बुलिश ॲन्ड ओनली बुलिश
कोरोनामुळे वाढलेली महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच चलनवाढीवर लक्ष्य ठेवण्यासाठी आर्थिक धोरणात सोयीस्कर बदल करण्यात आले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेला गती मिळत आहे. महागाई दर देखील अपेक्षेप्रमाणे अनुकूल आहे. आपल्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक मूलभूत घटकांच्या लवचिकतेमुळे हे साधणं शक्य झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. याचबरोबर ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या (Moodys) अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक बदल दिसून आले आहेत. मूडीजच्या नुकत्याच समोर आलेल्या या अहवालात भारत 'निगेटीव्ह' मधून रेटिंगच्या 'स्टेबल' श्रेणीमध्ये आल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोना काळात डबघाईला आलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येते आहे.
तेजी मंदीचा लाभ घ्या
जास्त परतावा मिळविण्यासाठी जास्त धोका पत्करावा लागतो, असा एक समज गुंतवणूकदारांमध्ये प्रचलित आहे. परंतु, कमी धोका पत्करून सुद्धा चांगला परतावा मिळविता येतो. योग्य संधी समोर येताच मोठी गुंतवणूक करा, इतर वेळी शांत बसा. या नियमानुसार काम केल्यास ध्येय नक्कीच साधता येईल. तेजी आणि मंदी हा शेअर बाजाराचा स्थायीभाव आहे. एकमेकांचा पाठलाग ते करीत असतात. त्याचा प्रत्यय काही शेअरच्या भावात दिसून येतो. कित्येक वेळेला बाजारात काही ‘मार्केट मेकर’ काही शेअरमधे तात्कालिक तेजी-मंदी घडवून आणत असतात. त्यांची अशा शेअरवर पकड असते. त्याचा उपयोग ते स्वतःसाठी करीत असतात हे लक्षात असू द्यावे. अशा शेअर्सपासून लांबच राहायला हवे. मात्र, अशी तेजी-मंदी अल्पकाळ टिकत असते. योग्य संधी आल्यास ती सोडता कामा नये.
गुंतवणूक दिर्घकाळ असावी
गुंतवणूक दिर्घकाळ असावी
इक्विटी मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की केवळ दीर्घकालीन गुंतवणूक आपल्याला चांगला परतावा देऊ शकते. अल्पकालीन दृष्टिकोनातून इक्विटीज खूपच अस्थिर असतात. अल्प मुदतीच्या गुंतवणूकीत, इक्विटीमध्ये प्रचंड अस्थिरता तुम्हाला गुंतणुकीपासून लांब नेऊ शकते. जेव्हा आपण गुंतवणुकीमार्फत बाजारात दीर्घकाळ राहता, तेव्हा बाजारातील चढउतारांचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो.
शेअर्स निवडताना
शेअर्स निवडताना
लांब पल्ल्याची गुंतवणूक करताना ज्या कंपन्या व्यवसायात उत्तम परतावा मिळवत आहेत, ज्यांच्यावर कर्जाचे प्रमाण कमी आहे, ज्याचे व्यवसायाचे स्वरूप सहज कळण्यासारखे आहे; तसेच ज्या कंपन्यांचे व्यवस्थापन उत्तम आणि विश्वासार्ह आहे, अशाच कंपन्यांचा विचार करा. आगामी ७ ते १० वर्षांत किंवा दीर्घकाळामध्ये कंपन्यांना मिळणाऱ्या मिळकतीचा विचार करून अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. लांब पल्ल्याची गुंतवणूक करताना बाजारात एकदम मंदी आल्यास उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये पुन्हा गुंतवणुकीची संधी मिळत असते. फंड उपलब्ध असल्यास ती संधी सोडू नका.
लेखक : कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा.
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा