झोपेसाठी हवी योग्य दिशा..!

एचके लर्निंग अँड एनएए :
आरोग्यम्‌ धन संपदा..! कमविलेल्या धनसंत्तीचा आनंदाने उपभोग हवा असेल तर आरोग्य उत्तम असणे गरजेचे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी इतर घटकांसह झोप हा घटक खुपच महत्त्वाचा आहे. गाढ झोप म्हणजे आरोग्याला वरदानच. पृथ्वी स्वत:भोवती गोल फिरते हे आपण सर्वांनाच ज्ञात आहे. यावरून प्रत्येक दिशा ही महत्त्वाची अन्‌ त्याचे शरीरावर होणारे परिणामही तितकेच महत्त्वाचे. कोणत्या दिशेला झोपल्यावर शरीर अन्‌ मनावर कोणते परिणाम होतात हे अंधश्रध्दा नसून याला वैज्ञानिक आधारही आहे, हे मुळीच नाकारता येणार नाही. चला तर मग गाढ झोपेसाठी काही नियम पाळूया आणि आरोग्य उत्तम ठेवूया..!

सकारात्मक उर्जेसाठी झोप आवश्‍यक : झोप आपल्या शरीराच्या महत्वाच्या कार्यांपैकी एक आहे. उत्तम अन्‌ गाढ झोप झाल्यानंतर आपोआपच शरीरात अन्‌ मनाभोवती सकारात्मक उर्जा निर्माण होते. झोप शरीराला सक्रीय करते आणि दिवसभरात खर्ची झालेली ऊर्जा पुन्हा भरून काढते. त्यामुळे  रात्री आवश्यक तेवढ्या वेळेची झोप मिळणे नितांत गरजेचे आहे. यामुळे झोपेसाठी योग्य दिशेची निवड करणे महत्त्वाचे ठरते. कोणत्या दिशेला कसे झोपावे हे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. दिशा ठरवून झोपणे ही अंधश्रद्धा नसून याला वैज्ञानिक आधारही आहे. हे समजून घेण्यासाठी चारही दिशांना पसरलेल्या ऊर्जेविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. कारण यामुळेच आपल्या आरोग्यावर चांगले वाईट परिणाम होत असतात.

उत्तर दिशेला जाणवते अस्वस्थता :  उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये. कारण असे झोपल्यास रात्रभर अस्वस्थता जानवते. गाढ झोप लागत नाही तर मध्ये अचानक जाग येऊन भिती अन्‌ अस्वस्थता वाढते.आयुर्वेदात असे मानले जाते की, उत्तर दिशेला वाहणाऱ्या मॅग्नेटिक वेव्ज डोक्यात प्रवेश करतात आणि ब्लड सर्क्यूलेशनवर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे रात्री गाढ झोप लागत नाही. भयावह अन्‌ विचित्र स्वप्न येतात. दिवसभर नकारात्मक ऊर्जा अंतर्मनात निर्माण होते ज्यामुळे कुठल्याच कामात उत्साह राहत नाही. चिडचिड अन्‌ उदासीनता पसरते. त्यामुळे चुकूनही उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये.    

पूर्व दिशा वाढवते बुध्दीमत्ता : पूर्व दिशेला डोकं करून झोपणे सर्वात चांगले समजले जाते. या दिशेला झोपल्याने स्मरणशक्ती वाढते. मनात सकारात्मकता निर्माण होऊन उत्तम विचारांचा संचार होतो. अध्यात्मिकदृष्ट्या ध्यानासाठी हीच दिशा निवडली जाते. वैज्ञानिकदृष्ट्याही पुर्व दिशा महत्वाची मानली जाते. या दिशेला झोपल्याने ब्लड सर्क्यूलेशन नियंत्रणात राहते. एखाद्या विषयावर चिंतन करताना एकाग्रता वाढते. या दिशेला गाढ झोप येत असल्याने आरोग्यातही सुधारणा हाेते. 

पश्चिम दिशेकडे वाईट स्वप्न : पश्चिमेकडे डोकं करून झोपू नये. असे केल्यास शांत झोप लागत नाही. शिवाय रात्री भयावह आणि वाईट स्वप्ने पडतात. वास्तूशास्त्रानुसारही या दिशेला डोकं करून झोपणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून सांगायचे झाल्यास या दिशेला वाहणारे वारे अन्‌ त्यातील निर्माण होणारी उर्जा नकारात्मक असते. 

दक्षिणेला गाढ झोप, सकारात्मक ऊर्जा : दक्षिण दिशा ही उत्तम दिशा मानली जाते. या दिशेकडे डोकं करून झोपल्याने गाढ झोप येते. थोडक्यात या दिशेला गाढ झोपेची दिशाही म्हणतात. वैज्ञानिक दृष्टीकोनातून सांगायचे झाल्यास, दक्षिणेला निगेटिव्ह फोर्स असतो तर आपलं डोकं पॉझिटिव्ह फोर्स. त्यामुळे या दिशेला झोपल्याने पॉझिटिव्ह अन्‌ निगेटिव्ह यांच्यात आकर्षण निर्माण होते. त्यामुळे प्रसन्न, शांत, सकारात्मक भाव आपोआपच निर्माण होतात. मन स्थिर होऊन ध्यानमुद्रेत आपोआपच प्रवेश होतो. लगेच शांत अन्‌ गाढ झोपही लागते. या दिशेला झोपल्याने आरोग्य, सुख आणि समृद्धी प्रदान करणारी ऊर्जा प्राप्त होते.

(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI

  

टिप्पण्या

  1. छान अाणि मार्गदर्शक लेख... बऱ्याच गोष्टी आपण अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्षित करतो... मात्र त्यात विज्ञानाचा आधार असतोच, खरंच हे नाकारता येत नाही... मला झोपेसाठी योग्य दिशा कोणती ही माहिती खुपच उपयोगी ठरलेली आहे... याबाबतीत थोडीफार माहीत होती; मात्र या लेखाच्या माध्यमातून सखोल माहीती मिळाली... धन्यवाद ‘एचके ब्लॉग’ आणि लेखकांचे... खरंच ब्लॉग खुपच वाचनिय आहे...
    - पल्लवी देशपांडे, जळगाव

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!