चिंतन आणि चिंता


एचके लर्निग अँड एनएए

चिंतन असावे पण चिंता नको! चिंता ही चितासमान असते, असे म्हणतात; पण ते अगदी खरं आहे. आज आपण याच विषयावर थोडं बोलूया. बरं, चिंता आणि चिंतन यातला फरक आपल्याला नक्कीच समजला असेल. तरीसुद्धा थोडक्यात येथे स्पष्ट करावसं वाटतं आहे. चिंतन हासुद्धा एक चिंतेचाच प्रकार आहे. मात्र येथे चिंतन कसले होत आहे हे खूप महत्त्वाचे आहे. चिंतन हा शब्द सकारात्मक असून, आपण चिंतन म्हणजे ध्यान असही म्हणू शकतो. आपण चिंतनामध्ये आयुष्यात घडलेल्या चांगल्या व मनाला आनंद देणाऱ्या गोष्टींचे चित्रण मनाच्या दृष्टीने पाहात असतो. जसजसा या भूतकाळातील आनंददायी घटनांचा प्रवास चिंतनात पुढेपुढे सरकत जातो तसतशी मनातील उदासीनता लोप पावत जाते. हे नैसर्गिक आहे. प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत असतो. परमेश्‍वराने आपली शरीररचनाच अशी बनवलेली आहे.

अनेकदा बऱ्याच जणांना आपण ‘माझ्या डोक्यात केमिकल लोचा झालायं’ असं बोलताना बघतो. खरंच आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरातील केमिकल लोचाच असतो. वेगवेगळ्या रसायनांचा समावेश आपल्या शरीरात आहे. या रसायनांमध्ये होणाऱ्या बदलांमुळेच आपल्या मनावर परिणाम हाेत असतात. आनंद, उत्साह, उदासीनता, दु:ख या केमिकल लोचांमुळेच होत असतात म्हणून आपण चिंतन काय करत आहोत, यावरच आपले वर्तन, स्वभाव आपल्यातला आनंद, उत्साह, उदासीनता अवलंबून असते. मनाला आनंद देणारे चिंतन जर आपण करत राहिलो किंवा तशी सवयच लावून घेतली, तर नक्कीच ‘सुखाचा महासोहळा’ प्रत्येकाला अनुभवता येईल. खरंच आयुष्य खुप सुंदर आहे; पण ते तसं जगता आलं पाहिजे म्हणून चिंतन असावे चिंता नको. 

आता जरा चिंतेविषयी बोलूया. चिंता करू नये, त्यामुळे अनेक शारीरिक, मानसिक, आर्थिक दुष्परिणाम भोगावे लागतात. हे आपणासही ठावूक आहेच. चिंता करणं टाळता येत जरी नसलं तरी चिंतेचा कालावधी नक्कीच कमी करता येतो. आपण जर १२ तास जागे राहत असाल आणि त्यातही १० तास नुसतेच चिंतेत जात असतील तर याचा परिणाम काय होईल, हे वेगळे सांगायला नको. त्याहीपुढे झोपताना आणि झोपेतही चिंता जर पिच्छा सोडत नसेल तर आयुष्य संपविण्यासाठी दुसऱ्या विषाची गरज नाही, हे आवर्जून सांगावेसे वाटते. चिंता करा; पण त्याचा कालावधी ५ मिनिटांपेक्षा अधिक नसावा. ५ मिनिटे चिंता करून पुढील ५ मिनिटे त्यावर काय उपाय, यासाठी चिंतन असायला हवे आणि दहाव्या मिनिटाला तो विषय तेथेच संपवायला हवा. 

असं म्हणतात, की १५ दिवस जर आपण एक क्रिया सतत करत राहिलो तर त्याची सवय लागते. काही लोक दिवसभर आपल्याशी निगडित असलेल्या, नसलेल्या गोष्टींची चिंता करत असतात. ज्या गोष्टींचा सरळसरळ आपल्याशी संबंध नाही त्या गोष्टींची चिंता का करावी? जे कधी आपल्या आयुष्यात घडणारच नाही त्यावर तरी का चिंता करत बसावं? घडून गेलेल्या वाईट घटनांवर का बरं चिंता करावी? वर्तमानात सर्वकाही सुरळीत चालू आहे आणि भविष्यातही सर्व उत्तम असेल, असा का बरं विचार करता येत नाही? एखादी न दुरुस्त होणारी चूक हातून झाली तर त्यावर का बरं रोज राेज विचार करून स्वत:ला जाळत बसावं? असे एक ना अनेक प्रश्‍न आहेत, की जे आपणांस निरुत्तर करतात. आता आपण काय करायला हवं हे वेगळे सांगायला नको. वरील प्रश्‍नांची उत्तर स्वत:च शोधल्यास यातील गुंता नक्कीच आपल्याला सोडवता येईल.  
 

लेखक : कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग ॲण्ड एनएए
संपादक : एचके ब्लॉग


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली