अस्वस्थता आणि भीतीवर उपाय

एचके लर्निंग अँड एनएए :
तणाव, अस्वस्थता यातूनच जन्म होतो भीती या मानसिकतेचा..! यामुळे अकारण कसलीही भीती वाटायला लागते. सकारात्मकता लोप पावत जाते आणि नकारात्मक विचारांची गर्दी वाढत जाते. अशी अवस्था टाळण्यासाठी हृदय आणि मेंदू यांच्यात समन्वय असायला हवा. हे वेळीच लक्षात यायला हवे. जीवनात केव्हा ना केव्हा भीती, चिंता यांना सामाेरे जावेच लागते. वाढलेल्या तणावांमुळे आपल्या मज्जासंस्थेवर सतत दबाव येतो त्यामुळे साहजिकच चिंताही वाढत जाते. याला सध्याची जीवनशैली कारणीभूत म्हणावी लागेल. अपुरी झाेप हेही यातले प्रमुख कारण म्हणावे लागेल. चिंता आणि अपुऱ्या झोपेमुळे अस्वस्थता निर्माण हाेते. अस्वस्थतेबराेबरच ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली जाते त्यावरून आयुष्य सोपे किंवा अवघड बनत जाते. परिस्थिती कशीही असो मात्र तणाव, अस्वस्थता आणि भीतीवर मात करता आलीच पाहिजे  म्हणजे वेळीच पुढे होणारे अनर्थही टाळता येतात. 

मानसिकतेत हवा बदल 
आरोग्य ठीकठाक राहावे म्हणून काही लोक रासायनिक औषधांचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. काहींच्या बाबतीत तर या औषधांचे सेवन तर केवळ भीतीपोटी होत असते. औषधे बंद हाेताच अस्वस्थता परत येते. कारण मनात भीती घर करून असते, कि औषध नाही घेतले तर त्रास होईल. हि मानसिकता वेळीच बदलायला हवी. आपली जागरूकता शाबूत ठेवल्यास भीतीवर नक्कीच मात करता येते. आपले सशक्तीकरणच यावर प्रभावी शस्त्र ठरते. अकारण भीती धाेकादायक असून मानसिकदृष्ट्या कमकुवत करणारी असते. याउलट वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. अकारण आपण का अस्वस्थ होत आहोत? याचा स्वतः विचार करत या अवस्थेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा. भीती वाटत असेल तर का आणि कशाची? याचा नीट विचार करून त्या भीतीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करायाला हवा. यावेळी आपले मन निर्भय, बळकट आणि आत्मविश्वास वाढवत भीतीला नष्ट करण्याचा प्रयत्न कराता आला पाहिजे. ठरवले तर नक्कीच होते अन्यथा भीती मनात साठून अकार्यक्षमतेने मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येते. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत याचे सदैव भान असायला हवे. म्हणून जागरूक राहून प्रत्येक परीस्थिती सकारात्मकपणे हाताळायलाच हवी.   

आत्मपरीक्षणाने स्वतःला ओळखा    
जेव्हा तणाव, अस्वस्थता आणि भीती अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा स्वतःला सावरत आत्मपरीक्षण करायला हवे. तरीही परिस्थिती आटोक्यात येत नसेल तर एखाद्या विश्वासू मित्र किंवा मैत्रिनीसोबत मन मोकळे करत बाेलायाला हवे. मनातला विचार लिहून ठेवत त्यावर वारंवार आत्मनिरीक्षण करुण वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न असायला हवा. यामुळे या भयावह परिस्थितून बाहेर येण्यास नक्कीच मदत होते. आपल्या शरीरात आणि भोवताली काय चालले आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजेच आत्मनिरीक्षण. हे समजून घ्यावयाचे असेल, तर मनातील विचार आणि भावनांबराेबरच शरीर देत असलेले संदेश जाणून घ्यायला हवेत. शरीराचे संदेश जेवढे चांगल्याप्रकारे समजून घ्याल, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपण स्वत:बराेबर जाेडले जातो. अस्वस्थ असलेल्या बहुसंख्य व्यक्तींना त्यांच्या शरीराचे संदेश व्यवस्थित समजत नाहीत. अशा अवस्थेत  हात-पाय थंड पडून कमजाेरी येणे, श्वासाची लय बिघडणे आणि शरीरात कंपन होणे अशी समस्या निर्माण होते. यालाच शरीर देत असलेले संदेश म्हणता येईल. वेळीच सावध होऊन परिस्थिती आटोक्यात आणायला हवी. त्यासाठी निर्भय आणि मन बळकट करणे अत्यंत गरजेचे असते. अशा अवस्थेत ध्यान करणे उपयोगी ठरते. शांत बसून तीन-चार वेळा खाेल श्वास घेऊन हृदयावर लक्ष केंद्रित करून परिस्थिती नियंत्रणात आणता येते. भीती ही अवचेतन प्रतिक्रिया आहे तर आत्मबाेध ही चेतनशील प्रतिक्रिया. चेतनशील हाेऊन घेतले गेलेले निर्णय नियंत्रणात असतात. अस्वस्थ वाटायला सुरुवात झाल्यावर तिचा सामना करणे हा एक चेतनशील पर्याय आहे. त्याच्या उलट, पळ काढणे म्हणजे भीतीसमाेर गुडघे टेकणे आहे. म्हणून निर्भय बना. चिंता, तणाव अस्वस्थतेपासून मुक्त व्हा..! 

कैलास एन. हिरोडकर संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!