मानवाच्या हाती जादूची कांडी..!

एचके लर्निंग अँड एनएए :
आपण जास्तीत जास्त पृथ्वीवर असणाऱ्या स्थळांची किंवा त्यांना भेट देण्याची कल्पना करू शकतो. मात्र जगात असेही मानवी समूह आहेत की, ज्यांची कल्पनाशक्ती अफाट तर आहेच, पण या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी हे मानवी समूह अव्याहत प्रयत्नशीलही आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अशक्य ते शक्य होताना आपण  पाहतच आहोत. यांत्रिकीकरण झाल्यानंतर मानवाच्या हाती जादूची कांडीच मिळाल्यागत वाटत आहे. चला तर मग या तंत्रज्ञाच्या जोरावर सध्या काय काय घडत आहे ते पाहूया..!

रोबोट जाणार चंद्रावर..! 
चंद्रावरील मातीचा अभ्यास करण्यासाठी छाेटे राेबाेट पाठवण्याचे मेक्सिकाेच्या संशाेधकांनी ठरवले आहे. चंद्रावरील मातीचा अभ्यास करणे या पाठीमागचा उद्देश असणार आहे. हे राेबाेट दाेन चाकांचे असतील आणि चंद्रावरील मातीचे नमुने तसेच स्थानिक स्थितीचे फाेटाे टिपण्याचे काम करतील. एक पाैंडपेक्षा कमी वजन आणि चार इंच रुंदीचे हे राेबाेट असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

काय? मंगळ ग्रहावर लोकांची वस्ती..!
मंगळावर 10 लाख टन सामान नेण्यासाठी 5 हजार ट्रिप कराव्या लागतील. एक चाैरस किलाेमीटर फार्म ट्रान्सफर केल्यास तेथे 5 हजार शाकाहारी लाेकांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य होणार असल्याचा दावा उद्याेगपती मस्क यांनी केला आहे. पृथ्वीव्यतिरिक्त  काेणत्याही ग्रहावर वस्ती विकसित झाल्याचा पुरावा अद्याप तरी मिळालेला नाही. मात्र मंगळ ग्रहावर मानव वस्ती निर्माण करणे श्यक्य होईल का, हे येणारा काळच  सांगू शकेल. पण अ‍ॅलन मस्क यांनी  मंगळ ग्रहावर शहर वसविण्याचे स्वप्न दाखवून जगातील अनेक धनी लाेकांची उत्सुकता वाढवलेली आहे. हे मात्र खरे. 

बापरे..! 11 काेटी 25 लाखाचे घड्याळ..!
जगातील सर्वांत महाग सुपरकार्समध्ये शुमारबुगाती मिनिएचर इंजिन बसविलेले आहे. याच दृष्टीने ही कंपनी जगभर लाेकप्रिय आहे. आता ही मिनिएचर घड्याळ मनगटावर बांधता येणार आहे. जेकब अ‍ॅन्ड कंपनीने बुगातीसाेबत मिळून, हे घड्याळ तयार केले असल्याचे सांगितले जात आहे. या घड्याळाची किंमत आहे चक्क 11 काेटी 25 लाख रुपये..! आहेना कमाल..!

6-जी तंत्रज्ञान 
5-जी तंत्रज्ञा
नामुळे डिजिटल क्षेत्रात मोठे बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. याही पुढे आता देशात माेबाइल तंत्रज्ञानाची सहावी पिढी विकसित करण्याचे कामही जोमात  सुरू झाले आहे. 6-जी नेटवर्क विकसित करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने एका टास्क फाेर्सवर साेपविल्याचे समजते. 6-जी तंत्रज्ञानातील यंत्रे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंगयुक्त असतील आणि ती स्वत:चे निर्णय घेऊ शकतील. 4-जी आणि 5-जीच्या तंत्रज्ञानात मागे पडल्यामुळे भारताने आता 6-जी तंत्रज्ञान आणण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भातील संशाेधन पूर्ण हाेण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी  लागेल, ताेपर्यंत माेबाइलफाेन 5-जी तसेच 5-जी प्लस या तंत्रज्ञानावर काम करतील. 

आता लाेकलमध्येही ब्लॅक बाॅक्स..! 
आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 2.5 काेटींची तरतूदही  करण्यात आली आहे. मुंबईतील लाेकलमध्ये विमानातील ब्लॅक बाॅक्सप्रमाणेच ऑडिओ-व्हिडिओ रेकाॅर्डिंग प्रणाली बसवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लाेकलमध्ये ही प्रणाली बसवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सूर्याची रहस्ये उलगडणार? 
शास्त्रज्ञ सूर्याच्या संदर्भात गेल्या 400-450 वर्षांपासून निरंतर अध्ययन करीत आहेत.  सूर्याच्या बाबतीत आजतागायत ज्ञानात नव्हे तर अज्ञानातच भर पडलेली आहे. परंतु आता पार्कर साेलर प्राेव हे अंतराळ यान सूर्याच्या सपाटीपासून अंदाजे 5.3 मिलियन मैल (8.5 मिलियन किलाेमीटर) अंतरावर पाेहाेचले आहे. म्हणून आता तरी सूर्याची रहस्ये उलगडतील, अशी आशा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सूर्य अवाढव्य चुंबक आहे. सूर्याचे चक्र दर 11 वर्षांनी बदलते. याला साैरचक्र असे म्हणतात. या साैरचक्रादरम्यान सूर्याच्या सपाटीवर अंदाजे 40,000 किलाेमीटर लांब तेजशिखा आहेत. याला साेलर फ्लेअर्स (दीपशिखा) असे म्हणतात. त्यात इले्नट्राेन, प्राेटाेन इ. वीजकण असतात, असे खगाेलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत काेणीही मानव किंवा वाहन सूर्याजवळ पाेहाेचलेले नाही. परंतु आता पार्कर साेलर प्राेव हे अंतराळ यान सूर्याच्या सपाटीजवळ पाेहाेचण्यात यशस्वी झाल्यामुळे आता आगामी काही वर्षांत सूर्याची रहस्ये उलगडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 
(माहिती स्रोत इंटरनेट)

लेखक : कैलास एन. हिरोडकर

संपादक : एचके ब्लॉग

संचालक : एचके लर्निंग अँड एनएनए


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली