शारीरिक तक्रारी गांभीर्याने घ्या..!

एचके लर्निंग अँड एनएए :
शारीरिक तक्रारीमुळे अनेक अडथळे निर्माण होतात. आयुष्यात असक्रियता अन्‌ नैराश्‍य वाढत जाते. त्यामुळे अशा तक्रारींवर वेळीच नियंत्रण मिळविणे हितकारी ठरते. किरकोळ वाटणाऱ्या पण अस्वस्थ करणाऱ्या बऱ्याच व्याधींचा सामना तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच करावा लागतो. त्याकडे सर्रास दुर्लक्षही होताना दिसते. निदान झाल्यावरही त्या व्याधींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पुढे धोक्याचीच घंटा नाही का? या लेखात आपण मधुमेह, सतत पायाला मुंग्या येणे, सायनसचा त्रास आणि पाठदुखी या व्याधींच्या नियंत्रणासाठी काय करायला हवे यावर चर्चा करणार आहोत. 

असे मिळवा मधुमेहावर नियंत्रण : पोळी, डोसा आणि भातासारख्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणात अधिक असते. ज्यामुळे डायबिटीजचा धोका उद्भवतो. आहारातून कार्बोहायड्रेट्स कमी केल्यास डायबिटीजचा (Diabetes) धोका कमी होतो. आहारातून कार्बोहायड्रेट कमी करायचे याचा अर्थ पुर्णत: बंद नको; असे केल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. फास्ट फूडचा वापर कमी करायला हवा आणि कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळायलाच हवे. आहारात तांदळाऐवजी नाचणी आणि ज्वारी-बाजरीपासून तयार झालेले पदार्थ असायला हवेत. त्याचप्रमाणे पालेभाज्या, फळभाज्या, मोसमी फळं यांचा समावेश आहारात करणे आरोग्यदायी ठरते. 

पायाला मुंग्या येण्याची कारणं अन्‌ उपाय : सतत एकाच पोजिशनमध्ये बसल्याने पायाला मुंग्या येतात, पाय सुन्न होतात. विविध कारणांमुळे ही समस्या उद्‌भवू शकते. ती कारणं आपल्याला माहिती असायला हवी. म्हणजे वेळीच उपाय करणे शक्य होईल. व्हिटॅमिन B-12 च्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्‌भवू शकते. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन B-12 चा वापर असायला हवा. कॉम्प्युटरवर दिर्घकाळ टायपिंग केल्याने सिंड्रोमचा त्रास  होतो. म्हणजे मनगटाच्या नसा आकुंचित होतात. त्यामुळे हाताला मुंग्या येऊ शकतात. या समस्येवर फिजिओथेरपी आणि व्यायाम उत्तम उपाय आहे. मानेची नस अकडल्यानेसुद्धा पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात. हा त्रास बसण्याच्या अयोग्य पद्धतीमुळे होतो. म्हणून हा त्रास टाळण्यासाठी नेहमी योग्य अवस्थेत बसावे. मधुमेहाच्य त्रासामुळेही हा त्रास उद्‌भवतो. त्यामुळे मधुमेह नियंत्रीत ठेवणे यावर उत्तम उपाय आहे. थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवतो, वजन वाढते. त्याचबरोबर हातपायाला मुंग्या येतात. म्हणून ब्लड टेस्ट करून डॉक्टरांंच्या सल्ल्याने यावर औषधोपचार करायला हवा. 

'सायनस'वर अशी घ्या काळजी : नाकाच्या दोन्ही बाजूला तसंच डोळ्याच्या खोबणीच्या वर, कवटीच्या हाडामध्ये असलेल्या पोकळ जागांना सायनसेस म्हणतात. या पोकळ जागांमधील अंतःत्वचेला दाह होणे याला सायनसायटिस म्हटले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे विषाणूजन्य सर्दी असते. इतर लक्षणांमध्ये चेहरा आणि डोके बधीर होणे, खाली वाकल्यावर चक्कर येणे किंवा डोके जड होणे, घशाच्या मागील बाजूस कफ येणे, तीव्र सर्दी, दुर्गंधी किंवा कधीकधी रक्ताचा नाकातून स्त्राव, चोंदलेले किंवा बंद नाक यांचा समावेश होतो. धुम्रपान टाळणे, स्टीम इनहेलेशनचा वापर, जल-नेति या पद्धतीचा वापर करूनही हा त्रास नियंत्रणात आणता येतो. जास्त काळ लक्षणे आढळल्यास ताबडतोब कान, नाक, घसाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

पाठदुखीवर साधा अन्‌ सोपा उपाय : पाठीच्या वरच्या आणि खालच्या भागात वेदना होत असल्यास पाठीवर झोपा, त्यामुळे वजन कण्याच्या सर्व भागांत समप्रमाणात विभागले जाईल. गुडघ्यांच्या खाली उशी ठेवल्यास कण्याचा नैसर्गिक बाक व्यवस्थित राखला जाईल. एका अंगावर झोपत असल्यास उभी दोन गुडघ्यांच्या मध्ये उशी ठेवा. त्यामुळे मणक्याचा खालचा भाग आणि पार्श्‍वभाग एका रेषेत येतील व मणक्याच्या खालच्या भागावरील ताण कमी होईल. त्याचप्रमाणे पाठीच्या स्नायूंसाठीचे व्यायाम आणि त्यांच्यावर ताण देणे, चालणे, योगासने यांसारख्या हालचाली पाठदुखी थांबवण्यासाठी उपयोगी ठरतील. अतिमहत्त्वाचे म्हणजे धूम्रपान ताबडतोब सोडायला हवे कारण निकोटिनमुळे वेदना वाढतात आणि दुखणे बरे होण्याएैवजी वाढत राहते. जुनाट पाठदुखीमुळे चिडचिड, नैराश्‍य येऊ शकते. त्यामुळे योगासने व ध्यानधारणा करायला हवी. त्यामुळे मन शांत होण्यास मदत मिळते.

(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!