जिवघेणा संधिवात अन् उपाय
एचके लर्निग अँड एनएए
संधिवात म्हटले की, समोर येतो वेदनेने पिडीत असलेला चेहरा. अनंत उपाय करूनही आराम न मिळाल्याने आयुष्यालाच कंटाळलेले रुग्ण. खरं तर या आजाराला स्वत: आपणच आमंत्रण देत असतो. योग्य आहार नसल्यामुळे किंवा काय खावे, काय खाऊ नये याचे आकलन नसल्याने या वेदना वाढतच जातात. याचबरोबर व्यायाम, योग, प्राणायाम अशा महत्त्वाच्या नियमांचा आयुष्यात अभाव असणे, किंवा याकडे दुर्लक्ष, कंटाळा करणे. याठिकाणी आपणास योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. जे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच लाभकारी ठरेल.
संधिवाताची लक्षणे
संधिवाताची लक्षणे
भूक न लागणे, शरीरात ढेकूळ तयार होणे, सतत हलका ताप, तोंड आणि डोळ्यात सूज येणे ही संधीवाताची लक्षणे असतात. आपणास अशी लक्षणे जाणवल्यास तातडीने खबरदारी घ्यायला हवी, गुडघ्यांमध्ये दुखत असेल तर पाळथी घालू नये. नियमितपणे चाला, व्यायाम करा, मॉलिश करा. पायऱ्या चढताना, उतरताणा काळजी घ्या, अशा ठिकाणी तोल जाण्याची शक्यता असते. पाऊस आणि थंडीत कोमट पाण्याने आंघोळ करा. थंड हवा, थंड ओलावा असलेल्या ठिकाणी जास्त काळ राहू नका. शक्यतो अशी ठिकाणे टाळा.
सहा प्रकारचे संधिवात
सहा प्रकारचे संधिवात
संंधीवाताची सुरुवात बोटांपासून होते. रूमेटॉयड सोराइटिक, ओस्टियो सोराइसिस, पोलिमायलगिया, रूमेटिका, एनकायलाजिंग स्पोंडिलाइटिस, रिएक्टिव, गाउट अशी संधीवाताची सहा प्रकार आहेत. संधिवाताची शरीराच्या कोणत्याही भागातून सुरूवात होऊ शकते. सांध्यांमध्ये यूरिक ॲसिड जमा होऊन त्याचे रुपांतर हळूहळू संधिवातात होते. शरीरात यूरिक ॲसिड चुकीचा आहार व चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढते. याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
काय खाऊ नये
काय खाऊ नये
सांधेदुखीमुळे सांधे आणि हाडांमध्ये असह्य वेदना होतात. त्यामुळे जेवणाची विशेष काळजी घ्यावी लागते. आपल्या आहारात थंड पदार्थ टाळायला हवेत. त्याचप्रमाणे दही, आंबट आणि थंड ताक अजिबात घेऊ नये. आइस्क्रीम, कुल्फीसुद्धा टाळायला हवी. जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ, पॅकिंग केलेले अन्न, डीप फ्राय पदार्थ संपुर्णत: टाळायला हवेत.
काय करावे
काय करावे
सांधेदुखी टाळण्यासाठी हळदीचे सेवन करायला हवे. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात १/२ चमचे हळद मिक्स करून पिल्याने युरिक ॲसिडचे प्रमाण नक्कीच कमी करता येते. जर आपणास दुध पचनिय असेल तर आपण दुधातही रोज सकाळी 1/२ चमचे हळत टाकून घेऊ शकतात. ब्रोकोली आणि कोबीचा आहारात वापर केल्यास सांधेदुखीत आराम मिळतो. मात्र ब्रोकोली आणि कोबीचे नियमित सेवन होणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत लसणीचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते ज्यामुळे सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाणही वाढवायला हवे. होय, यासाठी संत्रा आणि स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकतात.
पपई, गुळवेल रामबाण
पपई, गुळवेल रामबाण
संधिवात झाल्यावर आपल्याला अनंत सल्ले दिले जातात ज्यामुळे गोंधळ वाढतो. प्रश्न पडतो की, नेमके काय घ्यावे? मात्र या आजारावर पपई, गुळवेल रामबाण उपाय म्हणून समोर आले आहे. गुळवेल पावडर, पपई पावडर सहज कुठल्याही आयुर्वेदीक मेडिकलमध्ये उपलब्ध असते. दोन्ही पावडर सकाळी उपाशी पोटी व रात्री झोपण्याआधी एक/एक चमचे कोमट पाण्यात घेतल्यास या त्रासापासून नक्कीच हळूहळू मुक्ती मिळते. दोन ते तीन दिवसांत आपल्याला या जिवघेण्या वेदनेपासून बरे वाटायला लागते. याचबरोबर एरंडेल तेलही या वेदना कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. ज्या भागात वेदना होतात त्यावर या तेलाने माॅलीश केल्यास त्या भागावरील सूज कमी होऊन वेदनाही नाहीशा होतात. ही आरोग्यदायी व महत्त्वाची माहिती इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या त्रासापासून मुक्ती मिळवता येईल.
लेखक : कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा