुठल्याही कठीण परिस्थितीला नमवण्याचं बळ परमेश्‍वराने तुला दिलंय याची प्रचिती येते. म्हणूनच तुझ्या भोवताली सकारात्मकतेच्या उर्जेचा दिवा सदैवा तेवत राहणार आहे, हे तू विसरू नकाेस..! 

तुझी ‘जीवन’ ही कविता
खूप काही शिकवून जाते...

जीवन एक संघर्ष, परीक्षा, प्रवास, सुख-दु:खाचा सागर, जीवंत चित्र, संगित असल्याचे तू तुझ्या अनुभवातून सिद्ध करते. यातच तुझ्या परिपक्व कल्पनाशक्तीचा अंतर्मनाला स्पर्श होतो. गरीबीवर तू खूपच मार्मिक भाष्य केलयं... श्रीमंती असावी; पण गैरमार्गातून नसावी हे सांगताना तुझ्यातील प्रामाणिकपणा लख्ख सत्यप्रकाशासारखा प्रज्वलीत हाेतो.स्वार्थासाठी जगणारी माणसं कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसायला घाबरत नाहीत. अशा लबाड, लुच्च्या अन्‌ स्वार्थी माणसांची प्रतिमा कठोरपणे मांडायलाही तू विसरत नाहीस. तुझी सर्वांसाठी सर्वकाही करायची असणारी तयारी, त्याचे ना कुणाला कौतुक ना किंमत ही जाणीव तुझ्या बाह्य मानाचे खच्चीकरण करताना दिसते. स्वकियांकडून सहकार्याची अपेक्षा असतानाही त्यांचे पुढे न येणं, तुला कळतं. पण हे सर्वकाही दुर्लक्षित करून, तुझा माया करण्याचा निस्वार्थ स्वभाव तू अचल ठेवलास. म्हणून कदाचित तू लिहताना म्हणतेस की ‘आय एम व्हेरी अनलकी गर्ल, आय हॅव नॉट गॉट लव्ह ऑफ माय फादर ॲण्ड मदर, बट आय हॅव लॉट ऑफ लव फॉर माय बेबी’ हे केवळ एका करूणामय आईच्याच भावना असू शकतात. तुझे अंतर्मन बळकट असल्यानेच तू वेदनेला लपवून इतरांसाठी जगत आहेस. येथे तुला एक सांगावेसे  वाटते की, तु नकळत यशोशिखर गाठलेले आहे. एका यशस्वीतीजवळ जे काही असायला हवे, ते सर्वकाही तुझ्याजवळ आहेस. यातच सर्वकाही आलं.  

लहानपणाविषयी तु भरभरून लिहलेलं आहेस. बालपणात आई-वडिलांचे प्रेम जरी तुला लाभले नसले, तरी तू तुझा सकारात्मक परिघ निर्माण केला होतास अन्‌ अजूनही तो तुझ्या भोवताली शाबूत असल्याचे स्पष्ट जाणवते. बालपणात तुला निसर्गाची हिरवळ अंतर्मनात जाणवत होती. बालपणातली नाती, आठवणी अजूनही तश्‍याच जपूण ठेवल्याचे तुझ्या संपूर्ण लेखनात जाणवते. आजही भूतकाळात डोकावून तु तो आनंद अनुभवण्याचा यशस्वी प्रयत्नही करतेस. यासारखं खुपकाही तुझं लिखान वाचताना मनाला स्पर्श करून जातं. आपण इतकी वर्ष एकमेकांपासून लांब होतो, मात्र आपली मैत्री एकमेकांच्या मनात अमृतासमान जिवंत होती, आहे, अन्‌ कायम राहील.

- तुझीच जिवाभावाची मैत्रीण वैशू



वैशाली अन्‌ अर्चनाच्या अंतर्मनात भेटीसाठी आसूसलेल्या भावविभोर मनाचा वैचारिक बांध प्रवाहित होऊन संगमात रूपांतर होताना दिसतो. हा दोघींचा मैत्रीसंगम एकमेकांना आधार, धीर अन्‌ सकारात्मक उर्जा देणारा ठरतोय. आज या दोघी आपापल्या क्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी सक्रिय आहेत. वैशाली ‘एचके लर्निंग ॲण्ड एनएए’, ‘सिद्धेश्‍वर क्लासेस’ तसेच ‘एचके ब्लॉग’च्या संस्थापिका, संचालीका आहेत. अर्चनानेही सोलापूर येथे स्वत:चा व्यवसाय थाटलेला आहे. दोघीही कुटुंब अन्‌ व्यवसाय यात समतोल साधत यशोशिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संकट कुठलेही असो त्यावर उपाय हा असतोच, यावर या दोघींचा ठाम विश्‍वास आहे. आतातर हरवलेले मैत्रीविश्‍व यशोशिखर गाठण्यासाठी त्यांना मानसिक बळ देणारे ठरत आहे. वैशाली अन्‌ अर्चनाची समर्पित मैत्री, मैत्रीचा खरा अर्थ सांगून जाते..! अशी अवस्था आयुष्य जगत असताना अनेकदा प्रत्येकाकडून अनुभवली जातेच. पैसा, एैश्‍वर्य सर्वकाही जवळ असतं, मात्र अंतर्मन अस्वथ असतं. अवघ जगणंच अर्थहीन वाटायला लागतं. एकांतात ओक्साबोक्सी रडावेसे वाटते. भोवताली लोकांची गर्दीच-गर्दी असते, मन मात्र एकटेपणाने ग्रासलेलं असतं. असं का होतं? याचा शोध वेळीच लागायला हवा. अन्यथा मानसिक व्याधींमुळे भोवतालचा काळोख गडद होत जातो. गर्दीतला एकटेपणा जिवघेणा का ठरतो? याचे उत्तर एकचं, अन्‌ ते म्हणजे, मन प्रिय व्यक्तीला कावरं-बावरं होऊन शोधत असतं. ही प्रिय व्यक्ती म्हणजे अंतर्मनात खोलवर कायमचं वास्तव्यास असणारी मित्र/मैत्रीणचं असू शकते. प्रिय व्यक्तीचा दिर्घकाळ दूरावा जिवघेणाच असतो. भोवताली कितीही आनंद असू द्या, ही प्रिय व्यक्ती सोबत नसली तर सर्व शून्यच असते. बालपणापासून तर आतापर्यंत अनेक चांगल्या-वाईट घटना आपल्यासोबत घडलेल्या असतात. या घटना साठा म्हणून मनात चिरंतन राहतात. वळोवेळी मन या घटनांमध्ये फेरफटकाही मारत असते. ज्या घटनांमध्ये मन फेरफटका मारत असेल तस-तसा परिणाम मनावर होत असतो. मन प्रसन्न करणाऱ्या घटणा म्हणजेच मंतरलेले क्षण. मंतरलेले क्षण म्हणजे नक्कीच प्रिय व्यक्तींच्या सहवासातले क्षण. जेव्हा जेव्हा भोवतालची परिस्थिती मन त्रस्त करणारी असेल, तेव्हा तेव्हा या मंतरलेल्या क्षणांच्या आठवणीत तल्लीन होता आलं पाहिजे, किंवा प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या सहवासात वेळ घालवता आला पाहिजे. म्हणून मनात ठाण मांडून असणारी प्रिय व्यक्ती कोण? याचा ठाव घ्या..! 

लेखक : कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग ॲण्ड एनएए
संपादक : एचके ब्लॉग


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

  1. खूप सुंदर, वाचता वाचता मन भरून आले वैशू अर्चना वाचता वाचता तिथे अजय व अरुण(माझा मित्र) असे झाले आणि ही एक इतरांसाठी कथा असेल मात्र ही आमच्या दोघांची सत्य कथा आहे आणि विशेष लेखात उल्लेख आहे अकोला आणि सुदैवाने आम्ही दोघेही अकोल्याचे आहे. सदर लेख मनाला छेदून गेला. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

लोक काय म्हणतील..?

विचारांना समजून घेताना

कर्ज हवंय..! मग हे नक्की वाचा..!

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

अचेतन मन एक दिव्यशक्ती..!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती