निसर्गातून निरोगी आरोग्य

 

एचके लर्निग अँड एनएए
आपल्या भोवताली निसर्ग वैद्य म्हणून सदैव उभा आहे. निसर्गाचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेतल्यास नक्कीच संपूर्ण आयुष्य निरोगी जगता येईल. आपल्या शरीरासाठी लागणारे महत्त्वाचे घटक निसर्गातून सहज उपलब्ध होतात. मात्र आपण रासायनिक औषध घेऊन नकळत आपली प्रकृती बिघडविण्याचा मार्ग निवडतो. निसर्गातच निरोगी आरोग्य लपलेले आहे. निसर्गाला ओळखा, भोवताली कुठलाही वेल, वृक्ष आपल्याला निरोगी आरोग्य देण्यासाठी सक्षम आहे. गरज आहे निसर्ग अंगीकारण्याची. तो माहिती करून घेण्याची. या लेखात आवळा, भिजवलेले शेंगदाणे, चेरी, बदाम यापासून मिळणारे घटक. तसेच शरीरास गरजेचे असलेले प्रथिने कोणत्या पदार्थांमध्ये आहेत याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. नक्कीच हा लेख आपणास निसर्गाची महती पटवून देण्यास परेसा असेल. 

आरोग्यदायी आवळा
आवळा हे अत्यंत आरोग्यदायी फळ आहे. यात ‘क’ जीवनसत्त्व, लोह,  टॅनिन्स, फ्लेवोनाईडस्, सॅपोनन असे पोषक घटक आहेत. जे शरीराची विविध कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. या घटकांमुळे शरीराची झीज भरून निघण्यास मदत होते. बध्दकोष्ठता असणाऱ्यांना आवळा चूर्ण किंवा कच्चा आवळ्याच्या सेवनाने आराम मिळू शकतो. आवळ्यात असलेले फायबर पचनसंस्था सुधारण्यास उपयुक्त आहे. मासिक पाळीचे काम केवळ प्रजोप्तादनच नाही तर विषारी घटक बाहेर टाकणे हेही असते. मासिक पाळी दरम्यान आवळ्यासह मंजिष्ठा, कडुनिंब व हळद यांचे चाटण स्वरूपात केल्यास आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी ठरते. 

भिजलेले शेंगदाणे
भिजलेले शेंगदाणे आरोग्यासाठी गुणकारी आहे. रात्रभर भिजत ठेवलेले शेंगदाणे सकाळी सेवण केल्यास अनेक आरोग्याबद्दल असलेल्या तक्रारी मिटवता येतात. स्मरणशक्ती कमकुवत असल्यास भिजलेले शेंगदाणे नक्कीच खावे. पोटाच्या समस्या जसे की पोटफुगी, ॲसिडिटी यापासूनही आराम मिळतो. सांधेदुखीपासून आराम, हृदय निरोगी राहणे, खोकल्यापासून आराम तसेच भिजलेले शेंगदाणे नियमित सेवन केल्यास शारीरिक ऊर्जाही टिकून राहते. 

प्रथिने शरीराची गरज
प्रथिने ऑक्सिजन, हायड्रोजन आणि नायट्रोजनपासून बनलेले असतात, ते शरीराच्या पेशी बनवण्यास मदत करतात. हे आपल्या शरीराचे स्नायू बनवण्यासाठी देखील मदत करते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात. म्हणून शरीर निरोगी हवे असल्यास प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन गरजेचे आहे. दुध व दुधापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये प्रथिन्यांसह कॅल्शियम असते. अंड्यामध्ये केवळ प्रथिनेच नव्हे तर कॅल्शियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडदेखील समाविष्ट आहे जे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत करू शकतात. ड्राय फ्रुट्सही प्रथिनांचे खूप चांगले स्रोत मानले जातात. अक्रोड यांचे दररोज सेवन केल्याने, प्रथिनांसह, आपल्याला व्हिटॅमिन, सोडियम आणि पोटॅशियम मिळते. 

बहुगुणकारी चेरी व बदाम
कोरड्या चेरीच्या सेवनामुळे जळजळ आणि संधिवातापासून आराम मिळतो. त्याचबरोबर चेरीतील अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म शरीराची सूज कमी करतात आणि शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करण्यास मदत करतात. बदाम हे प्रथिनांचे खूप चांगले स्त्रोत आहे. बदाम केवळ प्रथिनांची कमतरता पूर्ण करत नाही तर हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्यास मदत करतात. माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. ज्यात चिकनपेक्षा कमी चरबी आढळते, जी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली