शिस्त निरोगी आरोग्यासाठी
एचके लर्निग अँड एनएए
आयुष्य जगत असताना बाह्य गोष्टींवर बारकाईने लक्ष केंद्रीत केले जाते. शारिरीक सौंदर्य वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. निरोगी राहण्यावर फारसे लक्ष दिले जात नाही. कळत नकळत चुकीच्या सवयी लावून घेतल्या जातात. कालांतराने आरोग्याची हानी हाेत जाते. म्हणून वेळीच आरोग्याबद्दल जागरूक व्हायला हवे. आरोग्य ठिकठाक असले तर यशोशिखर नक्कीच गाठता येते. म्हणून स्वत:ला शिस्त लावून ती काटेकोरपणे पाळा. ‘माझे आरोग्य माझीच जबाबदारी’ यानुसार वागल्यास आनंद उपभोगताना तो भोवताली पेरताही येईल.
वजनावर निंयत्रण ठेवा
वजनावर निंयत्रण ठेवा
वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. नियमित सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबाचा रस प्यायल्याने चयापचय वाढून वजन नियंत्रणात राहते. लिंबूपाण्यात कॅलरी कमी आणि व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्याचप्रमाणे ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये एपिगॅलोकेटचिन गॅलेट नावाचे अँटीऑक्सिडेंट असते, जे चरबी जाळण्यास मदत करते. रोज ग्रीन टी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. रोज सकाळी चहा ऐवजी ग्रीन टी प्यायल्यास तुमचे वजन सहज कमी होऊन शरीरावर चरबी जमा होत नाही. याशिवाय ग्रीन टी एनर्जीही देते.
सात ते आठ तास झोप घ्या
सात ते आठ तास झोप घ्या
निरोगी आयुष्य जगण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. मजबूत प्रतिकारशक्तीमुळे आजारांपासून सुरक्षित राहण्यास मदत होते. पण, नकळत आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या कामात इतका व्यस्त असतो की, झोपायलाही वेळ मिळत नसल्याची तक्रार समोर येते. पुरेशी झोप न मिळणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. योग्य झोप न मिळाल्यास शरीरात प्रथिने तयार होत नसल्याने अँटीबॉडीज योग्य प्रकारे तयार होत नाहीत. म्हणून तक्रार करण्यापेक्षा पुरेशी झोप नक्कीच घ्या आणि निरोगी आरोग्य जगा.
ताण-तणावापासून लांब राहा
ताण-तणावापासून लांब राहा
आनंदी अन् निरोगी आयुष्य जगण्यासाठी शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील उत्तम असणे खूप गरजेचे आहे. अनेक संशोधनातून असे आढळून आले आहे की, जास्त ताणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी, तणाव आणि चिंता यापासून लांबच राहणे हिताचे ठरते.
निरोगी आहार घ्या
निरोगी आहार घ्या
बरेच लोक जंक फूडचे सेवन मोठ्या चवीने करतात. हा पदार्थ पटकन तयार होतो आणि चवीलाही छान लागतो. पण, आरोग्याच्या दृष्टीने हे पदार्थ अजिबात चांगले नाही. फळे आणि भाज्यांमध्ये तांबे, बीटा-कॅरोटीन, जीवनसत्त्वे ए, सी आणि ई सारखे अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
- कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएएलेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा