किडनी निरोगी तर शरीर निरोगी

एचके लर्निंग अँड एनएए :
निरोगी आरोग्य कुणाला नको? सर्वांनाच 
पण शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी असावे असे वाटते. मात्र निरोगी राहण्यासाठी स्वत:मध्ये शिस्त असणे फार गरजेचे आहे. त्यासोबत शरीराला काेणते पदार्थ लाभदायी अन्‌ कोणते पदार्थ हानीकारक आहेत याची माहितीही असणे गरजेचे आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी किडनी निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किडनी शरीर स्वच्छ ठेवण्यासारखी महत्त्वाची भूमिका बजावते. किडनी खराब झाल्यास रक्तात घाण वाढू लागते. या घाणीमुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांची कार्यक्षमता घटते आणि कालांतराने गंभीर समस्या उद्‌भवते. रक्तातील मूत्रपिंड कार्य चाचणीची सामान्य श्रेणी पुरुषांसाठी 0.7 ते 1.3 mg/dL आणि महिलांसाठी 0.6 ते 1.1 mg/dL असते.  

शरीरात मुत्रपिंडाची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. निरोगी राहण्यासाठी निरोगी मूत्रपींड असणे अत्यंत गरजेचे आहे. मूत्रपींड म्हणजेच किडनी शरीरात फिल्टरचे कार्य करते. म्हणजेच शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत करते. आपली किडणी निरोगी ठेवण्यासाठी हानीकारक पदार्थांचे सेवन टाळणे हाच एकमेव उत्तम उपाय आहे. अन्यथा किडनी लवकर खराब होऊ शकते. रात्री जास्त लघवी होणे, लघवीचे प्रमाण बदलणे, लघवीच्या रंगात बदल होणे, फेसयुक्त किंवा बुडबुडायुक्त लघवी, हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे घोट्याला, पायांना सूज, वजन वाढणे, त्वचेवर पुरळ उठणे अशी मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे आहे. यासोबतच लघवीसोबत पू, रक्त किंवा दुर्गंधी येणेही धोक्याची घंटा ठरू शकते. संसर्गाच्या वेळी लघवी करताना जळजळ आणि वेदना देखील होते. थंडी वाजून येणे, ताप येणे, उलट्या होणे आणि थकवा येणे किंवा अशक्त वाटणे ही देखील किडनी संसर्गाची लक्षणे असू शकतात.

किडनी खराब झाल्यास शरीरात युरिक ॲसिड, अमोनिया, युरिया, क्रिएटिनिन, अमिनो आम्ल, सोडियम, जास्त पाणी साचते ज्यामुळे शारिरीक आरोग्य बिघडत जाते. यावर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आधीच काळजी घ्यायला हवी. किडनी निरोगी असेल तर आपण बिनधास्त कुठलाही पदार्थ खाऊ शकतो. मात्र किडनी आजारी असल्यास काही पदार्थ टाळायला हवेत. मूत्रपिंडांना मूत्र तयार करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, जे शरीरातील विषारी पदार्थ आणि कचरा काढून टाकते. लघवीचे प्रमाण कमी होणे हे किडनीचे बिघडलेले कार्य, किडनी स्टोन तयार होण्याशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत दररोज 3 लिटर पाणी प्यावे. किडनीच्या रूग्णांनी रॉक मिठाचे सेवन करावे जेणेकरून किडनीचे आरोग्य चांगले राहते आणि शरीर रोगमुक्त राहते.

माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर असते. लसणामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. कोबीमध्ये फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट असतात. अननस हे कमी पोटॅशियम असलेले अन्न आहे. ज्यामुळे किडनीच्या रुग्णांना फायदा होतो. त्याचबरोबर यामध्ये असलेले फायबर, व्हिटॅमिन सी, ब्रोमेलेन, मॅंगनीज इत्यादीमुळे किडनीची जळजळ कमी होते आणि किडनीचा संसर्ग आणि किडनीचे आजार टाळता येतात. असे पदार्थ किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणून ज्या पदार्थांपासून किडनीचे स्वास्थ्य उत्तम राहील अशा पदार्थांचे सेवन आहारात नियमित असावे. भुजंगासन योग, मूत्रपिंड आणि यकृत उत्तेजित करण्याबरोबरच, तणाव आणि थकवा यापासून शरीराचे रक्षण करण्यास उपयुक्त आहे. पाठदुखीच्या समस्येवरही या योगाचा अभ्यास फायदेशीर मानला जातो. भुजंगासनाचा नियमित सराव देखील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे.

जर किडनीचा आजार असेल तर केळीचे सेवन अजिबात करू नये. कारण, त्यात भरपूर पोटॅशियम असते, जे किडनीचे फिल्टर खराब करू शकते. बटाट्यामध्येसुद्धा भरपूर पोटॅशियम असते. त्यामुळे याचे सेवन टाळायलाच हवे. चिकन ब्रेस्टमध्ये प्रथिने भरपूर असतात, परंतु त्यात पोटॅशियम देखील असते. म्हणूनच खराब किडनी असलेल्या रुग्णांनी याचे सेवन टाळावे आणि निरोगी लोकांनीही ते नियंत्रणातच खावे. दूध आणि दही प्रमाणात खावे. टोमॅटो किंवा त्याची पेस्ट मर्यादित प्रमाणात खावी.  एका मध्यम आकाराच्या टोमॅटोमध्ये सुमारे 290 मिलीग्राम पोटॅशियम असते. आणि अधिक पोटॅशियम किडनीसाठी हानीकारक असते. मसूर ही आरोग्यासाठी चांगली आहे, परंतु त्याचे जास्त प्रमाण मूत्रपिंडाच्या फिल्टरसाठी अजिबात चांगले नाही. 1 कप शिजवलेल्या मसूरापासून सुमारे 730 मिलीग्राम पोटॅशियम उपलब्ध हाेते. आणि अधिक पोटॅशियम किडनीसाठी हानीकारक असते. म्हणून किडनीचा आजार असालेल्या रुग्णांनी वरील पदार्थ टाळावेत किंवा कमीप्रमाणातच खावेत. 

(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!