विविध आजारांवर रामबाण अर्जुनसाल

एचके लर्निग अँड एनएए : 
अर्जुन वृक्षाची साल एक प्रकारची आयुर्वेदिक औषधी असून त्याचा उपयोग विविध प्रकारचे रोग दूर करण्यासाठी केला जातो. अर्जुन वृक्षाची उंची ३० ते ४० फूट असून खोडाचा घेर १० ते २० फूट आहे. पाने लांब, रुंद आणि चिकट असून या वृक्षाच्या खोडातून येणारा डिंक सोनेरी तपकिरी रंगाचा असतो. हा वृक्ष वसंत ऋतूमध्ये फुलतो. अर्जुन वृक्षाची साल, फळं, पानांचा रस प्राचिन काळापासून आयुर्वेदात वापरतात. हृदयरोग, क्षयरोग, कान दुखी, अंगावरील सूज, ताप अशा विविध आजारांवर अर्जुनसालचा फायदा हाेतो. वैज्ञानिक भाषेत अर्जुन वृक्षाला टर्मिनेलिया अर्जुन म्हणतात. हे सामान्यतः कहुआ आणि सादडी या नावाने ओळखले जाते. बिहार, मध्य प्रदेश तसेच हिमालयाच्या पायथ्याजवळ हे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. अर्जुनसाल बाहेरून पांढरी आतून गुळगुळीत, जाड आणि गुलाबी किंवा लाल रंगाची असते. यात बीटा-सिटोस्टेरॉल, एलॅजिक एसिड, ट्रायहायड्रॉक्सी ट्रायटर्पेन, मोनो कार्बोक्झिलिक एसिड, आर्गेनिक एसिड आहे. या वृक्षात असणाऱ्या घटकांमध्ये विविध रोगांचा नाश करण्याची क्षमता आहे. 

हृदयविकारावर रामबाण
विशेषत: अर्जुनसालचे फायदे हृदयाशी संबंधित आहेत. अर्जुनसाल हृदयाला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरते. अर्जुनसाल पावडर नियमित व योग्यप्रमाणात सेवन केल्यास शरिरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. हृदयविकारावर अर्जुनसाल रामबाण उपाय म्हणून काम करते. बाजारात अर्जनसालपासून बनवलेली पावडर उपलब्ध आहे. रोज सकाळी एक चमचा अर्जुनसाल पावडर दुध किंवा कोमट पाण्यासोबत सेवन केल्यास हृदयाला शक्ती मिळते, अशक्तपणा दूर होतो आणि हृदयाचे ठोके सामान्य होतात. ऋतू बदलामुळे किंवा कोणत्याही संसर्गामुळे ताप येत असल्यास अर्जुनसाल पावडर सेवन केल्यास आराम मिळतो. याचबरोबर बद्धकोष्ट, पोटातील गॅसेस यावरही अर्जुनसाल उपयोगी आहे. 

पोटदुखी अन्‌ तोंडाचा अल्सर
अर्जुन झाडाची साल पोटासंबंधित आजार बरे करण्यास प्रभावी आहे. अर्जुनसालीत भाजलेली हिंग आणि काळे मीठ एकत्र करून दिवसातून दोनदा हे मिश्रण सेवन केल्यास पोटाचा त्रास बरा होतो. अर्जुनसाल तोंडाचा अल्सर दूर करण्यासाठी देखील वापरली जाते. अल्सर बरे करण्यासाठी अर्जुनसाल पावडर नारळ तेलात मिसळावे. हे मिश्रण काही दिवस नियमितपणे लावल्यास तोंडाचा अल्सर बरा होतो. 

पित्ताशयाला मारक
अर्जुनसाल, कडुलिंबाची साल, चिंचेची साल आणि हळदीची पावडर पाण्यात मिसळून काढाही बनवता येतो. १० ते २० मि.ली. काढ्यामध्ये मध मिसळून रोज सकाळी घेतल्यास पित्ताशयातपासून आराम मिळतो. त्याचबरोबर लघवी करताना वेदना किंवा सूज येत असेल तर अर्जुसालपासून बनवलेला काढा किंवा पावडर याेग्यप्रमाणात सेवन केल्यास आराम मिळतो.

त्वचाविकारावर उपयुक्त
अर्जुनसाल त्वचा विकारावर एक वरदान आहे. या झाडाची साल  किंवा पावडरची पेस्ट त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार आणि मऊ होते. अर्जुनसाल पावडर, बदाम तेल, हळद आणि कापूर यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील घाण साफ होऊन त्वचा निरोगी अन्‌ चमकदार बनते. 

मासिक पाळीत उपयोगी
मासिक पाळीच्या दरम्यान अतिरक्तस्त्राव थांबवण्यासाठी अर्जुनसाल खूप मदतगार ठरते. एक कप दुधात एक चमचा अर्जुनसाल पावडर घालून मंद गॅसवर उकळावे. जेव्हा थोडे दूध शिल्लक असेल तेव्हा ते काढून घ्यावे, थंड झाल्यावर त्यात १० ग्रॅम साखर मिसळून पिल्यास मासिक पाळीमध्ये आराम मिळतो. ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी साखरेचा वापर टाळावा. 

बळकट अन्‌ मजबूत हाडे
शरीराची हाडे मोडली किंवा हाडे कमकुवत झाली तर अर्जुनसाल खूप फायदेशीर ठरते. अर्जुनसाल पावडर योग्यप्रमाणात सेवन केल्यास हाडांचा त्रास तर दूर होतोच शिवाय हाडे जोडून मजबूत होतात. पोटात अल्सरच्या जखमा असल्यास अर्जुनसाल पावडर फायदेशिर ठरते. अर्जुनसाल काढा अल्सरच्या जखमा धुण्यासाठी फायदेशीर आहे. 

मधुमेहिंनी प्रमाणात सेवन करावी
अर्जुनसालीत अनेक औषधी गुणधर्म आहेत जी हृदयरोग, मधुमेह, त्वचा रोग इत्यादी रोगांचे निर्मूलन करण्यासाठी वरदान ठरतात. मात्र अर्जुनसालीचा वापर हा प्रमाणातच असावा अन्यथा विपरीत परिणामही होऊ शकतो. ज्यांच्या साखरेची पातळी कमी होते त्यांनी अर्जुनसालीचा वापर योग्य प्रमाणातच करावा किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  मधुमेह नियंत्रणाची क्षमता अर्जुनसालीत नक्कीच आहे, मात्र जास्त प्रमाणात सेवन झाल्यास साखरेची पातळी लक्षणीय खाली येऊ शकते, म्हणून या रुग्णांनी अजुर्नसाल पावडर प्रमाणातच घेणे योग्य ठरेल. गर्भवती महिलांनी अर्जुनसालीसे सेवन टाळावे. 

- कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली