पैसा कमविण्याचे पंचसूत्र..!

एचके लर्निंग अँड एनएए : 
शेअर बाजारात गुंतवणूक अन्‌ ट्रेडिंग करून संपत्ती वाढविण्यासाठी मार्गदर्शन अन्‌ सल्ले सहज मिळतात; मात्र प्रत्यक्षात काम करताना जो अनुभव येतो तो महत्त्वाचा असतो. मार्गदर्शन अन्‌ सल्ला योग्य असेल तर अनुभव उत्तम, अन्यथा नाराजीचा सूर लावला जातो. सर्वकाही मनासारख व्हावं यासाठी स्वत: या क्षेत्रात अभ्यासूवृत्ती ठेवायला हवी. तरच स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येतात. शेअर बाजारातून पैसा कमविण्यासाठी खाली दिलेले पंचसूत्र नक्कीच आपल्या उपयोगी ठरतील. 

शिस्त आणि संयम : शेअर बाजाराच्या माध्यमातून आपली संपत्ती वाढविण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सहसा जे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात, त्यांना वाटते, की ते अल्पावधीत मजबूत नफा कमावू शकतात. मात्र यासाठी गुंतवणुकीचा आणि ट्रेडिंगचा मार्ग कसा निवडला आहे यावर नफा/नुकसान अवलंबून असतो. हे लक्षात ठेवायला हवे. इक्विटीमध्ये ट्रेडिंग करणे सामान्य गुंतवणूकदारांना वाटते तितके सोपेही नाही. त्यासाठी मार्केटमध्ये शिस्त आणि संयम आवश्यक आहे. बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सुक्ष्म अभ्यास असणे खुपच गरजेचे आहे. 

अनुमानांवर निर्णय नको : शेअर बाजारात प्रामुख्याने दोन प्रकारचे ट्रेडर्स असतात. एक जो मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आणि दुसरा जो अनुमानांवर निर्णय घेतो. अनुमानांवर निर्णय घेणे आर्थिक धाेक्याचे ठरते. स्टॉकच्या किमतीबद्दलचा दृष्टिकोन हा या दोघांमधील मूलभूत फरक आहे. मूलभूत गुंतवणूकदार नेहमी कंपनीच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतात स्टॉकच्या किंमतीवर नाही. म्हणून मूलभूत पद्धतीवर गुंतवणूक करणे आर्थिक हिताचेच म्हणावे लागेल. शेअर बाजारातून पैसे कमवण्याचा हा एक उत्तम मार्ग मानला जातो. बरेच ट्रेडर्स स्टॉकची खरेदी किंवा विक्री करण्याचा निर्णय मुख्यतः तज्ञांच्या प्रभावाखाली घेतात. जर प्रत्येकजण एखाद्या विशिष्ट स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असेल, तर ट्रेडर्स देखील त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो. अशा प्रकारची रणनीती टाळली पाहिजे. ही रणनीती दीर्घकालावधीसाठी बरोबर नाही. यापेक्षा स्वत: कंपनीचे टेक्निकल/फंडामेंटल अभ्यासून केलेली गुंतवणूक पुढे आर्थिक फायद्याची ठरते. 

अति घाई नकोच : ‘अति घाई संकटात नेई’ असं म्हणतात. शेअर बाजारात ही म्हण तंतोतंत लागू होते. याठिकाणी घाई नकोच..! गुंतवणुकीआधी टेक्निकल/फंडामेंटल अभ्यासले गेलेच पाहिजे. म्हणून  शेअर बाजारात खरेदीची कधीही घाई करू नये. शेअरची किंमत वाढण्यापूर्वी खरेदी करण्याचा आणि घसरण्यापूर्वी लगेच विकण्याचा निर्णय घेतल्यास तोटा होऊ शकतो. मार्केटमध्ये शिस्त खूप महत्त्वाची आहे. शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता वाढते त्याचबरोबर अनेक संध्याही उपलब्ध होतात. शांतचित्त ठेवल्यास या संध्यांचा फायदा नक्कीच घेता येतो. दीर्घ मुदतीत उत्तम परतावा हवा असेल तर गुंतवणुकीसाठी दृष्टिकोन सातत्य, शिस्त आणि नियोजनबद्धतेचा असावा. 

अतिरिक्त निधी हवा : शेअर्समधील गुंतवणुकीमुळे एखादी व्यक्ती प्रचंड कर्जात अडकल्याचे अनेकदा ऐकायला मिळते. अशी परिस्थिती चुकीचे मार्ग निवडल्यामुळे निर्माण होते. ऑप्शन आणि फ्युचर सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी काही महाभाग विविध मार्गाने कर्ज घेतात आणि अडकतात. यशाचा मार्ग निवडता आला पाहिजे. शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी नेहमी अतिरिक्त निधीचा वापर असायला हवा. अतिरिक्त निधी म्हणजे खर्च आणि इतर गरजा पूर्ण केल्यावर जो निधी शिल्लक राहतो तो अतिरिक्त निधी समजावा. शेअर बाजारातून मिळालेला नफा पुन्हा शेअर बाजारात गुंतवायला हवा. कर्ज घेऊन कधीही गुंतवणूक करू नये. 

भीती आणि लोभावर नियंत्रण : नेहमी भावनांवर आधारित निर्णय घेऊ नका. शेअर्सच्या खरेदी-विक्रीबाबतच्या भावनांवर नियंत्रण नसेल, तर मोठे नुकसान होऊ शकते. जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा ट्रेडर्स अधिक आकर्षित होतात आणि त्या चक्रात ते चुकीच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतात. गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करताना भीती आणि लोभावर नियंत्रण असायलाच हवे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे वास्तववादी ध्येय ठेवा. गुंतवणूकदार नेहमी विचार करतात की त्यांनी केलेली गुंतवणूक उत्तम परतावा देईल. पण आर्थिक ध्येय वास्तववादी नसेल तर अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून वास्तववादी राहायला हवे. अपेक्षा आणि वास्तव यातला फरक जाणून घेतल्यास उत्तम परताव्याचे लक्ष्य नक्कीच साध्य करता येतील. 

(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI


टिप्पण्या

  1. लेख खुपच छान आहे. उत्तम आणि याेग्य मार्गदर्शन केले आहे. शेअर बाजारात लेखकांनी दिलेल्या पंचसूत्रांचा उपयोग केल्यास नक्कीच आर्थिक हिताचे ठरेल यात किंचितही शंका नाही... धन्यवाद एचके ब्लॉगचे या ब्लॉगवर खुपच छान-छान आर्थिक, वैचारिक, मनोरंजनात्मक लेखांचा खजिनाच आहे... (विशाल अग्रवाल, पुणे)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!