रोगप्रतिकारकता वाढवण्यासाठी..!

एचके लर्निंग अँड एनएए : 
निरोगी जगण्यासाठी पौष्टिक आहार आणि व्यायाम यावर लक्ष केंद्रित करणे खूपच गरजेचे असते. अपायकारक पदार्थ सेवन केल्यास अनेक शारीरिक समस्याना सामोरे जावे लागते. काय आणि किती खावे, हे ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. हेच आवडते म्हणून मी हेच खाणार किंवा हे आवडत नाही म्हणून मी हे नाही खाणार. असा हट्ट आरोग्य बिघडवण्यास पुरेसा आहे. आवड किंवा चवीसाठी खाण्याचा मोह टाळता आला पाहिजे. आरोग्यासाठी प्रोटीन, व्हिटॅमिन असे बरेच घटक आहेत, की ज्यांचा आहारात समावेश असायलाच हवा. फळे, पालेभाज्या यातून मुबलक प्रमाणात आरोग्यदायी घटक मिळतात. अशाच काही फळांबद्दल जाणून घेऊया. 


व्हिटॅमिन 'सी'युक्त संत्री 
माेसमी फळांचे सेवन करणे अत्यंत आराेग्यदायी मानले जाते. या फळांमध्ये असलेले पाैष्टिक घटक आपल्याला आजारांपासून वाचवतात. व्हिटॅमिन सी ने भरपूर असे एक फळ म्हणजे संत्रे. यात फायबरही उत्तम प्रमाणात आढळते. मिनरल्स व इतर पाैष्टिक घटकही संत्रीमध्ये आढळून येतात. जे आपली इम्यूनिटी मजबूत करण्यात मुख्य भूमिका बजावतात. इम्यूनिटी स्ट्राँग असेल  तर सर्दी-पडसे, खाेकला अशा समस्या होत नाही. संत्रींमध्ये  व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे  वजन कमी करण्यातही उपयुक्त असते. फायबर सेवन केल्याने भूक कमी लागतेच शिवाय कॅलरीह नियंत्रणात राहते.

विविध गुणसंपन्न बिट 
बीटामध्ये भरपूर प्रमाणात खनिज लवण आढळतात, म्हणजे लाेह, पाेटॅशियम, सल्फर, क्लाेरीन, साेडियम, आयाेडीन, काॅपर, जीवनसत्त्व अ, ब, क इत्यादी मुबलक प्रमाणात आढळते. बीट किडनी आणि पित्ताशयाची स्वच्छता करण्यास सक्षम आहे. किडनी आणि पित्ताशयातील खडे घालवण्यासाठी बीट सहाय्यक ठरते. बीट, गाजर, काकडी यांचा रस समप्रमाणात सेवन केल्यास  काही दिवसातच खडा मूत्रमार्गाद्वारे शरीरातून बाहेर पडताे. मधुमेही रुग्णांनी बीटचे सेवन टाळलेलेच बरे. 

आरोग्यदायी गाजर 
अधिक रक्तस्त्रावामुळे महिला अ‍ॅनिमियाग्रस्त हाेतात. पण गाजरात असणारं बीटा कैराेटीन केवळ रक्तस्त्रावच  कमी करत नाही तर वेदनांपासूनही आराम देते. मासिक पाळीच्या दिवसात एक ग्लास गाजराचा रस पिणे अत्यंत फायद्याचे  ठरते. गजरात  अ जीवनसत्त्व 334 टक्के असते. म्हणजे शंभर ग्रॅम गाजरात 50118 मायक्राेग्रॅम अ जीवनसत्त्व असते. यामुळे यापासून प्रथिनं, फायबर्सही मुबलक प्रमाणात मिळतात.

तंदरुस्तीसाठी पालक 
पालेभाज्यांमध्ये पालक खूपच महत्वाची मानली जाते. तंदरुस्त राहण्यासाठी पालक सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पालक विविध प्रकारे सेवन करू शकतो. कच्चा, शिजवून, सूप करूनही याचे सेवन केले जाऊ शकते. पालकामध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आढळते. यामुळे हाडे मजबूत हाेतात. पालकामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. पालकाचे सेवन केल्यामुळे डाेळ्यांचे आरोग्य ठीकठाक राहते. यात अँटीऑक्सिडंट  पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरात संक्रमणाचा धाेका कमी होतो ज्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य होते. यात मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. पालक सेवन केल्याने वारंवार थकवा जाणवण्याची समस्या कायमची दूर करता येते. ज्यांना अ‍ॅनिमियाचा त्रास आहे  त्यांनी पालक खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.

गुणकारी आवळा 
आयर्वेदमध्ये आवळा खूपच महत्वाची भूमिका बजावतो. पचनाच्या समस्यांमध्ये आवळा रामबाण उपाय म्हणून पहिला जातो. व्हिटॅमिन सीने भरपूर आवळ्याच्या ज्यूसमध्ये झिंक, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारकता वाढवण्यास मदत मिळते. आवळा सेवन केल्यास रक्त शुद्ध होवून  विविध आजारांपासून बचाव करता येतो.. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट व व्हिटॅमिन सीमुळे त्वचेत चमक राहते. याशिवाय विविध त्वचा रोगापासून बचावही होतो. आवळा एसिडिटीवर खूपच गुणकारी मानला जातो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवळा सेवन करण्याचा तज्ञांकडून नेहमीच सल्ला दिला जातो. डाेळ्यांमधील खाजेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. राेज सकाळी रिकाम्यापाेटी एक ग्लास पाण्यात आवळ्याचा ज्यूस घेतल्यास शरीरातील टाॅक्सिन्स निघून जातात. वजन कमी करण्यासाठीसुद्धा आवळ्याचा उपयोग केला जातो. 

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली