सावधान..! उभ्याने जेवताय..?

एचके लर्निंग अँड एनएए :
आजच्या धकाधकीच्या जीवनात नुसती पळापळ आणि घाईच घाई दिसते. सर्व जगणंच घाईचे बनत आहे. स्वतःसाठी वेळ काढणे तर दूरच. त्यात आरोग्याची काळजी घेणे दुर्लक्षित होत आहे. वर्तमान आणि फक्त वर्तमान एवढाच विचार करून नुसती धावाधाव करतोय आपण. शिष्टाचार, संस्कृति, सभ्यता याचा पुरता विसर पडतोय. आणि कालांतराने म्हणजे भविष्यात मोठे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. सध्या जेवण करणे फक्त पोट  भरण्याच्या मानसिकतेतून केले जाते. आरोग्य उत्तम राहावे असा भाव कुठेच नसतो. म्हणून वाट्टेल तेथे आणि वाट्टेल तसे जेवण घेतले जाते. सध्या उभे राहून  जेवण घेण्याचे प्रमाण वाढतच आहे. जे आरोग्यासाठी खूपच धोक्याचे आहे. म्हणून पचनाच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. मुतखडे, किडनी स्टोन रुग्णांमध्येही वाढ होताना दिसते.  चला तर मग उभे राहून जेवण किती घातक आणि  मुतखड्यावर नैसर्गिक पद्धतीने कसा आराम मिळवता येईल ते पाहूया. 
   

उभे राहून जेवण करणे धोक्याचे
भारतीय सभ्यतेनुसार जमिनीवर बसून अन्न खाणे  आरोग्यदायी मानले जाते. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपापल्या सोयीनुसार अन्न खाणे पसंत केले जाते. ज्यामुळे पुढे जाऊन विविध व्याधींना सामोरे जावे लागते. बसून जेवण केल्याने मेंदूला संदेश जातो की तुम्ही अन्न खाल्ले आहे. यामुळे जेवणादरम्यान जास्त खाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याचा धोकाही कमी होतो. उभे राहून जेवण केल्याने व्यवस्थित पचन होत नाही, परिणामी पोटात गॅसेस, पोट  फुगणे आणि शरीरावर सूज येण्याच्या समस्या निर्माण होतात. उभे राहून खाल्ल्याने अन्नाचे पचन ३०% जलद होते आणि जेवल्यानंतर काही तासांनंतरच भूक लागते. जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. कारण अन्न सूक्ष्म कणांमध्ये मोडण्यापूर्वी आतड्यात जाते. यामुळे आतड्यांवरील दाब वाढतो आणि पचनाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे आपल्यालाही उभे राहून जेवण करायची सवय असेल तर ती सोडा आणि आपले आरोग्य जपा. 

मुतखड्यावर नैसर्गिक उपाय
चुकीच्या पद्धीतीचा आहार किंवा जेवणाची चुकीची सवय विविध आजारांना निमंत्रण असते. 
मुतखडे फक्त  किडनीमध्येच होत नाहीत तर मूत्रमार्गात आणि पित्त मूत्राशयात देखील होऊ शकतात. पित्त मूत्राशय हा यकृताखाली एक लहान नाशपातीच्या आकाराचा अवयव आहे जो पित्त साठवतो आणि सोडतो. वरच्या उजव्या ओटीपोटात, उजव्या खांद्यामध्ये किंवा खांद्याच्या ब्लेड दरम्यान वेदना, मळमळ, राखाडी मल, अतिसार आणि उलट्या अशी लक्षण या आजाराची असतात. जास्त कोलेस्टेरॉल किंवा जास्त बिलीरुबिन तयार झाल्यामुळे पित्त खडे तयार होतात. या आजारापासून नैसर्गिकरित्या आराम मिळण्यासाठी सफरचंदाचा रस घेण्याचा सल्ला आयुर्वेद तज्ञांकडून दिला जातो. सफरचंदाचा रस पित्ताशयातील खडे मऊ करतो, ज्यामुळे ते बाहेर पडणे सोपे होते. सफरचंदाच्या रसात सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून पिणे फायदेशीर आहे. या आजारापासून मुक्त होण्यासाठी  डँडेलियन चहा किंवा कॉफीचाही उपयोग केला जातो. लिसिमाचिया हर्बा हा पित्ताशयाच्या खड्यांसाठी एक लोकप्रिय पारंपरिक चीनी उपाय आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने वरील उपाय करता येऊ शकतात. 

कैलास एन. हिरोडकर संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत. वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली