आकाशात दिसला रहस्यमय तारा..!


एचके लर्निंग अँड एनएए  : 
संपूर्ण ब्रह्मांड एक रहस्यच म्हणावे लागेल. दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. अशातच आकाशात एक अशा रहस्यमय वस्तूचा  शोध लागला आहे की, जी दर 20 मिनिटांनी रेडिओ तरंग किरण उत्सर्जित करते. ही वस्तू खूप मजबूत चुंबकीय क्षेत्रासह हळूहळू फिरणाऱ्या न्यूट्राॅन ताऱ्याचा एक नवीन भाग असू शकते, असे  म्हटले जात आहे. 2018 च्या पहिल्या तीन महिन्यांत वारंवार यातून सिग्नल मिळाले; परंतु नंतर ते गायब झाले. हे सिग्नल्स स्टारक्वेकसारख्या एकदाच घडणाऱ्या घटनेशी संबंधित हाेते. इंटरनॅशनल सेंटर फाॅर रेडिओ अ‍ॅस्ट्राेनाॅमी रिसर्चच्या कर्टन युनिव्हर्सिटी नाेडच्या शाेधपथकाचे नेतृत्व करणाऱ्या नताशा हर्ले-वाॅकर यांनी हे खगाेलशास्त्रज्ञांसाठी भीतिदायक असल्याचे म्हटले आहे. 

एक फिरणारी वस्तू
अशाप्रकारची लक्षणं दाखवणारी कुठलीही वस्तू आकाशात उपलब्ध नाही. म्हणूनच हे सर्व भीतीदायक वाटले असावे, असा भीतीच्या मागचा अर्थ काढण्यात आला आहे. सिग्नलचं स्वरूप असामान्य असलं तरी हा टेक्नाेलाॅजीचा परिणाम नसून एक फिरणारी वस्तू असू शकते, असे बोलले जात आहे. हर्ले-वाॅकर म्हणाल्या हे एलियनतर न्नकीच नाहीत. टीमने या शक्यतेचा थाेडक्यात विचार केला हाेता; परंतु काही गाेष्टी स्पष्ट केल्यावर ती शक्यता नाकारली. त्याचं कारण म्हणजे सिग्नल जे अवकाशातील सर्वात तेजस्वी रेडिओ स्राेतांपैकी एक हाेते. त्याचा फ्रिक्वेन्सीच्या विस्तृत स्पेक्ट्रममध्ये शाेध घेता येत हाेता, याचाच अर्थ की हे सिग्नल्स तयार करण्यासाठी माेठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता हाेती.

अधिक संशाेधन सुरू
आकाशगंगेच्या समतलात सुमारे 4 हजार प्रकाश-वर्षे दूर असलेल्या एका काल्पनिक खगाेलीय वस्तूशी हे सुसंगत असल्याचे बोलले जात आहे.  ज्याला अल्ट्रा-लाँग पीरियड मॅग्नेटर म्हणतात. हर्ले-वाॅकर म्हणाल्या की, हा एक प्रकारचा हळूहळू फिरणारा न्यूट्राॅन तारा असू शकताे. ज्याच्या अस्तित्वाचा सैद्धांतिकदृष्ट्या अंदाज लावला गेला आहे; पण काेणीही अशा पद्धतीने त्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण ताे तारा इतका तेजस्वी असेल अशी अपेक्षा नव्हती. यासंबंधी अधिक संशाेधन सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

(माहिती स्रोत इंटरनेट)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!