आरोग्यरक्षक : वज्रासन, कपालभाती
निरोगी राहण्यासाठी योग अन् प्राणायामाला नित्यकर्मात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. योग अन् प्राणायामाच्या माध्यमातून मन आणि मेंदू शांत ठेवणे शक्य होते. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अन् प्राणायाम खात्रीशीर मार्ग मानला जातो.
प्राणायामात कपालभातीचे खूप महत्त्व आहे. योग, प्राणायाम करताना आसन अवस्था महत्त्वाची मानली जाते. प्रामुख्याने सिद्धासन, पद्मासन अन् वज्रासन या तिन आसनांना प्राधान्य दिले जाते. त्यातूनही वज्रासन साधे अन् सोपे असून परिणामकारक आहे.
वज्रासन करण्याची पद्धत : वज्रासनाच्या पूर्वस्थितीत तुम्हाला दोन्ही पाय पसरुन बसायचे आहे. दोन्ही हात नितंबाच्या बाजूला ठेवायचे आहे. डाव्या हातावर शरीराचा भार घेऊन उजवा पाय दुमडून घ्या. अगदी त्याचप्रमाणे उजव्या हातावर भार घेऊन डावा पाय दुमडून घ्या. नितंबाखाली पायांचे दोन्ही तळवे असावे. पायांच्या तळव्यांचा ‘V’ आकार करून त्यात बसून घ्यावे. पाठीचा कणा ताठ हवा. हातांचे तळवे दोन्ही गुडघ्यांवर ठेवावे. डोळे बंद करुन श्वासावर लक्ष केंद्रीत करावे. आसनात आल्यानंतर अगदी स्वाभाविकपणे श्वासोच्छवास मंद आणि व्यवस्थित होतो. मनाची चलबिचलता कमी होते. आसन सोडताना डोळे अलगद उघडावे. एकेक पाय सरळ करुन घ्यावा आणि निवांत व्हावे.
वज्रासनाचे फायदे : नियमित वज्रासन केल्यास अंगदुखीपासून हमखास आराम मिळतो शिवाय वाढलेले वजनही नियंत्रणात ठेवता येते. पाठीचे दुखणेही कायमचे बरे होते. निरोगी शरीरासोबतच मनशांती मिळते. पोटाच्या विकारासाठी हे आसन फार महत्वाचे मानले जाते. पाय, मांड्यांकडे अडणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. बद्धकोष्ठता आणि पोटासंबंधी समस्या कमी होतात. जेवण झाल्यानंतर हे आसन केल्यास आरोग्य उत्तम राहते. नित्रानाशाचा त्रास असणाऱ्यांसाठी वज्रासन वरदानच मानले जाते. झोपेपूर्वी 5 मिनिटे हे आसन केल्यास नक्कीच चांगली झोप येते.
कपालभाती करण्याची पद्धत : कपालभाती करण्यासाठी सिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासन यापैकी कुठल्याही स्थितीत बसावे. हात गुडघ्यांवर ठेवून हातांच्या सहाय्याने गुडघे पकडावे. शरीर ताठ ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या पूर्ण क्षमतेने दीर्घ श्वास आत घेत छाती फुगवावी. यानंतर घेतलेला श्वास एका झटक्यातच पूर्ण बाहेर सोडावा. श्वास सोडताना आपोआपच पोट आतल्या बाजूला खेचले जाईल. हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी. साधारणत: एक मिनिटापासून सुरूवात करावी. नंतर प्रत्येक आठवड्यानंतर १ मिनिट वाढवत जावा. विविध आजारांपासून मुक्तीचा मार्ग म्हणजे कपालभाती मानला जातो.
कपालभातीचे फायदे : कपालभाती करताना शरीरातील नकारात्मक उर्जा बाहेर फेकली जाऊन त्याजागी सकारात्मक उर्जेचा संचार होतो. शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकले जाते. दम्याच्या रुग्णांनी नियमित कपालभाती केल्यास आजार बरा होण्यास मदत होते. डोळ्यांखालील काळी वर्तुळ निघून जातात. मेटाबॉलिजममध्ये वाढ होऊन वजन कमी होऊ लागते. दात आणि केसांसंबंधी रोग बरे होतात. बद्धकोष्ठता, अपचन, गॅससारख्या पोटाशी संबंधित आजार बरे होतात. श्वसनाचा मार्ग साफ होऊन श्वसनाशी निगडीत आजार दूर होतात. सायनस शुद्ध होऊन मेंदू सक्रिय होतो.
(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.)
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा