माझे आरोग्य माझी जबाबदारी...!


एचके लर्निग अँड एनएए :
माझे आरोग्य माझी जबाबदारी...! या जबाबदारीने आपण वागलो तर बऱ्याच आरोग्याबद्दलच्या तक्रारी नक्कीच टाळता येतील. ‘आपले आरोग्य आपल्याच हाती..!’ असे वारंवार तज्ज्ञांकडून सांगण्यातही येते. त्यावर उपायही सुचवले जातात. मात्र याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. जोवर ‘आप बिती’चा अनुभव येत नाही तोवर आरोग्याविषयी हलगर्जीपणा सुरूच असतो. आपले आरोग्य सदृढ, निरोगी राहावे यासाठी या लेखातून योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या काही वाईट सवयींचे विसर्जन अन्‌ भोवताली उपलब्ध निसर्गाचा योग्य वापर करून आपण नक्कीच निरोगी आयुष्य जगू शकतो. 

जेवणानंतर लगेच चहा पिणे टाळा
जेवणानंतर लगेच चहा पिणे आरोग्यासाठी घातक आहे. होय, चहामध्ये असलेले कॅफिन शरीरात कोर्टिसोल किंवा स्टिरॉइड संप्रेरक वाढवून आरोग्यास हानी पोहोचवतात. अन्नातील अनेक महत्त्वपूर्ण पोषकद्रव्ये शोषण्यास अडथळा येतो. चहामधील टॅनिनद्वारे आहारातून लोह आणि प्रथिने शोषून घेतले जातात. ज्याचा सरळसरळ आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जेवणानंतर लगेच चहा पिल्याने पाचनसंस्थेवरही विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे रक्तदाबाच्याही समस्या उद्भवतात. उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) असलेल्या रुग्णांनी जेवणानंतर चहा मुळीच पिऊ नये. मात्र डोकेदुखीवर चहा पिणे हा एक उत्तम घरगुती उपाय मानला जातो. आणि ते खरेही आहे. मात्र जेवणानंतर लगेच चहा पिल्यास याचा उलटा परिणाम होऊन शरीरात वायू साचतो आणि डोकेदुखीचे प्रमाण वाढू शकते. जर आपणास चहाची आवड असेल तर जेवणानंतर एक ते दोन तासांनी चहा पिणे योग्य ठरेल. 

अंड्यातील पिवळा भाग खावा का नाही? 
अंड पौष्टिक आहे. अंड्यामध्ये प्रोटीन्स, ‘अ’ जीवनसत्व, ‘ड’ जीवनसत्व, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी-12 आणि शरीराला आवश्यक इतर पौष्टिक घटक असतात. अंड्यात मोठ्या प्रमाणात आयर्न आणि बायोटिन असतं. बायोटिन मेंदूच्या वाढीसाठी, डोळ्यांसाठी आणि शरीरातील हिमोग्लोबिनसाठी फार उपयुक्त आहे. इतर पदार्थातून आपल्याला बायोटिन मिळत नाही. जे आपण अंड्यातून सहज प्राप्त करू शकतो. मात्र यातील पिवळ्या भागात ‘कॉलेस्ट्रोल’चं प्रमाण खूप जास्त असतं. शरीरातील वाढलेलं ‘कॉलेस्ट्रोल’ म्हणजे हृदयरोगाला आमंत्रण म्हणावे लागेल. आपल्याला गरज असणारं ‘कॉलेस्टेरॉल’ शरीर स्वतःच तयार करतं. म्हणून अतिरिक्त ‘कॉलेस्ट्रोल’ मिळविण्याची फारशी आवश्‍यकता नसते. प्राणीजन्य पदार्थांतून म्हणजे बीफ, कोळंबी, अंडी यासोबत चीज आणि बटरमधूनही ‘कोलेस्टेरॉल’ मोठ्या प्रमाणात मिळतं. यामुळे शरीरात ‘कॉलेस्ट्रोल’चं प्रमाण जास्त वाढून हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. अंड्याच्या पिवळ्या भागात ‘कॉलेस्ट्रोल’चं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे अंड्यातील पिवळा भाग प्रमाणातच खावा. आपल्या शरीरात कोलेस्ट्रोलचे प्रमाण जास्त असेल तर अंड्यातील पिवळा भाग खाणे टाळणेच योग्य. ज्यांच्या शरीरात ‘कॉलेस्ट्रोल’ची पुरेसी निर्मिती होत नसेल त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या   सल्ल्याने अंड्यातील पिंवळा भाग खाण्यास हरकत नाही. मात्र तोही प्रमाणात असावा.  

तोंडाची 
दुर्गंधी अन्‌ त्यावर उपाय
सकाळी झोपेतून उठल्यावर तोंडाला दुर्गंधी येते. गुळणा न केल्याने तोंडाची दुर्गंधी येणे सामान्य बाब आहे, परंतु ज्यांच्या तोंडाला नेहमीच दुर्गंधी येते. ब्रश केल्यानंतरही ही समस्या सूटत नाही. अशा परिस्थितीत समाजातून अनेकदा अवहेलना सहन करावी लागते. तोंडाच्या दुर्घंधीवर साधे आणी सोपे उपाय केल्यास या त्रासापासून नक्कीच मुक्ती मिळवता येते. पुरेसे पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ राहते,  डाळिंबाची साल पाण्यात उकळून या पाण्याने गुळणा करणे, कोरडे धणे खाणे, तुळशीची पाने चावून खाणे, मोहरीच्या तेलात दररोज एक चिमूटभर मीठ मिसळून हिरड्यांना मसाज करणे, तोंडात लवंग ठेवून चघळणे मात्र दिवसभरात ४ ते ५ लवंग चघळावी अतिरेक नको.  बडीशेप खाणे,  पेरूची पाने चघळणे, पेपरमिंट, ज्येष्ठमध, हिरवी वेलची चावून खाणे. वरील कुठलाही उपाय आपणास सहज अनुकरण करता येत असेल तो करावा. तोंडाच्या दुर्घंधीपासून मुक्तीतर मिळेलच शिवाय पचनाविषयीच्या तक्रारीही कमी होतील. पचनसंस्था उत्तम राहिल्यास आरोग्याविषयी विविध समस्यांचे निवारणही आपोआपच होईल. 

गुणकारी पपई 
पपईला आयुर्वेदमध्ये आहारवेद म्हटले जाते. केवळ पपईच नाही तर पपईच्या बियासुद्धा आरोग्यासाठी गुणकारी आहेत. याचबरोबर पपईच्या बियांची पावडरही विविध आजारांवर उपाय म्हणून उपयोगात आणली जाते. विशेषत: पपईच्या बियांची पावडर शरिरावर आलेली सूज, ॲलर्जी कमी करण्यासाठी वापरली जाते. डेंग्यू, चिकुनगुणीयामध्ये या पावडरचा वापरही केला जातो. डेंग्यूमुळे शरिरातील पांढऱ्या पेशी झपाट्याने कमी होतात. पपईची पावडर यावर उत्तम उपाय म्हणून समोर आले आहे. कमी झालेल्या पांढऱ्या पेशी भरून काढण्यास पपईच्या बियांची पावडर उत्तम मदतगार ठरते. पपईमध्ये आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम पोषकतत्व असतात. काही गंभीर आजार सुद्धा यामुळे दूर होतात. जसे शरिरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी, आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी, किडनीच्या तक्रारी दूर करण्यासाठी, मासिक पाळीतील पोटदुखीवर, डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी, लिव्हरचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, विशेषकरून वायरल तापावर पपई, पपईच्या बिया, आणि पपईच्या बियांची पावडर उपयुक्त आहे. याचबरोबर कॅन्सरपासून बचाव करण्याचीही क्षमता या पपईमध्ये दिसून आली आहे. पपईचे झाडे आपल्या भोवताली सहज उपलब्ध असतात. पपईच्या बियांची पावडर कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये उपलब्ध असते. किंवा घरच्याघरी पपईच्या बिया वाळवून मिक्सरद्वारे बारीक पावडर तयार करता येते. 

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास