तेजी बुल मार्केटची..!



एचके लर्निग अँड एनएए
निफ्टी आता कुठे टेक्निकल चार्टवर बुलीश क्षेत्रात स्थिरावला आहे. अनेकांना इनव्हेस्टमेन्ट व ट्रेडिंगसाठी योग्य वेळ कोणती हे ठरवणे जमलेले नाही. ज्यांना जमले ते मालामाल झाले अन् होत आहेत. शेअर बाजारात काम करण्यासाठी इच्छाशक्ती अन् निर्णय क्षमता हवी असते, मग कुठलीही वेळ योग्यच. 'एचके लर्निग'सोबत शेअर बाजारात काम करण्यासाठी लागणारी परिपक्वता स्वअनुभवाने शिकता येते. म्हणून आजच नोंदणी करून 'एचके लर्निगसह' शेअर बाजारात काम करत आपल्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी सज्ज व्हा..!

डर के आगे जीत है
कोरोनामुळे शेअर बाजार कोसळला होता. नंतर पुन्हा एकच वर्षात रिकव्हर होऊन आज उच्चांकावर आहे. आर्थिक विकासाचे नवपर्व कधीच सुरू झाले आहे. निफ्टी पुन्हा कोसळेल 7 हजार किंवा 9 हजार येईल अशी आशा बाळगणे अव्यवहार्य ठरेल. अंदाज बांधून काम करणाऱ्यांसाठी हे स्वप्नच ठरेल. आता निफ्टीचा प्रवास 17000 ते 27000 असा असेल. अंदाज बांधून काम करायचे असेल तर पुढचा टप्पा डोक्यात ठेवून शेअर बाजारात काम करायला हवे. वाट तेजीची पाहावी मंदीची नव्हे. 

इंडिया विक्स दर्शवतोय तेजी
निफ्टीचा प्रवास 17000 ते 27000 असा असेल. याला तांत्रिक आधार म्हणजे बाजारातील चढ उतार दर्शवणारा इंडिकेटर 'इंडिया व्हिक्स' जेव्हा हे इंडिकेटर 30 ते 70 असते तेव्हा बाजार डाऊन ट्रेण्ड असतो, त्याचप्रमाणे हे इंडिकेटर 8 ते 15 असते तेव्हा बाजार अप ट्रेण्ड असतो. ढोबळ अंदाज घेतला तर प्रत्येक 10 वर्षानंतर एक मोठी घसरन बाजारात येते जी 2020 मध्ये येवून गेली. आता पुढे 2030 मध्ये मोठ्या घसरणीची शक्यता असू शकते. हे हिस्टोरिकल डेटावरून समजते. आता पुढील आठ वर्ष ट्रेडर्स यांनी ट्रेडिंगसाठी माईंड रिपेअर करून घ्यावे. योग्य सेटअप सेट करून काम करायला हरकत नाही.

नजर सेक्टरवर
गुंतवणूकदार अन् ट्रेडर्स यांनी सेक्टरवर नजर ठेवायला हवी. बाजार तेजीत असतो तेव्हा कुठलेतरी सेक्टर डाऊन ट्रेण्ड असते, बाजारातील तेजी थांबल्यास डाऊन ट्रेण्ड असलेले सेक्टर अप ट्रेण्ड होत असते. हीच ती योग्य वेळ असते. त्या सेक्टर मधील लीडर कंपन्या आपल्याला आर्थिक फायदा करून देण्यास खुणावत असतात. म्हणून सेक्टरवर नजर ठेवत योग्य नियोजन केल्यास आपण नक्कीच तरबेज ट्रेडर्स अन् गुंतवणूकदार बनाल. यापुढे बँक, मेटल, टेलिकॉम, ऑटो, पॉवर हे सेक्टर अप ट्रेण्ड असणार आहे.

लेखक :  कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!