डायबेटीज अन्‌ फळ आहार

एचके लर्निंग अँड एनएए :
फायबर युक्त फळं खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. फायबर आणि पाण्याने भरपूर फळे भूक लवकर शांत करून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. मधुमेह असलेल्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेली फळे खाण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. कारण GI  स्कोअर कमी असलेली फळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेही रुग्णांनी फळे दुपारच्या जेवणाआधी खावी, तसेच सायंकाळचा नाश्‍ता फळांनीच करावा. आपल्या वजनाच्या 10 पट (ग्रॅममध्ये) फळं खावीत म्हणजे 60 किलो वजन असेल तर 600 ग्रॅम फळे खाता येतील. रोज किमान 1 तास चालावे. योगा, प्राणायाम नियमित असावा. जेवणासोबत हिरव्या कच्च्या भाज्या (सॅलड) सेवन कराव्यात. यामुळे जेवण प्रमाणात घेता येते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. चला तर मग अशी कोणती फळे आहेत जी मधुमेह रुग्णांना खाता येतील याबद्दल जाणून घेऊया.

फळांविषयी जाणून घेण्याआधी ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? यासंबंधी समजून घेऊया, म्हणजे फळांची निवड करण्यास साेपे होईल. प्रत्येक खाद्यपदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic index) असतो. कोणता खाद्यपदार्थ रक्तातील साखरेवर किती लवकर परिणाम करेल हे या ग्लायसेमिक इंडेक्सद्वारे कळते. सोप्या शब्दात सांगायचे तर, वस्तूचा ग्लायसेमिक इंडेक्स जितका कमी असेल तितकी हळूहळू साखर रक्तात शोषली जाईल. जीआयचे मापन 0 ते 100 पर्यंत असते. हा आकडा जितका जास्त असेल तितक्या लवकर साखर रक्तात प्रवेश करेल. टरबूजचा GI सुमारे 72 असतो आणि साधारणपणे 70 किंवा त्याहून अधिक GI असलेले कोणतेही खाद्यपदार्थ उच्च ग्लायसेमिक इंडेक्स म्हणून वर्गीकृत केले जातात. 

संत्री : संत्री व्हिटॅमिन ‘सी’चा एक उत्तम स्रोत आहे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढवते, शरीरातून मुक्त रॅडिकल्स निघून जातात ज्यामुळे कर्करोग, स्ट्रोक आणि हृदयविकारांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. संत्रीत फोलेट आणि पोटॅशियमचे चांगले प्रमाण रक्तदाब नियमित ठेवते, टाइप 2 मधुमेहाशी संबंधित हृदयविकार टाळता येतो. केवळ संत्रीच नाही तर इतर लिंबूवर्गीय फळेही व्हिटॅमिन ‘सी’चे चांगले स्रोत आहेत.

सफरचंद : दररोज एक सफरचंद सेवन केल्यास आजारांना दूर ठेवता येते हे अगदी खरे आहे. सफरचंदमध्ये फक्त 95 कॅलरीज आणि 25 ग्रॅम कर्बोदके असतात, म्हणून सफरचंद मधुमेहींसाठी एक चांगला नाश्ता असतो. सफरचंदाला सालीसह खाणे योग्य कारण त्यात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण उत्तम असते. सफरचंदात फायबर भरपूर असते ज्यामुळे रक्तातील साखर सामान्य ठेवण्यास मदत होते.

बेरी : ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे बेरी हे मधुमेहींसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए)च्या मते बेरी हे मधुमेहासाठी सुपरफूड मानले जाते. हे अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध आहेत. एक कप ताज्या ब्लूबेरीमध्ये 84 कॅलरीज आणि 21 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स केवळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करत नाहीत तर अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी करतात. चरबी नसलेल्या दह्यासोबत या स्वादिष्ट फळाचा आहारात समावेश करता येऊ शकतो.

चेरी : चेरीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट असतात जे जळजळ कमी करतात. हे अँटिऑक्सिडंट हृदयरोग, कर्करोग आणि इतर रोगांशी लढण्यास मदत करू शकतात. यात कमी GI असल्याने साखरेची पातळी वाढत नाही.

जर्दाळू : जर्दाळू हे एक गोड उन्हाळी फळ आहे. मधुमेह आहार योजनेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. एका जर्दाळूमध्ये फक्त 17 कॅलरीज आणि 4 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, जे रक्तातील साखर वाढवत नाहीत. यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनसंस्थेसाठी तसेच रक्तातील साखर नियंत्रणासाठी याेग्य असते.

पीच : रसाळ आणि सुगंधी पीच हे उन्हाळ्यातील फळ आहे ज्याचा मधुमेहाच्या आहार योजनेत समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. यामुळे साखरेची पातळी वाढत नाही. 

नाशपाती (Pear) : नाशपाती फायबरचा उत्कृष्ट स्त्रोत असल्याने मधुमेहाच्या आहार योजनेचा याचा समावेश करता येतो. एक मध्यम आकाराचे नाशपाती सुमारे 5.5 ग्रॅम फायबर प्रदान करते, जे दैनंदिन गरजेच्या 20% आहे. फायबरमुळे शरीरातील ग्लुकोजचे शोषण कमी होते, त्यामुळे साखर हळूहळू रक्तप्रवाहात पोहोचते आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 

किवी : किवीला पोषक तत्वांचे पॉवरहाऊस मानले जाते. एका किवीमध्ये 215 मिलीग्राम पोटॅशियम, 64 मिलीग्राम व्हिटॅमिन ‘सी’ आणि 2 ग्रॅम फायबर असते. यात मध्यम प्रमाणात कॅलरीज आणि कर्बोदकांचा समावेश आहे. म्हणून किवी मधुमेह आहारासाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. किवी हे वर्षभर उपलब्ध असलेले फळ आहे. यामध्ये असलेल्या फायबर, व्हिटॅमिन ‘सी’ आणि पोटॅशियम रक्तातील साखर नियंत्रणात राहते. जळजळ आणि गंभीर आजारांचा धोका कमी होतो. किवी या फळाच्या सेवनाने विविध आजारांपासून संरक्षण मिळते.

द्राक्षे : द्राक्षांमध्ये तांबे आहे जे ऊर्जा उत्पादनास मदत करते. याशिवाय द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ‘के’ ही चांगल्या प्रमाणात आढळते. यामुळे जखमा भरणे,  हाडे निरोगी राहण्यास मदत होते. द्राक्षांमध्ये फायबरही समृद्ध प्रमाणात आढळून येते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राहण्यास मदत होते.

लिंबूवर्गीय फळे : लिंबूवर्गीय फळांमध्ये चव वाढवण्यासोबतच पोषकतत्त्वेही भरभरून असतात. यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आणि इतर अँटीऑक्सिडंट असतात जे साखरेची पातळी कमी करण्यासोबतच अनेक आरोग्य समस्या दूर करतात. यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. जांभूळ, पपई, काकडी, लिंबू, पेरू, टोमॅटो, कस्तुरी ही फळेही मधुमेहींसाठी आरोग्यदायी आहेत. 

ही फळे टाळावीत : फळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत, परंतु काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून अशी फळे खाऊ नये. जर एखाद्या फळातील GI स्कोअर 70 ते 100 च्या दरम्यान असेल तर त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. उच्च जीआय स्कोअर असलेली फळे साखरेची पातळी वाढवतात. 

टरबूज : टरबूजचा ग्लायसेमिक इंडेक्स ७० ते १०० च्या दरम्यान जास्त असतो. यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे मधुमेहींनी याचे सेवन करू नये.

मनुका - बेदाणे : मधुमेही लोकांसाठी मनुका हा फळाचा चांगला पर्याय नाही. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे मधुमेहींसाठी नुकसानदायी ठरू शकते. 

अननस : अननस या फळामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, कारण यात कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते त्यामुळे मधुमेहींनी अननस खाणे टाळावे.

जास्त पिकलेली केळी : जास्त पिकलेल्या केळ्यांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स स्कोअर देखील उच्च आहे म्हणून मधुमेह असलेल्यांनी जास्त पिकलेली केळी खाणे टाळावे. याशिवाय पॅकबंद आणि प्रक्रिया केलेली फळेही सेवन करू नये. 

(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!