मन तो बच्चा है..!
मन स्वस्थ तर तन स्वस्थ, हेच स्वस्थ मन धन-संपत्ती प्राप्तीचा यशोमार्ग बनत जाते. यात मनाला खूप सांभाळावे लागते. कारण भौतिक सुखाचा साठा जमवताना नको त्या तडजोडी कराव्या लागतात. या तडजोडी करत असताना जर मनाविरुद्ध कृत्य होत असेल, तर कालांतराने अंतर्मनाचा विसर पडत जातो. ही अवस्था म्हणजे स्वतःपासून तुटत जाणे. ही अशी अवस्था निर्माण होऊ नये म्हणून रोज एकांतात स्वमनाशी संवाद व्हायलाच हवा. कारण ‘मन तो बच्चा है..!’ मन लहान बाळासमान निस्वार्थ, निरागस, निष्पाप असते. जे-जे वाईट ते-ते आपण आपल्या बाळापासून लांब ठेवतो. तेच आपल्या मनासोबत आपल्याकडून व्हायला हवे. कारण अंतर्मन जसे एैकेल, बघेल त्यातच गुंतत जाते, मग ते चांगले असो किंवा वाईट. म्हणून प्रारंभीच आपल्या प्रत्येक कृतीचा परिणाम मनावर कसा होत आहे, हे तपासले गेले पाहिजे. अन्यथा संस्कार बिघडत जातील. ही अवस्था म्हणजे अंतर्मनाचा मृत्य..! स्वतःकडून स्वतःच्या मनाची क्रूर हत्या..! म्हणून वेळीच सावध होऊन संस्कार जपत यशोशिखर गाठणे सर्वोत्तम. कारण ही यशपूर्ती संस्कारी मनाच्या संमतीने मिळालेली असते, जी चिरंतन अन् आत्मीक सुख-समाधान प्रदान करणारी ठरते.
मनविकारांतूनच अधोगती
‘कळत पण वळत नाही’ हे केवळ एक म्हण म्हणून एैकले जात असेल तर पुढे अधोगती ठरलीच समजा. अहंकार, मत्सर, इर्षा, लोभ, काम, क्रोध यातूनच मनोविकार होतो. हे माहिती असूनही यापासून मुक्त होता येत नसेल, तर दुष्परिणाम वाट्याला येतीलच. हे वाईट संस्कार अधोगतीकडे नेल्याशिवाय राहत नाही, याची जाणीव असायलाच हवी. दुर्लक्षित केलेली पहिली चूक पुढे मानसिक, शारीरिक अन् आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकते. याउलट सुसंस्कार घडवणारे कृत्य भौतिक सुख प्राप्तीसह आत्मीक आनंद देणारे ठरते. इतरांसाठी कल्याणकारी बनाल तर आपोआपच आपलेही कल्याण होईल, यावर दृढ विश्वास असायला हवा. आज कित्येक उदाहरण आपल्यासमोर आहेत, की त्यापुढे आपण आजही नतमस्तक होतो. स्वामी विवेकानंद, श्री. रतन टाटा, श्री. ए.पी.जे. अब्दुल कलाम, सिंधुताई सपकाळ अशा महान आत्मा नक्कीच मनोविकारांपासून मुक्त असल्याचे सिद्ध होते. आयुष्य फार छोटे आहे. म्हणून मनाला पीडित करणाऱ्या या विकारांना तिलांजली देत आपल्या निराकार, निरागस, निष्पाप, निस्वार्थ अन् कल्याणकारी अंतर्मनाला ओळखा त्यातली दिव्य शक्ती अनुभवा..! नक्कीच हा जीवनप्रवास सुखमय होईल.

मनासाठी हवे सुसंस्काराचे धन
आपले बाळ चांगल्या संगतीत असावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. त्यासाठी बारकाईने लक्षही दिले जाते. कारण आपल्या बाळाला बरे-वाईट यातला फरक अजून समजलेला नसतो. म्हणून त्याला बरे-वाईट समजवण्याचा प्रयत्न केला जातो. कुठे अन् कोण, कसा दगा देऊ शकतो, याचे प्रशिक्षण दिले जाते. आपले बाळ संस्कारी जीव म्हणून नावारूपाला यावे यासाठी सदैव प्रयत्नशील असतो; मात्र आपण आपल्याच स्वमनावर सुसंस्कार घडविण्यास अपयशी का ठरतो, यावर चिंतन होणे गरजेचे आहे. आपले मनही एक बाळच असल्याचे आपण का विसरतो. आपल्या हातून झालेली चूक मनाला दुःखी करते, मग एकांतात मनाशी संवाद साधत, पुढे ही चूक होणार नाही, अशी कबुली देत मनाला आश्र्वस्त का करता येत नाही..? हा प्रत्येकाल प्रश्न पडायलाच हवा..! उशिरा का होईना..! मनाशी संवाद साधत स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करायलाच हवा. ‘मन तो बच्चा है..!’ म्हणून अंतर्मनाला काय हवे याचा शोध घ्या. म्हणजे मनाचे उत्तम संगोपन होईल अन् जगणंही सुंदर होईल. धन शरीरासाठी, तर मनाला सुसंस्कारांचे धन लागते, हे विसरता कामा नये..!

मन मित्र असावा
मैत्रीत निरागसता, समर्पण असते. इतरांसाठी आपण म्हणजे आपला देह. भोवताली आपला देह म्हणूनच आपण ओळखले जातो. हा देह अनेक नात्यांत बांधलेला असतो. यातूनच एक नाते म्हणजे मैत्रीचे नाते. हीच मैत्री अव्यक्त भाव अन् देहबोली समजून घेण्यास समर्थ असते. अन् हीच समर्थता कुठल्याही परिस्थितीत धीर अन् प्रोत्साहित करत असते. त्याचप्रमाणे मनमित्रही असणे गरजेचे आहे. मनमित्र म्हणजे सरळ सरळ आपल्या मनाला स्पर्श करू शकणारे मन. मनातील परिस्थिती समजू शकणारे मन. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असा धीर देणारे मन. आपण प्रत्येकाने अंतर्मुख होऊन यावर विचार करायला हवा. नक्कीच अशी व्यक्ती सापडेल, जिला मनमित्र म्हणता येईल. ती आपल्या मनाची कुठलीही परिस्थिती समजून घेण्यास समर्थ असेल. अशा हृदयस्पर्शी व्यक्तीजवळ मन मोकळे करता आले पाहिजे. बेधुंद जगता आले पाहिजे. भावविश्वात रमता आले पाहिजे. केव्हाही, कधीही एकरूप होता आले पाहिजे. सुखाचा महासोहळा अनुभवत आला पाहिजे. मग, आजच, आताच तो मनमित्र शोधा. म्हणजे संगतीन जगणं सुंदर करता येईल..!

संस्थापिका, संचालिका : एचके लर्निंग ॲन्ड एनएए
नाशिक (महाराष्ट्र), मो.नं. 7887380556
आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे. आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Website : https://hklearning.ml
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा