निसर्गातील चमत्कार आणि रहस्य..!
पंचरंगी नदी दक्षिण-उत्तर अमेरिका खंडातील देश काेलंबियामध्ये एक पंचरंगी नदी आहे. या नदीला इंद्रधनुषी नदी असेही म्हणतात. या नदीचे पाणी दरवर्षी जुलै ते नाेव्हेंबर दरम्यान पिवळा, हिरवा, भुरकट, काळा आणि लाल रंगात बदलते. या नदीकडे निसर्गचमत्कार म्हणून पाहिले जाते. संशोधाअंती यापाठीमागे वैज्ञानिक कारण जबाबदार असल्याचे सांगितले जाते. या नदीच्या किनाऱ्यावर एक लाल रंगाचे राेपटे उगवते त्यामुळे पाण्याचा रंग बदलतो, तर बाकीचे रंग मातीमुळे बदलत असल्याचे सांगितले जाते.
पक्ष्यांचा आकार हाेताेय कमी ग्लाेबल वाॅर्मिंगमुळे पक्ष्यांचा आकार लहान हाेत असल्याचे निदर्शनात आले आहे. यापुढील भयानकता म्हणजे, ग्लाेबल वाॅर्मिंगवर नियंत्रण न मिळवल्यास पृथ्वीवरून पक्ष्यांच्या अनेक जाती लुप्त हाेण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जगभरात हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. याचे दुष्परिणामही समोर येत आहे. पक्ष्यांची शरीर रचना बदलत आहे. पक्ष्यांवरच नाही तर याचा परिणाम मानव जातीवरही दिसून येत आहे. मानवी उंची कमी होत असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पृथ्वीवर उष्णतामान वाढत असून, त्यात टिकून राहण्यासाठी प्राणी व पक्ष्यांच्या शरीराचा आकार बदलत असल्याचे आढळून आले आहे. ऑस्ट्रेलियात पक्ष्यांचा आकार खूपच कमी झाल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. अबब..! 30 काेटी अंडी देणारी मासळी अमेरिकेतील लुगना सी बीचवर एक विशालकाय सनफिश मासळी आढळून आली आहे. ही मासळी एका वेळी चक्क 30 काेटी अंडी घालू शकते. या मासळीची लांबी 10 फूट असून, ही कशेरूकी प्रजातीची आहे. या प्रजातीची ही सर्वांत लांब मासळी असल्याचे सांगितले जाते. या मासळीचे डाेळे चमकदार, डाेके माेठे आणि कल्ले लांब आहेत. ही मासळी सी-बीचपासून 600 फूट दूर आढळून आली आहे. हिम नद्या वितळताय..! आशिया खंडातील हिम नद्या वितळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जाते. हिम नद्या वितळणे हे खुपच धोक्याचे मानले जात आहे. असा इशारा एका संशाेधनाद्वारे देण्यात आला. लिड्स विद्यापीठाने हे संशाेधन केले आहे. हिमालयातील हिमनद्यांमधील बर्फ गेल्या काही दशकांत दहापट नष्ट झाला आहे. जगातील अन्य हिमनद्यांपेक्षा हिमालयातील हिमनद्यांच्या वितळण्याचा वेग ‘असाधारण’ असल्याचे या संशोधनात सांगण्यात आले. या हिमनद्यांचे क्षेत्रफळ 28 हजार किलाेमीटरवरून आता 19,600 किलाेमीटर उरले आहे. वितळलेल्या बर्फामुळे जागतिक पाणीपातळी 0.92 ते 1.38 मिलिमीटर वाढल्याचेही या संशाेधनात दिसून आले. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे बोलले जात आहे. हिमालयाचा उल्लेख ‘तिसरा ध्रुव’ असाही केला जाताे. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधूसारख्या माेठ्या नद्यांचा उगम हिमलयातून होतो. बापरे बाप..! 130 फूट खाेल विहिर..! विहीर जास्तीत जास्त 60 फूट खोल असू शकते. मात्र निसर्गाचा चमत्कार बघा..! अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील विम्बर्ले शहरातील एक विहीर चक्क 130 फुट खाेल आहे. नैसर्गिकरित्या तयार झालेली ही विहीर चमत्कारिकच वाटते. ही जगातील सर्वांत खाेल विहीर मानली जाते. अॅडव्हेंचर लव्हर्ससाठी हा अतिशय लाेकप्रिय डायव्हिंग स्पाॅट असून डायव्हिंग आणि पाेहण्याचा छंद असलेल्या लोकांची येथे नेहमीच गर्दी असते. पोहण्याच्या मोहापायी अनेक लाेकांनी या विहिरीत जीव गमावल्याचेही समोर आले आहे. ही विहीर अत्यंत धाेकादायक असूनही उन्हाळ्यात हिला पाहण्यासाठी हजाराे पर्यटक येथे येतात. काय.. ? सापाचे विष जीवरक्षक..! सर्प म्हटले कि, अनेकांना घाम फुटायला लागतो. भीतीपोटी सैरभैर झाल्यागत होते. अंगावर काटे उभे राहतात..! परंतु एक सापाची प्रजाती अशी आहे, की त्याच्या विषाचा वापर जीवरक्षक म्हणून होतो. रक्तस्राव थांबत नसल्यास या विषाचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. हे विष चिकट पदार्थासारखे काम करते आणि जखम बांधून धरते ज्यामुळे रक्तस्राव हाेत नाही. हिरव्या रंगाच्या आणि लाल किनार असलेल्या लान्स हेड स्नेकपासून एक चिकट द्रव तयार केला जाताे, ताे एखाद्या जेलसारखा काम करताे. हा साप अमेरिकेत आढळताे. सायन्स अॅडव्हान्सेस या मासिकात याबाबत शाेधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. (माहिती स्रोत इंटरनेट)
लेखक : कैलास एन. हिरोडकर
संपादक : एचके ब्लॉग
संचालक : एचके लर्निंग अँड एनएनए

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा