प्राण्यांचा स्वभाव अन्‌ शेअर बाजार


एचके लर्निंग अँड एनएए 
प्राचीन काळापासून प्राणी आणि मानवी आयुष्य एकमेकांवर कसे अवलंबून आहे, हे आपण चांगलेच जाणून आहोत. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हे स्पष्ट करण्यासाठी प्राण्यांचे उदाहरण दिले जाते. समजा एखादा व्यक्ती हुशार आणि चपळ असेल तर त्याला सशासारखा चपळ आणि हुशार म्हटलं जातं. तसेच ज्याप्रकारचे वर्तन व्यक्तींचे असेल तशी प्राण्यांच्या नावाने त्याला उपाधी दिली जाते. त्याचप्रमाणे शेअर बाजाराचाही आपला एक स्वभाव असतो. डेली, विकली, मंथली शेअर बाजारात वेगवेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रकारची चाल शेअरबाजाराची असेल त्यानुसार त्या चालीला प्राण्यांची नावे दिली जातात. यामागे उद्देश असा असतो की, शेअर बाजाराची चाल कशाप्रकारची आहे हे समजायला सोपे जावे. चला तर मग याविषयी सविस्तर पाहूया. 

बुल आणि बिअर (वळू आणि अस्वल)
बुल म्हणजे तेजी आणि बिअर म्हणजे मंदी हे जवळजवळ सर्वांनाच माहिती असेल. वळू या प्राण्याची वृत्ती पुढे धाव घेण्याची असते तर अस्वल या प्राण्याची वृत्ती नेहमी उलट्या दिशेने चालण्याची असते. यांच्या वृत्तीनुसार जेव्हा शेअर बाजाराची चाल असते तेव्हा ती अवस्था या प्राण्यांच्या नावाने ओळखली जाते. 

रॅबिट (ससा)
जेव्हा शेअर बाजाराची चाल ससा या प्राण्याच्या वृत्तीप्रमाणे असते. तेव्हा अशा अवस्थेतला सशासारखी तेजी असे म्हटले जाते. या अवस्थेचा फायदा इंट्रा ड्रेडर्स आणि शॉर्ट ट्रेडर्स घेत असतात. 

कासवासारखी अवस्था 
शेअर बाजाराचे हळू-हळू तेजीच्या दिशेने मार्गक्रमण असते तेव्हा अशा अवस्थेला कासवासारखा सुस्त बाजार असे म्हटले जाते. या अवस्थेचा फायदा दिर्घ काळासाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार घेत असतात. अशा अवस्थेत ट्रेडर्सचा सहभाग कमी असतो. 

कोंबड्यांसारखी अस्थिरता
जेव्हा शेअर बाजारात अस्थिरता असते. खरेदी करावे की विक्री हे समजत नाही. शेअर बाजारात कुठलीच दिशा नेमकी ठरवता येत नाही तेव्हा अशा अवस्थेला कोंबड्यांसारखी अस्थिरता म्हटले जाते. अशा परिस्थितीत वेट ॲण्ड वॉच असा सल्ला दिला जाताे. 

मेंढरांसारखी चाल
काही ट्रेडर्स, गुंतवणूकदारांची सद्यस्थिती अशीच आहे. टेक्निकली रिसर्च करून ट्रेडिंग केली जात नसल्याने संकट ओढवून घेतले जाते. कुणीतरी काहीतरी सांगितले म्हणून आपण तेच केले, कुठलीही शाहनिशा न करता. अशा अवस्थेलाच मेंढरांसारखी अवस्था असे संबोधले जाते.  

शार्कसारखी धोकादायक अवस्था
जे शेअर बाजारात नवीन असतात ते नेहमीच अशा अवस्थेचे बळी पडतात. म्हणजे एखाद्या शेअरची किंमत काहीही कारण नसताना वाढत जाते किंवा ठरवून वाढवली जाते; आणि अचानक त्यात सेलिंग प्रेशर वाढवले जाते. याच अवस्थेला शार्कसारखी अवस्था असे म्हणतात. अशा शेअर्सपासून नेहमीच दूर राहायला हवे. चला तर वेळ झाली निरोपाची पुन्हा भेटूया याच ठिकाणी म्हणजे ‘एचके ब्लॉग’वर शेअर बाजारासंबंधी एक नवीन विषय घेऊन, तोपर्यंत बाय बाय, टाटा, सीयू.
धन्यवाद...

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा.


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली