मधुमेह ठेवायचाय नियंत्रणात..!
मधुमेह नियंत्रीत ठेवण्यासाठी काय करायला हवे, हे प्रत्येक मधुमेह रुग्णाने जाणून घ्यायला हवे. योग्य अन् वेळच्यावेळी आहार घेतल्यास मधुमेह नक्कीच नियंत्रणात ठेवता येतो. अन्यथा हा आजार शांतपणे जगू देत नाही. कुठल्याही कारणाने मधुमेहासारखी लक्षणे जाणवू लागल्यास शूगर अनियंत्रित झाल्याचा पक्का समज होतो. थोडक्यात काय, तर निम्मा आजार मानसिक होतो. योग्य आहार, प्राणायाम, योगा, व्यायाम, नियमित चालणे याचे काटेकोरपणे पालन केल्यास मानसिकता सकारात्मक होते. याचबरोबर ७० टक्के आहार मधुमेहविरोधी असेल तर काही प्रमाणात मधुमेह नक्कीच नियंत्रीत होतो. बाकी आयुर्वेदिक औषधांमुळे मधुमेह हळूहळू कायमचा बरा होऊ शकतो. उदा. गुळवेल पावडर नियमित सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात घेतल्यास हा आजार नियंत्रित होऊन हळूहळू मुळापासून बरा होऊ शकतो. यासारखी आयुर्वेदमध्ये वनौषधी उपलब्ध आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वनस्पतींचा वापर करणे नक्कीच आरोग्यदायी ठरेल.
खाण्या-पिण्यावर हवे नियंत्रण
खाण्या-पिण्यावर हवे नियंत्रण
खाण्यावर नियंत्रण नसणे, जो पदार्थ चवदार त्याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन करणे यामुळे आरोग्याला हानीच पोहोचते. कही लोक तर वेळ नसल्याचे कारण देत वेळच्यावेळी आहारही टाळतात. त्यामुळे शरीर दिवसेंदिवस कमकुवत होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. झोपेतून उठल्यानंतर सकाळी दोन ते तिन ग्लास कोमट किंवा साधे पाणी पिले गेले पाहिजे. मात्र केवळ आळस अन् निष्काळजीपणामुळे हा नियम पाळला जात नाही. सकाळी उठल्यावर पाणी पिणे खूपच आरोग्यदायी आहे. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने आयुष्य वाढते, मन शांत अन् शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
शारीरिक श्रम किंवा व्यायाम हवाच
शारीरिक श्रम किंवा व्यायाम हवाच
शारीरिक श्रम केल्याने शरीरातील घाम बाहेर पडतो ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळविता येते. बैठे काम असणाऱ्यांनी घाम येईल तोपर्यंत व्यायाम करावा. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहाराकडेही लक्ष द्यायला हवे. ७० टक्के आहार हा शुगरविरोधी असावा. म्हणजे आंबट, तूरट, तिखट या चवीचा आहार अधिक घ्यावा. ज्या आहारात साखरेचे प्रमाण जास्त, तो आहार सक्तीने टाळायलाच हवा. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश असायलाच हवा. आहार तज्ज्ञांकडून आहार व प्रमाण ठरवायला हवे. दालचिनीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. यासोबतच साखरेवर नियंत्रण ठेवण्यासही हे उपयुक्त आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. लोह, पोटॅशियम, जीवनसत्त्वे भरपूर असलेली दालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी दुधात दालचिनी मिसळून पिल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. हळद मधुमेह नियंत्रणात उपयुक्त आहे. यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवतात. रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते.
रासायनिक औषधांचा अतिरेक टाळा
रासायनिक औषधांचा अतिरेक टाळा
मधुमेहासारखा आजार कोणत्याही रासायनिक औषधांनी बरा होत नाही, तो केवळ नियंत्रित करता येतो. म्हणून रासायनिक औषधांचा अतिरेक टाळायला हवा. आयुर्वेदिक औषधी, वनस्पतींच्या मदतीनेही मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. शिवाय ‘साईड इफेक्ट’ही नसतो. आयुर्वेदिक औषधीचा नियमित वापर केल्यास भविष्यात मधुमेहावर यशस्वीरित्या मातही करता येऊ शकते. मधुमेहावर नियंत्रणासाठी गुळवेल, कारले, जांबुळ, तिळ, लवंग, कडुलिंबाची पाने आदी वनस्पतींचा वापर केला जातो. आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन आयुर्वेदिक उपचार घ्यायला हरकत नाही. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा प्रभाव मंद असतो, नियमित सेवन केल्याने कदाचित तुमचा रोग मुळापासून बरा होऊ शकतो. निरोगी आरोग्यप्राप्तीसाठी शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात असणे खूपच महत्वाचे आहे.
नियमीत शुगर लेव्हल तपासा
नियमीत शुगर लेव्हल तपासा
सर्वसामान्यत: न्याहारी किंवा फास्टिंग ब्लड शुगर 60-90 mg/dl येवढे असावे, जेवणापूर्वी रक्तातील साखरेची पातळी 60-90 mg/dl तर जेवणाच्या एक तासांनतर 100-120 mg/dl इतकी असायला हवी. महधुमेह नियंत्रणांसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिने, व्यायाम किंवा शारीरिक हालचाली करणे, फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनाला प्राधान्य द्यावे. आपल्याला मधुमेह आहे हा विचार डोक्यात सतत नसावा. तपासणी केली नाही म्हणून काळजी वाढवू नये. नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे मधुमेहाचा त्रास जाणवणार नाही. पाच ते सहा महिन्यांचा शुगर रिपोर्ट नॉर्मल असल्यास आत्मविश्वास वाढेल. आजार बरा हाेत असल्याची खात्रीही पटेल. मात्र एखाद्या महिन्यात कुठल्याही कारणामुळे शुगरची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित तपासणी करून खात्री करून घ्यावी. तणावमुक्त जगण्याचा प्रयत्न करावा. सकाळी अर्धा तास मेडिटेशनसाठी नक्कीच द्यावा. मग ठेवायचा आहेना, मधुमेह नियंत्रणात..! चला, आजच संकल्प करूया, मधुमेह नियंत्रणासाठी काटेकोरपणे नियम पाळूया..!
- कैलास एन. हिरोडकर
संचालक : एचके लर्निंग अँड एनएएलेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा