गुळवेलचे आरोग्यदायी फायदे



एचके लर्निग अँड एनएए
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी गुळवेल किंवा गुडूची ही एक वेल आहे. या वेलला हिन्दी भाषेत गिलोय म्हणूनही ओळखले जाते. विशेष म्हणजे गुळवेलला अमृतवेलही म्हणतात. गुळवेलचे पाने हृदयाच्या आकाराची असून पानांचा स्वाद कडू आणि तिखट असतो. गुळवेलचा उपयोग विविध आजार बरे करण्यासाठी केला जातो. गुळवेलचे नियमित सेवन केल्याने दुर्धर आजार बरे झाल्याचे दिसून आले आहे. चला तर ही वनस्पती मानव जातीला कशी वरदान ठरत आहे ते पाहूया. 

सर्दी ताप, डेंग्यूला मारक
ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळवेल रामबाण उपाय आहे. डेंग्यूच्या तापामध्ये शरीरातील रक्तपेशी कमी होतात. अशा अवस्थेत गुळवेलचे सेवन केल्यास शरीरातील रक्तपेशी पुर्ववत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरातील सूज, वेदनेपासूनही सुटका होते. योग्य प्रमाणात गुळवेलचे सेवन केल्यास आजारांचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. वात, तापानंतर येणारा अशक्तपणा, भूक न लागणे, रोग प्रतिकारकशक्ती कमकुवत होणे इत्यादी समस्यांवर उपाय म्हणून गुळवेलीचे सेवन केले जाते. 

​गुळवेलमधील पोषणतत्त्व
गुळवेलमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, अँटीइन्फ्लेमेट्री गुणधर्म आहेत. यमध्ये ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजे देखील आहेत. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. आजारपणामध्ये प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होत असतो.  अशा अवस्थेत गुळवेलीमधील इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्म रोगप्रतिकारक क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करतो. 

​मधुमेहींना वरदान
नियमित आणि योग्य प्रमाणात गुळवेल सेवन केल्यास मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. रोज सकाळी एक चमचा गुळवेल पावडर कोमट पाण्यात घेतल्यास मधुमेहापासून होणारी शारिरीक हानी नक्कीच टाळता येते. मधुमेहींनी गुळवेलचे सेवन करण्याआधी आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन सेवनाचे योग्य प्रमाण ठरवून घ्यावे. 

​त्वचेच्या समस्या
त्वचेसंबंधी समस्या सोडविण्यासाठी गुळवेलचे सेवन केले जाते. नियमित व योग्य प्रमाणात गुळवेलचे सेवन केल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात, शिवाय त्वचा मऊ आणि सतेज राहते. कारण गुळवेलीमध्ये पचनप्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि रक्तशर्करा नियंत्रित राहण्यासाठी उपयुक्त पोषक घटकांचा समावेश आहे. ज्यामुळे त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. 

गुळवेलचे सेवन कसे करावे?
आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये गुळवेलचा काढा, गोळ्या, रस, पावडर सहज उपलब्ध होते. या प्रकारांमधून गुळवेल पावडर घेतलेली उत्तम. रोज सकाळी उपाशीपोटी अर्धा किंवा एक चमचा गुळवेल पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतो. आयुर्वेद तज्ज्ञांच्या माहितीनुसार गुळवेल प्रमाणातच सेवन केली गेली पाहिजे. दिवसभरात १ ग्रॅमहून अधिक गुळवेलचे सेवन करू नये. रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच गुळवेलचे सेवन करणे योग्य ठरेल.

- कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली