सावधान, पुरेशी झोप घ्या..!

एचके लर्निंग अँड एनएए :
दिवसेंदिवस शहरी आणि ग्रामीण जिवनशैलीत अमुलाग्र बदल हाेताना दिसतोय. हा बदल चिंताजनक म्हणावा लागेल. आरोग्याबद्दल होत असलेला निष्काळजीपणा जिवघेणा बनत आहे. चित्रविचित्र आहारामुळे विविध आजारांना आमंत्रण दिले जात आहे. लहानांपासून तर वृध्दांपर्यंत सर्वच सोशल मिडियाच्या मायाजाळात स्वत:ला अडकवून घेत विश्रांती आणि पुरेशी झोप याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे तणाव, निद्रानाशाचे प्रमाण तर वाढतच आहे. यापेक्षाही पुरेशी झोप होत नसल्याने चिंताजनक मानसिक आजारही वाढत आहेत. म्हणून वेळीच ही चुकीची जिवनशैली थांबवायला हवी. उत्तम आहार आणि सुखाची झोप घेत आयुष्य निरोगी अन्‌ आनंदी करण्यावर आपण सर्वांनी भर द्यायला हवा. 
 

अयोग्य आहार आणि पुरेशी झोप न घेतल्याने हे लक्षात येते, की रक्तदाब, मधुमेह यासारख्या विकारांबरोबरच निद्रानाशाचा त्रास वाढला आहे. आणि निद्रानाश लहान-थोर सगळ्यांसाठी अत्यंत त्रासदायक आहे. अपुऱ्या झोपेमुळे शरीरात अनेक बिघाड दिसतात. नैराश्य, चिडचिड, वजन वाढणे, अंगावर सूज येणे, हार्मोन्समध्ये असंतुलन, पाळी अनियमित होणे, भुकेची भावना वाढीस लागणे, रक्तातील साखर कमी-जास्त होणे. रोगप्रतिबंधकशक्ती कमी होणे अशा समस्या उद्‌भवतात. म्हणून रात्री आठ तासांची शांत आणि गाढ झोप निरोगी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. 

निरोगी जिवनशैलीसाठी झोपेची रोजची वेळ निश्चित करायला हवी. झोपेच्या किमान दोन तास आधी मनाने बाह्य जगाशी संपर्क तोडत अंतर्मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा. सोशल मिडीया, टीव्ही, बातम्या, वादाच्या, तणावाच्या विषयांना सक्तीने दूर करत मन शांत अन्‌ प्रसन्न ठेवावे. त्याचप्रमाणे झोपायच्या आधी उत्तेजक पेये, मद्यपान, चहा/कॉफी इ. पदार्थ टाळावेत. खेळती हवा व योग्य अंथरूण व पांघरूण हेही शांत झोपेसाठी उपयोगी ठरते. सकारात्मक विचार आणि ध्येय प्राप्तीचे स्मरण करत निद्रेत प्रवेश करावा.  

झोप आणि आरोग्य यांचा खोलवर संबंध आहे. रात्री शांत आणि गाढ झोप न लागणे निरोगी नसल्याचे लक्षण आहे. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रात्री गाढ आणि शांत झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये मोबाईलचा अतिवापर, जास्त टीव्ही पाहणे देखील असू शकते, याशिवाय व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही रात्री झोप येत नाही. व्हिटॅमिन ‘बी 6’ ची कमतरता हे देखील रात्री झोप न येण्याचे एक कारण असू शकते. वास्तविक, व्हिटॅमिन ‘बी 6’ मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हार्मोन्सची कमतरता पूर्ण करते. रात्री शांत आणि गाढ झोपेसाठी सेरोटोनिन आणि मेलाटोनिनची गरज असते. व्हिटॅमिन ‘बी 6’ च्या पुरवठ्यासाठी शेंगदाणे, अंडी, दूध, हिरवे वाटाणे आणि गाजर यांचा आहारात समावेश असायला हवा. त्याचप्रमाणे ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता हे देखील रात्री झोप न येण्याचे एक कारण आहे. ‘व्हिटॅमिन डी’ उन्हातून मुबलक प्रमाणात मिळते. तसेच सॅल्मन फिश, अंडी आणि मशरूम यातूनही ‘व्हिटॅमिन डी’ उपलब्ध होते. 

चांगल्या आणि शांत झोपेसाठी रात्रीचा आहार हलका आणि त्यात प्रथिने व चोथ्याचा समावेश असावा. पाण्याचे प्रमाण संध्याकाळी पाचनंतर कमी करावे. चहा, कॉफी, मद्य यांसारखी पेये घेऊ नये. तेलकट, खूप तिखट, चमचमीत पदार्थ संध्याकाळच्या जेवणात टाळावेत. रात्रीचे जेवण झोपेच्या किमान दोन तास आधी असावे. किमान रोज एक तास व्यायाम, प्राणायाम आणि ध्यान करावे. कोमट पाण्यात पाय बुडवून, तळपायांना तेल लावावे यामुळे शांत आणि गाढ झोप लागते.  झोपताना अवांतर विचार न करता आपल्या श्वसनावर लक्ष केंद्रित करावे. हा सराव मानसिक तणावही दूर करतो. दुपारच्या वेळी झोप काढण्यापेक्षा दहा मिनिटे वामकुक्षी घ्यायला हवी. शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ती मिळविण्यासाठी जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करून योग्य आहार व व्यायाम केल्यास शांत झोप मिळण्यास मदत होईल. 

(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!