आरोग्यरक्षक पोषक तत्त्वे

एचके लर्निग अँड एनएए
व्हिटॅमिन्स शरीरासाठी महत्त्वपूर्ण असतात, परंतु बऱ्याचदा प्रोटीन आणि चरबीमुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. व्हिटॅमिन्स शरीरात अनेक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महत्त्वपुर्ण भूमिका बजावतात. व्हिटॅमिन अ, बी-1, बी-2, बी-3, बी-5, बी-6, बी-9, बी-12, सी, डी, ई आणि के शरीरात योग्य प्रमाणात असायलाच हवेत. निरोगी अन्‌ संतुलित आहार घेतल्यास शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे मिळू शकतात. या लेखात आपण कॅल्शिअम, आयर्न, व्हिटॅमिन डी, ई, मॅग्नेशिअम आणि झिंकबद्दल जाणून घेऊया. 

बळकट शरीरासाठी कॅल्शिअम
हाडांची वाढ, योग्य मज्जातंतू कार्य, जखम भरण्यासाठी  आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम महत्त्वपूर्ण मानले जाते. शरीरात कॅल्शिअमची योग्य पातळी कायम असने अनिवार्य आहे. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे स्नायू दुखणे, कमकुवत हाडे, कमकुवत व ठिसूळ नखे, नैराश्य या समस्या उद्भवतात. कॅल्शिअमसाठी आहारात दूध, संत्री, बदाम, अंजीर, दही आणि मुबलक प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असायला हवा. 

रक्तवाढीसाठी आयर्न गरजेचे
आयर्न आरोग्यासाठी आवश्यक आहे. महिलांमध्ये आयर्नचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जाते, याचे कारण म्हणजे मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होणे, ज्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता वाढत जाते. शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी, हार्मोन्स तयार होण्याकरता अन्‌ वाढीसाठी आयर्न आवश्यक आहे. आयर्नच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, खराब रक्ताभिसरण, बद्धकोष्ठता, मळमळ, उलट्या या समस्या उद्भवू शकतात. सुकामेवा, बीन्स, मांस, सीफूड, गूळ, सफरचंद, डाळींब आणि हिरव्या पालेभाज्या, जसे की पालक हे आयर्नचे काही समृद्ध स्रोत आहेत.

हाडं बळकटीसाठी व्हिटॅमिन ‘डी’
व्हिटॅमिन ‘डी ’ शरीरातील कॅल्शिअमचे योग्य शोषण, पेशींची वाढ, जळजळ कमी करणे, मज्जातंतूंचे कार्य सुरळीत  राखणे इत्यादीसाठी महत्त्वपूर्ण आहे. जे सूर्यप्रकाशात क्वचितच जातात त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता असते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक क्षमता बिघडण्यासह आकलन क्षमता खालावते आणि सौम्य उदासीनता येते. व्हिटॅमिन ‘डी’चे चांगले स्रोत अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मासे, मशरूम आहेत. या पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा. व्हिटॅमिन ‘डी’साठी सूर्यप्रकाशातून मुबलक प्रमाणात मिळते अन्‌ तेही निशुल्क. 

मॅग्नेशिअम आणि झिंक 
मॅग्नेशिअम आणि झिंक शरीरासाठी महत्त्वपूर्ण तत्त्वे मानले जातात, ज्यांचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. मॅग्नेशिअम अस्वस्थता, सूज येणे, मूड बदलणे, चिंता आणि निद्रानाशापासून मुक्त होण्यास मदत करते. झिंक निरोगी रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासह, रक्तातील साखर स्थिर ठेवते, जखम लवकर बरी होण्यास मदत करते. झिंकमुळे पचनसंस्था बळकट होते. मॅग्नेशियमचे चांगले स्रोत बदाम, भोपळ्याच्या बिया, पालक, डार्क चॉकलेट, केळी, शेंगा, पालेभाज्या इत्यादी आहेत. तर भोपळ्याच्या बिया, तीळ, मशरूम, पालक हे झिंकचे उत्तम स्रोत आहेत.

निरोगी आरोग्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’  
व्हिटॅमिन ई एक चरबी विद्रव्य जीवनसत्व आहे. आपल्या शरीराला दररोज १५ मिलीग्राम व्हिटॅमिन ‘ई’ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन ‘ई’ हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. डोळ्यांच्या आजारासारांपासून बचाव होतो. याशिवाय व्हिटॅमिन ‘ई’ हे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीसाठीदेखील फायदेशीर आहे. विशेष म्हणजे निरोगी त्वचा अन्‌ केसांसाठी व्हिटॅमिन ‘ई’ एक वरदानच मानले जाते. बदाम, पालक, शेंगदाणे, ब्रोकली, ब्लॅकबेरी, लिंबू, संत्री, आवळा ही विटामिन ‘इ’साठी उत्तम स्रोत आहेत.

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली