भगवत गीता : 13 : श्लोक 26-34

श्लोक २६

यावत्सञ्जायते किञ्चित्सत्त्वं स्थावरजङ्गमम्‌।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ॥

हे भरतर्षभा (अर्थात भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना), जेवढे म्हणून स्थावर-जंगम प्राणी उत्पन्न होतात, ते सर्व क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात, असे तू जाण. 

श्लोक २७

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्‌।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति॥

जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतांत परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो, तोच खरे पाहतो. 

श्लोक २८

समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम्‌।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो
याति परां गतिम्‌॥ 

कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, त्यामुळे तो परम गतीला जातो. 

श्लोक २९

प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः।
यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति॥

आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत, असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे, असे पाहतो, तोच खरा पाहतो. 

श्लोक ३०

यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति।
तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा॥

ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे, असे पाहतो, त्याच क्षणी तो सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होतो. 

श्लोक ३१

अनादित्वान्निर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते॥

हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहात असूनही वास्तविक तो काही करीत नाही आणि लिप्त होत नाही. 

श्लोक ३२

यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते।
सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते॥

ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्याकारणाने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. 

श्लोक ३३

यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत॥

हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. 

श्लोक ३४

क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा।
भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्‌॥

अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांतील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्त्वतः जाणतात, ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!