आरोग्यवर्धक गुळ अन् फळांची साल
आजच्या आधुनिक काळात गुळाचा वापर मर्यादित केला जातो किंवा केलाच जात नाही. त्याऐवजी साखर सर्वाधिक वापरली जाते. खरंतर गूळ खूप फायदेशीर आहे. गुळाचा वापर मर्यादित झाला तर शरीराला लठ्ठपणा व्यतिरिक्त सर्व रोगांपासून वाचवता येते. गुळ ऍनिमिया प्रतिबंधिक आहेत. यात आयरन मुबलक प्रमाणात असून रक्ताची कमतरता भरून निघते. अशक्तपणासारख्या समस्या टाळता येतात. गुळामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी आहे, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
गुळामुळे सुधारते पचनसंस्था
जेवणानंतर थोडा गूळ खाल्ल्यास अन्न सहज पचते. गूळ व्हिटॅमिन आणि मिनरल इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास आणि मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत करतो. गुळ फायबर, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने पाचन प्रणाली सुधारते. उलट्या, गॅस, अपचन यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. गुळ शरीरातील रक्त शुद्ध करत विषारी घटक काढून टाकण्यात मदतगार ठरतो. गुळाच्या नियमित सेवनाने सर्दी-पडसे आणि शारीरिक अशक्तपणासारख्या समस्या निर्माण होत नाही. गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळत असल्याने हाडे मजुबूत राहतात. गुळाबरोबर दररोज आल्याचे सेवन केल्यास सांधेदुखीपासून सुद्धा आराम मिळतो. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी कमी प्रमाणात किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गुळाचे सेवन करायला हवे.
फळांच्या गुणकारी साली
फळांच्या गुणकारी साली
फळं सर्वांनाच आवडतात. विविध प्रकारची फळे भिन्नभिन्न आवडी-निवडी. मात्र कोणती फळं कशी खावी याची माहिती नसल्याने फळांवरील साली फेकून दिल्या जातात. काही फळांच्या सालींमध्ये आरोग्यवर्धक गुणसत्व असतात. बऱ्याच जणांना सफरचंद सोलून खाणे आवडते, पण असे केल्याने सफरचंदमधील फायबर वेगळे होते. फायबर आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सफरचंद कधीही सोलून खाऊ नये. संत्री अन् त्यातील तंतुमय घटक न फेकता सेवन करायला हवे. पेरू देखील न सोलता खायला हवे. केळीचे साल खाण्यास कुणलाच आवडत नाही, मात्र केळीच्या सालीमध्ये कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे तर B6, B12, पोटॅशियम केळीच्या लगद्यामध्ये असते. केळीच्या सालीच्या आतील भागाला दातांवर चोळल्याने दातांचा पिवळेपण दूर होतो.
रिकाम्या पोटी काय खावे
रिकाम्या पोटी काय खावे
रिकाम्या पोटी पपई खायला हवे. पपई हे उत्तम सुपर फूड आहे. पपईचा समावेश आपल्या नाश्त्यामध्ये असायलाच पाहिजे. पपईत कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता आहे. ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही टाळता येतो. अंडी हा सकाळचा उत्तम नाश्ता आहे. सकाळी अंडी खाल्ल्याने दिवसभर पोट भरल्यासारखे वाटते. रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाणेही आरोग्यास फायदेशीर असून यात फायबर, ओमेगा -3 आणि ओमेगा -6 आम्ल आहेत.
रिकाम्या पोटी दही, टोमॅटो टाळा
रिकाम्या पोटी दही, टोमॅटो टाळा
टोमॅटो पोषक तत्वांनी समृद्ध असतात. परंतु टोमॅटो रिकम्या पोटी अजिबात खाऊ नये. यात असलेले टॅनिक अॅसिड पोटातील आंबटपणा वाढवते आणि गॅस्ट्रिक अल्सर होऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी दही खाणे टाळायला हवे. यात लैक्टिक अॅसिड असते, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळीसुद्धा दही खाणे टाळायला हवे. दुपारच्या जेवणात दह्याचे सेवन अधिक लाभदायक ठरते.
- कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा