बलवर्धक गुणसंपन्न तिळ
भारतीय संस्कृतीला संपूर्ण जगात गौरविले जाते. आपल्या संस्कृतीत जगणं सुखर अन् निरोगी राहण्यासाठी भर दिला गेला आहे. आहार शुद्ध अन् सात्विक असावा असा संदेशही देण्यात आला आहे. नुसता संदेशच नाही तर त्याचे नकळत अनुकरण होईल याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे घरातील स्वयंपाकघर. जेवण बनवताना आरोग्याला पोषक अशा घटकांचा वापर रोजच केला जातो. उदा. हळद, लवंग, जिरे, मोहरी, ओवा, तिळ, हिंग, दालचिनी असे अनेक आरोग्यदायी घटक रोजच्या जेवणामध्ये वापरले जातात. प्रत्येक घटक औषधी गुणसंपन्न आहेत. आज आपण तिळाविषयी जाणून घेऊया. तिळ बहुगणसंपन्न असून विविध आजारांसाठी प्रतिबंधक म्हणून काम करते. मात्र ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळाचा वापर कमी प्रमाणातच करावा.
वेदनाशामक अन् बलवर्धक
तिळात पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक आहेत. जे शरीरासाठी पोषक आहेत. तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. रोज तिन टप्प्यात ९ ग्रॅम (सकाळी ३, दुपारी ३, रात्री ३ ग्रॅम) तिळ चावून खाल्ल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास होत नाही. दातही मजबूत राहतात. तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
मधुमेह अन् हृदयविकारावर गुणकारी
मधुमेह अन् हृदयविकारावर गुणकारी
तिळ उष्णप्रवृत्तीचे असून चविने तूरट आहे. नियमित तिळाचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. मधुमेह जगातील समस्या बनत आहे असे म्हटले जाते. मात्र यावर आयुष्यभर रासायनिक गोळ्या खाणे हा पर्याय नाही. आपल्या आहारात ७० टक्के आहार मधुमेह विरोधी घेतल्यास मधुमेह नक्कीच नियंत्रित ठेवता येतो. ७० टक्के मधुमेह विरोधी आहार म्हणजे आंबट अन् तूरट पदार्थांचा वापर करावा. याचबरोबर नियमित तिळाचे सेवन केल्यास आपोआपच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हृदयविकारालाही तिळ मारक असल्याचे सांगितले जाते. आहारात तिळाच्या तेलाचा वापर केल्यास हृदयविकार टाळता येतो. याचबरोबर हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित श्वसनाच्या क्रियाही करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे प्राणायाम जसे भ्रसिका, अनुलोम-विलोम, कपालभातीचाही रोजच्यारोज सराव हाेणे गरजेचे आहे.
कर्करोगापासून बचाव अन् निरोगी त्वचा
कर्करोगापासून बचाव अन् निरोगी त्वचा
तिळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अवरोध होतो. फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त (ल्युकेमिया) यांच्या कॅन्सरपासून बचाव करता येतो. याचबरेाबर त्वचा मुलायम ठेवण्यासाठी तिळ सेवन करणे उत्तम पर्याय आहे. तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते.
मूत्र विकार अन् निरोगी केसांसाठी
मूत्र विकार अन् निरोगी केसांसाठी
मूत्रविकाराची समस्या असल्यास त्यावर तिळ उत्तम उपाय म्हणून पाहिले जाते. लघवी स्वच्छ होत नसल्यास तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते. डोक्यावरील केसगळतीची समस्या बऱ्याच जणांना उद्भवते. केस निरोगी ठेवण्यासाठी रोज प्रमाणात तिळ सेवन केल्यास किंवा तिळाचे तेल केसांना लावल्यास केसांची वाढ होऊन केसगळतीही थांबते.
- कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा